त्याचे लक्षण : कफाला उत्पन्न करणारे असे आहार , मधुर अन्न , मधुर रस , धृतपक्व गोधूमादिकांचे पदार्थ इत्यादिकांचे सेवनेकरून मेद वाढतो . तेणेकरून अन्य धातू जे रसादि शुक्रांत त्याचे पोषण होत नाही . आणि मेद वाढल्यामुळे तो मनुष्य सर्व कर्माविषयी अशक्त होतो , आणि अल्प श्वास , तृषा , मोह , निद्रा , श्वासावरोध , निजेमध्ये फार घोरणे , शरीराचे ठायी ग्लानी , शिंका , घामाला दुर्गंध , अल्प मैथुन इत्यादि उपद्रव होतात . तो मेद सर्व प्राणीमात्राचे , उदराचे ठायी बहुतकरून राहतो . यास्तव ज्या मनुष्याला मेदोरोग आहे त्याचे उदराची प्रायः वृद्धी होते आणि त्या मेदेकरून मार्ग रुद्ध झाल्यामुळे कोष्ठाग्नीचे ठायी वायु बहुधा संचारू लागतो . व अग्नीला प्रदीप्त करून आहाराला शोषवितो यास्तव मनुष्याने भक्षीलेले अन लवकर जीर्ण होऊन दुसऱ्या आहारची इच्छा करितो , कदाचित् भोजनाची वेळ चुकली असतां मोठा घोर विकार - प्रमेह (मधुमेह),
ज्वर ,
भगंदर ,
अपचन
यकृताचे विकार
वातरोग
थाॕयराॕईड
गर्भाशय विकार
यांतून कोणताही एखादा रोग होतो . आणि विशेषकरून अग्नि व वायु हे उपद्रव करीत होत्साते मेदोरागाचे शरीर जाळीतात .
याविषयी दृष्टांत जसा वनसंबंधी अग्नि वायूला सहाय्य होऊन वन जाळीतो , तद्वत् मेद फार क्रुद्ध झाला असतां एकाएकी वातादि दोष कुपित होऊन मोठे घोर उपद्रव करून मनुष्याला लवकर आजारी , व त्या मेदाचे योगेकरून शरीर फार मोठे झाले असतां मनुष्याचे उदर , स्तन , कुल्ले हे स्थुल होतात आणि विसर्प , भगंदर , ज्वर , अतिसार , प्रमेह , अर्श इत्यादिक उपद्रव होतात . याप्रकारे मेदोरोगाची लक्षणे जाणावी .
1 ) मेदोरोगावर उपचार - लहान बेलमूळ , ऐरणमूळ , टेंटूमूळ , शिवणमूळ , पाडळमूळ या पांच औषधांचा काढा करून त्यात मध मीळवून तो प्याला असतां मेदोरोग दूर होतो .
हिरडे , बेहडे , आंवळकाठी या तीन औषधांचा काढा करून त्यात मध घालून प्यावा .
तेणेकरून मेदोरोग दूर होतो .
कढत पाणी थंड करून त्यात मध मेळवून प्याले असतां तेणेकरूनही . . . मेदोरोग दूर होतो .
प्रातःकाळी थंड आणि स्वच्छ पाणी समान मध घालून घ्यावे व व्यायाम करावा . सुंठ , मिरी , पिंपळी , ऐरणीचे मूळ , हरडा , बेहडा , आंवळकाठी , वावडिंग यांचे चूर्ण करून त्यात ८८ भाग गुग्गुळ घालून कुटून गोळ्या कराव्या व शुष्क झाल्यावर त्रिफळ्याचा काढा करून त्याने पुन्हा गोळ्या बांधाव्या . हे औषध घेतले असता सर्व वायू , मेदोरोग दूर होतात .
सागाचे सालीच काढा करून त्यांत गोमूत्र घालून घेतला असतां श्लीपद , मेदोरोग हे दूर होतात .
यकृत मेदयुक्त असुन मेद कमी करण्यास पुनर्नवा ,नाई,गुळवेल,कुर्डु,
गोरखमुंडी ,दशमुळ,ईंद्रजव,मेथी,त्रिफला,चिकणा,वावडींग,वासनवेल ,
भुईआवळी वैद्द सल्ल्याने घ्यावी
रात्री झोपतांना जीरे धने कडुजीरे गुळवेळ अल्पप्रमानात घ्यावे पुन्हा रात्रभर काही खाउ नये.
*मेदयुक्त काहिही खाउ नये मास, अंडी ,तेलकटपदार्थ ,मैदा, बेकरी पदार्थ बंद .
संदर्भ -आर्यभीषक
व्यायाम व योगा अवश्य करावा.पंचकर्म करुन घेणे.
टिप -नाडी परीक्षा व प्रकृती बघुन तज्ञाच्या सल्याने घेतलेले औषध योग्य ठरते.
सर्व प्रकारचे शास्त्रशुद्ध पदध्तीने तयार केलेले आयुर्वेदिय वेदनाहारी तेल , केशवर्धक तेल,धन्वंतरी हर्बल चहा ,दंन्तमजंन ,विषाणूरोधक तेलाची उदबत्त्ती, धूप ,ह्रदयासाठी काढे,सुवर्णयुक्त अमृतप्राश ,च्यवनप्राश सर्व प्रकारचे चुंबकीय साहीत्य सर्व प्रकारच्या गोळ्या योग्य दरात तयार करुन मीळतील.
Dr Kailash Ugale याच्या वालवरून
0 Comments