Ticker

6/recent/ticker-posts

सुंदर वासाचा असे दवणा

सुंदर वासाचा असे दवणा/
त्रीदोषावर कामी आहेना//

श्रावण चालु झाला आहे तसाही मी नेहमी शीखरशींगणापुरला महादेवाला जातो तीथे दवना वनस्पतीचा मान आहे .महादेवाला वाहतांना दोन वरचे देठ धुवुन लगेच खावे हा नेहमीचा नीत्यनेम
चैत्र शुक्ल पक्षात 2,3,5,6,9,12,13 व पौर्णिमा या तीथींना देवतांना दवना वाहावा. असे शास्त्र सांगते यात कापराचे वासासारखे उडणारे तेल असुन यवक्षार भरपुर आहेत ह्रदयत्तेजक असल्यामुळे ह्दयशोथ होउ देत नाही .म्हनुनही हातात धरुन देवालावाहण्याची आरोग्यदायी कल्पना आसावी अस मला वाटत.

लघु ,रुक्ष ,तीक्ष्ण, कडवट, तुरट, कटुवीपाकी, उष्ण असा दवणा त्रीदोषहर आहे.
1)सुजेत लेप लावतात
2)दिपन पाचन पीत्तसारक धर्मामुळे अग्नीमांदात उपयोगी 
3)मलाद्वारे पीत्त बाहेरपाडण्यास उपयुक्त 
4)स्वासकास कमी करतो.
5)मुत्रजनन धर्मामुळे कफज मूत्रकृच्छात उपयोगी
6)उत्तम वाजीकर आहे.
7)गर्भाशय संकोचही आहे
8)पांडुरोगात लोहभष्मासोबत दवणा दिल्यास कार्य जलदगतीने होते व आरोग्य सुधारते.
मात्रा-वैद्द सल्ला घेतला तर उत्तम ते नाही व तुमची प्रकृती बघून मात्रा सांगतील- स्वरस 5मी.ली.चुर्ण -1ग्रॕम पर्यंत(यापेक्षा जास्त नको कींवा यापेक्षा अधीक मात्रा रोगानुसार वैद्द सांगतात)
असा हा दमनक अर्थात दवना देवाला वाहील्यानंतर पुन्हा वाळवुन कींवा बाजारातुन चुर्ण घेतल्यास हळुहळु त्रीदोषावर काम होऊन शरीर नीरोगी ठेवन्यास काय हरकत आहे.घरीही कुंडीत दवना असावा याचे उडणशील कापरासारखे तेल शुष्म वीषानु प्रतीबंधक आहे .तुळशी सारखे फार उंच न वाढणारी ही वनस्पती आल्हाददायक व गुणकारी आहे हे नक्की 
नर्सरीत रोप कींवा बीयांद्वारे लागवड होते.भृंगराज कुळातील असल्याने काळजी घेउन वाढवावे लागते आजुबाजुला गवत ई होउ देउ नये

Post a Comment

0 Comments