Ticker

6/recent/ticker-posts

वटवृक्ष वड, आधुनिक व शास्त्रीय कारणे

 



#शास्त्रीय नाव: #Ficus_benghalensis, 

फायकस बेंगालेन्सिस ; 

#इंग्लिश नाव: #banyan, बन्यान ..


राष्ट्रीय महत्व: वड हा भारताचा #राष्ट्रीय_वृक्ष आहे.


वडाचे फळ खाणारे #पक्षी - १)साळुंकी, २) तांबट, ३) हरोळी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकीळ, ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) बुरखा हळद्या, ११) राखी धनेश, १२) कुटुर्गा, १३) कुरटूक, १४) हरेवा, १५) फूलटोचा, १६) तुईया, १०) पवेई मैना, १८) नीलपंखी हरेवा, १९) सह्याद्री हरोळी. 

घरट्यासाठी ढोल्या फांदया वापरणारे पक्षी -१)घार, २) कापशी, ३)कांडेसर, ४) डोमकावळा, ५) गावकावळा, ६) शिक्रा, ७) तांबट, ८) मलबारी धनेश, ९) कवडा धनेश.

विश्वांतीसाठी आणि दिवसा लपून राहण्यासाठी ढोली वापरणारे पक्षी -१)पिंगळा.


वडाच्या झाडाला अक्षयवृक्षही म्हणतात. #अक्षय म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे. वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही. ते कायम वाढतच राहते. वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा जन्म घेऊन वडाचा विस्तार वाढत जातो. वडाच्या झाडाचे आयुष्य हजारो वर्ष असते.

पुराण कथेनुसार , वडाचे झाड हे शिवशंकराचे स्वरूप मानले गेले आहे आणि वडाच्या पारंब्या ह्या शिवाच्या जटा आहे


भारतीय संस्कृती मध्ये वडाच्या झाडाचे असाधारण महत्व विशद केले आहे . 

आपण सर्वांना परिचित असलेल #सत्यवान_सावित्री ची कथा ह्या वडाच्या झाडाशी इतकी निगडित आहे कि वटपौर्णिमेला सर्व हिंदू स्त्रिया आजही श्रद्धेने आपल्या पतीराजांचे दीर्घायुष्य वडाच्या झाडाचे पूजन करून मागतात . 



हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे #फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे.



भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. 

मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात #वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. 

बिहारमधील #कमिटीत गावातील वृक्ष, 

गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील #कबीरवट, कलकत्त्याच्या #शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. 

शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. 

मद्रास येथील अड्यारच्या #थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि #सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. 

तसेच पातूरजवळ असलेल्या #अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दिड एकर परिसरात पसरलेला आहे..


#खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. 


#पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. 

पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात.  पाने जाड, कातडीप्रमाणे चिवट, १०−२० सेंमी. लांब व ५ ते ७.५ सेंमी. रूंदी, अंडाकृती, दीर्घवर्तुळाकृती, वरचा पृष्ठभाग केशविरहीत, चकचकीत व गर्द हिरवा आणि खालचा पृष्ठभाग सूक्ष्म लवयुक्त, ठळक शिरा असणाराव फिकट हिरवा, तळाचा भाग गोलाकार किंवा काहीसा खाचदार, ३ ते ७ प्रमुख शिरा कडा मिळतात तेथे विशालकोन; देठ १ ते ५ सेंमी. लांब, बळकट, उपपर्णे ०.५ ते २.५ सेंमी. लांब इ. लक्षणांनी युक्त असतात.


#फुले हिरवट रंगाची, लहान लहान असतात.

फुलोरो गोलाकार, काहीसे पोकळ, पानांच्या जवळ येणारे, देठविरहीत, लवयुक्त, सु. २. सेंमी. व्यास, कोवळ्या व अपक्वावस्थेत हिरवे व टणक, पक्कावस्थेत लालबुंद व नरम अशा लक्षणांनी युक्त असतात. या फुलोऱ्यांनी कुंभासनी पुष्पबंध म्हणता. याच्या आतील भागात सूक्ष्म पुं-पुष्पे, स्त्री-पुरूषे व गुल्मपुष्पे असतात. पुं-पुष्पे पुष्पबंधाच्या मुखाजवळ असून त्यांची संख्या जास्त असते. प्रत्येक पुं-पुष्पात एक पुं-केसर असतो. गुल्मपुष्पे व स्त्री-पुष्पे कुंभासनीच्या खालच्या भागात असतात. गुल्मपुष्पांचा कळा आखूड असतो, तर स्त्री-पुष्पांचा लांब असतो. यातील परागण कीटकांद्वारे होते. या सर्वच फुलोऱ्यांचे संयुक्त फळ बनते. त्याला औदुंबरिक फळ असे म्हणतात. 


#फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात. पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात. त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत.

 याला #औदुंबरिक फळ असे म्हणतात. मार्च ते जूनच्या काळात ही फळे झाडावर विपुल प्रमाणात दिसतात. अनेक पक्षी, वटवाघळे, खारी व माकडे इ. प्राणी ती खातात. फळांत असणाऱ्या कीटकांमुळे ती माणसांना खाण्यास योग्य नसतात, तथापि दुष्काळात गरीब लोक ती खातात. प्राण्यांच्या विष्ठेतून असंख्य बिया रूजून वडाचा प्रसार होतो.

 प्रारंभी अप वनस्पती या स्वरूपात हे रोपटे वाढते; तथापि कालांतराने मुळे जमिनीत जातात व वृक्ष मूळच्या आश्रय वृक्षांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे वाढतो. 

वडाची #लागवड बीज व  लहान फांद्या लावून करतात.


#कृष्णवट नावाचा एक वडाचा प्रकार आहे. त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात. एके दिवशी गोपालकृष्ण गाईंना घेऊन रानात गेले असता, गोपी प्रेमभराने लोणी घेऊन तेथे गेल्या व त्यास आग्रहाने लोणी खाऊ घालू लागल्या. तेव्हा गोपालाने ते लोणी आपल्या सर्व सवंगड्यांना खाऊ घातले व मनामनात समरसतेचा भाव जागृत केला. गोपी, सवंगडी आणि श्रीगोपाल एक झाले. हे लोणी सर्वांना वाटण्यासाठी वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून त्याचे द्रोण तयार केले. तेव्हापासून त्या वडाची पाने द्रोणासारखी बनली व पुढेही तशीच पाने येऊ लागली. अशी आख्यायिका आहे म्हणून अशा वटवृक्षाला ‘कृष्णवट’ नाव पडले, अशी आख्यायिका आहे..


#सांस्कृतिक_धार्मिक_महत्त्व: 



वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. 

वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पुजा करतात . 

भारतीय लोक मुळातच संशोधनप्रिय असतात. ज्यात स्वतःचा फायदा होतो त्या कृती सगळ्यांनी कराव्यात म्हणून अशा कृतींशी देवाचा संबंध जोडून त्याला पूजेत वगैरे स्थान दिलेले दिसते. 

त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी होताना दिसते. 

ज्या ठिकाणी प्रदक्षिणा करण्याने प्राणशक्‍तीचे आवाहन करता येते, निर्जीव पेशींना सजीव करता येते, तेथे साहजिकच वर्षातून एकदा का होईना, पूजा केली जाते. जे झाड स्वतःहून उगवते, कुठलीही काळजी न घेता वाढते व मनुष्यमात्राच्या उपयोगी पडते त्याची पूजा करायची नाही तर मग येणाऱ्या जाणाऱ्याच्या पायात ज्या झाडाचे काटे मोडतात त्या झाडाची पूजा करायची आहे? 

सध्या समाजकंटकांचीच पूजा आधी होताना दिसते. पण पूर्वीच्या काळी बाभळीच्या झाडाची पूजा न करता वडाच्या झाडाची पूजा करणे हेच नीतीला धरून आहे असे मानले जात होते. 

वडाचे झाड हा स्त्रियांच्या बाबतीत एक आशीर्वादच आहे. शेताच्या एका कडेला असलेल्या वडाच्या झाडाच्या सावलीत आपल्या शेतकरी नवऱ्याला दुपारचे जेवण वाढले जात असे. वडाच्या झाडाच्या खाली येणाऱ्या पारंब्या जणू तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे आश्वासन देतात.पारंब्यांचे तेल वापरल्यास केस लांबसडक व तेजस्वी होतात. 

स्त्रियांना केसांचे महत्त्व असल्याने त्यांना पारंब्यांचे महत्त्व वाटणे साहजिकच आहे.  

वटपौर्णिमेच्या दिवशी जवळपासच्या वडाच्या झाडापाशी जाऊन पूजेच्या निमित्ताने तास-दोन तास वडाच्या सान्निध्यात राहणे, आज्ञाचक्रातल्या ग्रंथीला उत्तेजना देण्यासाठी झाडाला सूत गुंडाळण्याच्या निमित्ताने झाडाला प्रदक्षिणा घालणे अशा गोष्टींमुळे शरीरातील अग्नीचे म्हणजे शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन व्हायला पण मदत होत असावी.

 हे सर्व देवासाठी व धर्मासाठी केलेले कर्मकांड आहे असे समजल्यामुळे वडाचे झाड नसले तर भिंतीवर त्याचे चित्र काढून पूजा करणे किंवा एखादी छोटी फांदी तोडून आणून पूजा करणे अशा हास्यास्पद रूढी प्रचलित झालेल्या दिसतात. 

ह्या रूढींमुळे वृक्षाचे महत्त्व लक्षात आले किंवा #वृक्षपूजा करणे हे आपले कर्तव्य आहे हे लक्षात आले तरी आरोग्याच्या दृष्टीने किंवा आपल्याला वृक्षवल्लीकडून मिळणाऱ्या आशीर्वादाच्या दृष्टीने या रूढींचा उपयोग होत नाही.


*चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आडळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी याच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे. 

वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे ‘वड’ हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात…


नैसर्गिक व धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला हा वट वृक्ष वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही महत्त्वाचा

आहे.. 

*वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात आक्सिजण देणारा हा वटवृक्ष….


 *वट पौर्णिमा. सात जन्म वरून खूप विनोद होत आहेत. 

पण हे सगळे च अज्ञान मूलक आहेत. 

मुळात या सातजन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही. तो होणार का नाही ? माहित नाही. माणसाचा मिळेल का? माहित नाही. हीच पुन्हा ओळखायची कशी?

 अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत. 

मग काय आहे सात जन्म.?

ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे.

शरीरविज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते.

काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात. शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते. 

या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो बारा वर्षे. 

म्हणून तप करायचे बारा वर्षे. 

बारा वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलले असते.जणू एक नवा जन्म. 

असे #सात_जन्म_म्हणजे 12×7=84.

पूर्वी लग्न होत 16 व्या वर्षी. 

त्या वेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो अर्थात पती 16+84 =100वर्षे

जगो. 

पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म. 

पुढच्या जन्माचा काहीही संबध नाही….


#उपयोग..


*स्त्रियांच्या अनेक आजारांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने औषध म्हणून उपयोगी पडतो. 

*मासिक पाळीच्या अनेक विकारांमध्ये उपचारासाठी वडापासून तयार केल्या औषधीचा उपयोग करतात. वडाचा तुरट रस आणि थंड गुणधर्म यामुळे स्त्रियांच्या या दोन्ही विकारात याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

*वडाच्या खोडाची साल, पाने, अंकुर व पानांचे चूर्ण अशा विविध स्वरूपांत मध्ये औषधी तयार होते. त्यांचा उपयोग आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसतो. 

*वडाच्या चिकाचा उपयोग विविध प्रकारच्या संधीवातावर उपचारासाठी करतात. तसेच आमवातामध्ये वडाचा चीक तसेच वडाची पाने ही लेप स्वरुपात उपयुक्त ठरतात. 

*स्त्रियांमध्ये केस गळण्याचे प्रमाण बऱ्याचदा आढळते. केस गळण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये केसांना रोज तेल न लावणे, आहारामध्ये तिखट आंबट खारट पदार्थ जास्त प्रमाणात घेणे, रात्रीचे जागरण, अतिशय चिंता करणे, चिडचिड करणे अशी अनेक कारणे केस गळतीला कारणीभूत ठरतात. यावर वडाच्या पारंब्यांनी सिद्ध केलेले तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल केसांना वरून लावण्यासाठी वापरतात. तसेच या तक्रारीसाठी पोटातूनही वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्यावी लागतात. विशेष करून केशवर्धक आणि पित्तशामक औषधांचा केसगळतीवर चांगला उपयोग होतो.  

*गर्भिणी मध्ये होणारा वडाच्या अंकुराचा उपयोग हा खूपच चांगला आहे. त्याचा उपयोग गर्भाच्या निरोगी आणि उत्तम वाढीसाठी केला जातो. 

*पूर्ण वाढलेले वडाचे झाड हे एका तासाला साधारण सातशे बारा किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते

*वडाच्या  झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला मिळतो

*वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होमहवनामध्ये आणि यज्ञामध्ये समीधा म्हणून करण्यात येतो. तसंच वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानामधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो. त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असं म्हणतात. त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं

*वडाची उंची साधारण तीस मीटरपर्यंत असते. तसाच हे झाड सदापर्णी आहे. अर्थात हे झाड कधी सुकत नाही. 

*वडाचा चीक हा दातदुखी, संधीवात तसंच तळपायाच्या भेगांवर फायदेशीर ठरतो

*वडाच्या सालीचा काढा हा मधुमेहावर गुणकारी ठरतो. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही नियमित हा काढा करून प्या. लवकरच तुमचा मधुमेहाचा आजार दूर होईल

*विंचवाचे विष काढण्यासाठीही तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. तसंच पायावर भिंगरी अथवा चिखल्या झाल्यास, तुम्ही वडाचा चीक लावू शकता

*तुमच्या शरीरात अचानक लचक भरल्यास किंवा सांधे दुखत असल्यास, वडाची पानं लावून थोडी गरम केल्यास, त्या दुखणाऱ्या भागावर लावा. असं केल्याने सांधे मोकळे होऊन बरे होतात

*ताप कमी होण्यासाठी वडाच्या झाडाच्या पारंब्यांचा रस देतात. यामुळे घाम येऊन शरीरातील ताप निघून जाण्यास मदत होते

*पोटात जंत झाल्यास, पारंब्याचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देण्यात येतो. तसंच तुम्हाला आव अथवा अतिसार झाल्यास, तुम्ही ताकामध्ये  मिसळून हे घेतल्यास लवकर बरं होतं

*झाडापासून पंच्चवलकल चूर्ण, पंच्चवलकल कशाय त्याचबरोबर वट जतदी तेल अशी विविध प्रकारची औषधे तयार केली जातात. 

त्यांचा उपयोग योग्य सल्ल्यानुसार अनेक व्याधींमध्ये हे केला जातो. याप्रमाणे स्त्रियांच्या अनेक विकारांमध्ये हे उपयुक्त असलेले हे वडाचे झाड नक्कीच पूजनीय आहे हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.

*चेहरा उजळवण्यासाठी तुम्हाला वडाच्या पानांचा उपयोग करून घेता येईल. वडाची 5-6 पानं घ्या आणि त्यामध्ये साधारण 10-20 ग्रॅम लाल डाळ मिक्स करून वाटून घ्या. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या असेल तर यामुळे बरी होते. त्याशिवाय तुम्ही जर वडाची पिकलेली पानं, जास्वंदीची पानं आणि लाल चंदन पाण्यात एकत्र करून वाटलं आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लावलीत तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स निघून जाण्यासही मदत होते.  तसंच तिसरा उपयोग म्हणजे तुम्ही पिकलेली वडाची पानं घ्या, त्यामध्ये कमळाचं फूल आणि केशर घाला. पाण्यासह याची पेस्ट बनवून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा. यामुळे तुमचा चेहरा अधिक उजळतो आणि चमकदार बनतो.


*कानाच्या समस्या असतील तर त्यावरदेखील तुम्हाला वडाच्या चीकाचा उपयोग करून घेता येतो. त्यासाठी तुम्ही काही थेंब वडाचा चीक घ्या त्यामध्ये मोहरीचं तेल मिक्स करा. याचे 2-2 थेंब तुम्ही कानामध्ये घाला. यामुळे तुमच्या कानात गेलेले किटाणू मरून जाण्यास मदत होते. तसंच तुम्हाला कमी ऐकायला येत असेल तर हे किटाणू मेल्याने तुमचे कानही व्यवस्थित साफ होतात आणि समस्या सुटण्यास मदत होते.


*वातावरण बदलतं तसं बऱ्याच जणांना नाकातून रक्त येण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. विशेषतः थंडीच्या दिवसात. मग अशावेळी नक्की काय उपाय करायचा याची कल्पना नसते. तर यावर तुम्ही नक्कीच घरच्या घरी उपचार करू शकता. ताकासह तुम्ही वडाच्या मूळाची साधारण 3 ग्रॅम पावडर मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही प्यायलात तर तुमच्या नाकातून येणारं रक्त थांबवण्यास याची मदत होते. सर्वात सोपा आणि लवकरात लवकर रक्त थांबवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 


#विशेष_टिप:-


कोणतेही  नैसर्गिक उपचार करतांना आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने उपचार करावा...

किती प्रमाणात रोग आहे व कीती प्रमाणात औषध घेण्याची गरज आहे हे वैद्यच सांगेल..

स्वतःच स्वतःवर उपचार करु नये..

नाही तर *"करायला गेले काय आणी वर झाले पाय"*

अशी अवस्था होईल..


Post a Comment

0 Comments