रानावनात शेतात बांधावर माका अर्थात भृंगराज मीळतो.
यात ईतके रसायने आहेत की गाईचे दुध व माकारस तुम्ही ऐक महिना सेवन केल्यास नक्की शंभर वर्षे निरोगी जगाल अस ग्रंथात नमुद केल ते खरोखर अतिशयोक्ती नाही.
माक्याचा रस यकृताची क्रीया सुधारते.
आम्ही केसांसाठी नित्य #माकारस व #माकाकेश तेल सांगतो.
माका तेलात तळून केशतेल गुण देत नाही.शीरपाक विधीने केलेले तेलच उपयोगी ठरते.
माका अर्थात #भृंगराज रस गोदुधात मीसळावा नंतर तिळतेलात उकळावा जे तेल शिल्लक राहील ते तेल केसांसाठी गुणकारी ठरते.
चला असा माका कीती गुणकारी आहे बघूया
माका - भृंगराज Latin Name - Eclipta prostrata
ग्रंथोक्त नावे - ( सं . ) भृगराज , ( म . ) माका .
_ _ _ माका ही वनस्पती शेतात व पाणथळ दलदलयुक्त जमिनीत होते . हिचे रोप अर्ध्या फुटापासून चांगले पोसले असता एक ते दीड फुटापर्यंत उंच वाढते . सामान्य रोप जमीनीवर पसरते ; परंतु उसाच्या शेतातील माका उंच वाढतो व तो एक ते दीड फूट उंच असू शकतो . याची पाने बारीक , लांबट व काहीशी खरखरीत असतात . पानांवर व खोडावर बारीक लव असते . ओलसर जागी हा बाराही महिने होतो .
त्याच्या तीन जाती आहेत .
१ ) पांढरा , २ ) काळा , ३ ) पिवळा .
हे प्रकार विशषेतः कांड व फुले यावरून करतात . पिवळा माका बंगालमध्ये अधिक मिळतो . आपल्याकडे काळा व पांढरा दोन्ही मिळतात व वापरतात . निळसर काळा माका उत्तम असून तो रसायन कार्यास उत्तम आहे . माका श्राद्धकर्मातही वापरतात याचा केशरंजनास उपयोग केला जातो म्हणून याला #केशरंजक , कुंतलवर्धक अशी नावे आहेत . याने केसांचे वर्धन होते म्हणून केश्य । म्हणतात . श्राद्ध प्रयोगात वापरतात म्हणून पितप्रिय म्हणतात . देवांच्या पत्रीत असता तो देवाला वाहतात म्हणून हरिप्रिय , हरिवास अशी नावे आहेत . याच्या वापराने केस भुग्यांच्या वर्णाप्रमाणे काळे होतात म्हणून भृगराज असे नाव आहे . माक्याचे समूळ रोप
औषधांत वापरतात .
मोठ्या मात्रेने उलट्या होतात . गुणधर्म - रस - कडू विपाक - कडू वीर्य - उष्ण गुण - रूक्ष , तीक्ष्ण दोषघ्नत्व - वायु , कफ कार्य - दीपन , पाचन , मूत्रजनन , बल्य , अनुलोमन , वर्ण्य , त्वच्य , केश्य , नेत्र्य , दन्त्य , मेघ्य , आमपाचक , रोपण , व्रणशोधन .
माक्यास रसायन मानतात ही अतिशयोक्ती नाही . याची मुख्य क्रिया यकृतावर आहे . विनिमय क्रिया सुधारतो . पित्तस्राव नीट होतो . आमाशय , यकृत व पक्वाशय यातील क्रिया सुधारते . या तीन क्रिया सुधारल्यामुळे सर्व शरीरास तेज येते . ( डॉ . देसाई )
रोगघ्नत्व -
कफजस्थौल्य , पांडु , त्वग्रोग , आम विष , शिरोरोग , #नेत्ररोग , कास , श्वास , कुष्ठ , कृमि , हृद्रोग , कंडू , #कंठरोध . त्वग्रोग
श्चित्र -
माक्याचे पंचांग लोखंडाच्या कढईत तेलात तळून रोग्यास द्यावे व त्यावर असाण्याच्या साराचा कीस व पाणी घालून आटविलेले दूध प्यावयास द्यावे .
कृमि - कळंब , माका व निर्गुण्डी यांचा पाला वाटून पिठात कालवून त्याची पोळी करून द्यावी म्हणजे कृमिंचा नाश होतो .
लाख , निर्गुण्डी , माका व #दारुहळद यांच्या काढ्याच्या देवकापसास सात भावना द्याव्या . त्या कापसाची वात तुपाच्या दिव्यात घालून काजळ धरावे व ते डोळ्यांत घालावे . डोळ्यांतील पित्तरोग नाहीसा होतो .
शिरोरोग - पलित #भोकराचे व बेहड्याचे बी , तीळ व अळशी यांचे समभाग करड कांगोणीचे बी घेऊन त्याला नीली , शिरीष , कोरांटा व माका यांच्या रसाच्या भावना द्याव्यात . नंतर ही बीजे शेळीच्या दुधात वाटून लोखंडास त्यांचा लेप करावा . उन्हात तापत ठेवल्याने त्यातून जे तेल गळते ते नाकात घालून दुधावर राहिले असता पलितरोग म्हणजे केस पिकणे हे नष्ट होते .
तसेच दूध , कोरांटा रस , माक्याचा रस , तुळशीचा रस ही सर्व एक एक प्रस्थ घेऊन ४ तोळे ज्येष्ठमध व १६ तोळे तेल सिद्ध करून दगडाच्या पात्रात किंवा मेंढ्याच्या शिंगात ठेवून नाकात घालावे .
लोहाचे चूर्ण , माका , त्रिफळा व काळी माती ही एक महिना उसाच्या रसात ठेवून डोक्यास लावली असता केस हळुहळु काळे होतात . वरील प्रयोग ग्रंथात दिले आहेत , अनुभव घ्यावा .
रसायन उपयोग -
१ ) माक्याचा रस १ महिन्यापर्यंत पिऊन दुग्धाहार ठेवावा . माका रसायन म्हणून देत असता दुग्धाहाराची आवश्यकता आहे . तसेच कफवात प्रकृतीच्या स्थौल्यजन्य विकारांत वापरतात . त्याने बल , वीर्य वाढून #आयुष्यवृद्धी होते .
हे रसायन कफवात प्रकृतीस व जुनाट रोगांत द्यावे .
२ ) माक्याचा पाला तुपात तळून पथ्याने नियमित घेत जावा . त्यावर असाण्याच्या साराचे कल्कात सिद्ध केलेले दूध प्यावे व त्याच दुधावर राहावे . असे एक महिना घ्यावे . त्याने रोग न होता दीर्घायुष्य लाभते . हे उत्तम बुद्धिवर्धक आहे .
उपलब्ध रसायने - १ ) श्रृंगराज तेल २ ) भूनिंबादि क्वाथ ३ ) श्रृंगराजासव
४ ) सूतशेखर ५ ) कृमिकुठार
भावना माका वर्ज - कृश विकारांत वापरलेला आढळत नाही .
हा फार दिवस वापरल्यास कफमेद क्षपण होऊन वजन कमी होऊ लागते . त्यावेळी बंद करावा .
सामान्य उपयोग - माका हे रसायन अस्थिधातुचा मल , केश व दात व मज्जाधातुमल नेत्रस्नेह , त्वक्स्नेह व पूरीषस्नेह यांची शुद्धी करतो . दातांवरही कार्य होते . कफवातनाशन कार्य करतो पित्तदुष्टी दूर करतो .
कफमेदाचे क्षमण करून मलशोधनाचे कार्य विशेष करतो . ही क्षुद्र वनस्पती आहे म्हणून त्याचे कार्य अल्पकाल टिकते . म्हणून रसायनात दीर्घकाल वापरण्याची जरूर आहे .
माका - मेद , अस्थि , मज्जा यावर विशेष कार्य करतो . यकृतातील आमपाचन कार्य करून रक्ताचे शोधन होते . आम्लपित्त - वृद्ध वैद्य भूनिंबादि क्वाथ देतात
त्यात माका आहे .
विषघ्न - यकृताची क्रिया बिघडून एका जातीचे शारीरिक विष याला आम म्हणतात . ते शरीरात जमते . त्यामुळे आमवात , चक्कर , डोकेदुखी , दृष्टिमांद्य व त्वग्रोग होतात . त्यावर माक्याचा उत्तम उपयोग होतो .
कासात - रिंगणी , डोरली , माका यांचे स्वतंत्रपणे रस मधातुन घ्यावेत . त्यामुळे कफ सुटून कफज कास बरा होतो . स्वरभेद - वातज स्वरभेदावर कासविंदा , डोरली , माका अंगरसात सिद्ध केलेले तूपऊन करून भोजनोत्तर लगेच प्यावे . त्यामुळे स्वरभेदाचा नाश होतो . ( वा . क्षयरोग चि . )
संदर्भ -कै.शंकर दत्तात्रेय फणसळकर सर
ओलसर जमिनींत माक्याची झाडे बाराही महिने असतात . माका वातहारक आहे . कोंकणांत पितृपक्षाच्या दिवशी याचे रायतें करितात .
माक्यांत काळा माका म्हणून एक जात आहे . यास काळी फुले येतात . ही झाडे क्वचित् असतात . ही गुणाने जास्त आहेत .
निळा माका - उष्ण , पाककाळी तिखट , रसायन ; व कृमि , वायु व कफ यांचा नाशक आहे .
( १ ) उपदंशव्रणाची शुद्धि होण्यास - माक्याच्या रसाने अगर माक्याच्या व जाईच्या पाल्याचा रस एक करून त्याने व्रण धुवावे .
( २ ) सूर्यावर्त व #अर्धशिशीवर - माक्याचा रस व बकरीचे दूध समभाग उन्हात ऊन करून नाकांत घालावे : अथवा माक्याच्या रसांत मिरी वांटून लेप
( ३ ) मुलांच्या सर्दीवर - मूल जन्मताच घशांत कफाचा जोर झालेला
ता , घसा घुरघुरतो ; त्यास माक्याचा अंगरस दोन थेंब काढून त्यांत चौपट मध आलून त्यांतील मिश्रण बोटाने त्या मुलाच्या टाळ्यांत पोचवितांच सर्व कफ निघून ताव मूल हुशार होते याविषयीं सुईणीने सावधगिरी ठेविली पाहिजे . ( ४ ) धनुर्वातावर - मक्याचा रस १ , तुंब्याचा रस 1 आल्याचा रस २ , कात्रेनिर्गुडीचा रस १ . अगस्त्याच्या पाल्याचा रस ३ , या प्रमाणाने सर्व रस एक त्यांत नारळाचा अंगरस चौपट घालावा , व थोडे तांदूळ घालून क्षार करावी : गुळ घालन शक्तीप्रमाणे ही क्षीर दररोज दोन वेळ द्यावी . उतार - तुप , कांदा .
( ५ ) काविळीस - माक्याच्या रसांत मिरपूड ६ मासे घालून तो दह्या बरोबर द्यावा . दिवस ७ .
( ६ ) मुलांच्या पोटांतील डबा वगैरेंवर - मक्याचा रस व तूप एकत्र करून द्यावे . दिवस ३ . ( ७ ) पारा अंगांत फुटला तर माक्याचा रस , अगस्त्याचा रस व सोरा वांटून ताकांत कालवून ते ताक ४ तोळे प्यावे ; म्हणजे मूत्रमार्गाने पारा निघून जातो . ( ८ ) सुजेवर - माक्याच्या रसांत मिरपूड घालून द्यावी व अंगासही चोळावी .
( ९ ) मोडशीवर - माक्याचा रस सैंधव घालून द्यावा . मोठ्या मनुष्यांस छटाक रस द्यावा . ( १० ) अग्निदग्ध व्रणावर - व्रण बरा होत आल्यावर त्या जागी दिवसांतून दोन तीन वेळ माक्याचा व काळ्या तुळशीच्या पाल्याचा रस काढून लावीत जावा , म्हणजे त्या जाग्यावर कुष्टा सारखा पांढरा डाग न पडतां अंगासारखा वर्ण होतो .
(११ ) मेदोरोगावर - नित्य रात्रौ निजते वेळी माक्याचा अंगरस सर्वांगास चोळून जिरवावा आणि निजावें . याप्रमाणे सतत सहा महिनेपर्यंत केल्याने अतिशय वाढलेला मेद आणि मेदाच्या योगाने शरीरांत जागोजाग झालेल्या गांठी यांचा नाश होतो .
( १२ ) मुखपाका वर - माक्याचा पाला अर्धा तोळाप्रमाण तंबाकूप्रमाणे वारंवार चावून तोंडांत धरावा व पिंक टाकीत जावी .
( १३ ) आग्निमांद्य , विडूबंध , व पांडुरोगावर -
माका मुळांसह छायेंत सुकवून त्याचे चूर्ण , व तितकेंच त्रिफळ्याचे चूर्ण , व या सर्वांबरोबर साखर एकत्र करून ते चार तोळे योग्य अनुपानाशी द्यावें .
( १४ ) स्वरभेदावर माक्याचा रस व तूप एकत्र करून रस आटवून तूप प्यावे .
संदर्भ -वनौषधी गुणादर्श
" हिंदुस्थानात प्राचीन काळी प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले गेले आहेत . आज त्या ग्रंथांचा अंशही आपणास पाहावयास मिळत नाही . इंग्रजांचे राज्य असल्यामुळे व त्यांची विद्या राजमान्यता मिळाल्यामुळे विकास पावत आहे . आणि त्यामुळे आमच्या पूर्वजांचे कित्येक ग्रंथ त्याचप्रमाणे नाना तर्हेची विद्या नष्ट होत आहे . " कष्टं शिष्टक्षतिकृति कलौ कार्यमृच्छन्ति विद्या । ” असे उद्वेगजनक वाक्य कित्येक लोकांच्या मुखातून बाहेर पडत आहे याचे कारण हेच आहे . याकरिता आमच्या सुशिक्षित वर्गाने , ज्यांची बुद्धी विशाल आहे , ज्यांना ईश्वराने अनुकूलता दिली आहे , अशा सद्गृहस्थांनी या उद्वेगजनक गोष्टींचा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची फार आवश्यकता आहे . "
- शंकर दाजीशास्त्री पदे [ इ . स . १८९३ साली लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून ]
टिप-
माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. साभार माहीती डाॅ उगले पंढरपुर.
0 Comments