Ticker

6/recent/ticker-posts

फेसयुक्त रिठा ,शिकेकाई



आपण शिकेकाई मसाला म्हणतो ते केसांसोबत त्वचेसाठीही फार उपयोगी आहे .

ते आठवड्यातुन दोन तिन वेळा तरी अंगास लावावे.

त्यातील मसाला घटक खालील प्रमाणे 

शिकेकाई मसाला --- 


शिकेकाई 1 कीलो

रीठा 250 ग्रॕम

बावची 50 ग्रॕम

नागरमोथा 100 ग्रॕम

आवळकाठी (वाळलेला आवळा)100 ग्रॕम

कचुर 100 ग्रॕम

वाळा 100 ग्रॕम

संत्रा साल 100 ग्रॕम

लींबु साल 100 ग्रॕम

चंदनपावडर 100 ग्रॕम 

(सर्व पावडर करुन घेणे भेसळ पावडर घेउ नये) 


चला काही शीकेकाई उपयोग बघु 


शिकेकाई 

सं . - विमला , सप्तला . 


लॅ . - Origanum valgaris Acacia _ _ Cancinum ओरिगॅनम् व्हलगॅरिस अकासिया कॅन्सिनम् ) 


ही झाडे बरीच मोठी असून याची पाने बारीक असतात . यास चापट आणि सुमारे ७ - ८ अंगुळे लांबीच्या शेंगा येतात ; त्यांस शिकेकाई म्हणतात . ही रिठ्याप्रमाणेच मलाची शोधन करणारी असून हिचा आपल्या देशांत केश स्वच्छ करण्याकडे सर्वत्र उपयोग होतो . शिकेकाई चांगली कुटून ती पाण्यांत कढवून , मग ते पाणी अंगास लावितात . 

शिकेकाई - आंबट व तिखट असून , सूज , वायु व कफ यांचा नाश करिते . 

हिचे फळ - रुचिकर , अति आंबट , व तेलाचा चिकटा घालविणारे आहे . 

( १ ) कफ पातळ होण्यास - शिकेकाईचे पाणी करून ते प्यावयास द्यावे . 

( २ ) विंचवाच्या विषा वर - शिकेकाई विड्यांतून खावयास द्यावी . 

( ३ ) मलशुद्धि व पोटांतील गुल्म नाहीसा होण्यास - शिकेकाईचे पाणी करून ते प्यावयास द्यावे .

( ४ ) गुरांस विष घातल्यास त्यावर उपचार - शिकेकाई बियां  ताकांत वांटून ते ताक पाजावें , म्हणजे विष उतरतें 

(संदर्भ -वनौषधी गुणादर्श) 


• कोवळ्या पानांची चटणी (मीठ, चिंच व तिखट घालून केलेली) अथवा पाने काळ्या मिरीबरोबर खाण्यास काविळीवर चांगली; पानांचा रस आंबट व सौम्य रेचक आणि हिवतापावर गुणकारी असून शेंगांचा काढा पित्तनाशक, कफोत्सारक (कफ पातळ करून पाडून टाकणारा), वांतिकारक (ओकारी करविणारा) व रेचक (जुलाब करविणारा) असतो. 


अशी ही शीकेकाई कुंपन म्हणून  शेतीच्या बांधावर घालुन शेत कुंपन व शेंगांना बाजारभावही छान मीळतो. 


आता रिठा विषयी बघूया.... 


वृक्ष 8 ते 10 मीटर उंचीचा खुप फांद्या असलेला . 


पांढरी फुले . 


फळे गोलाकार तीन धारेची 

वसंतात फळे येतात. 


भारतात सर्वत्र होतो. 


यात सॕपोनिन बीयात 30% तेल असते. 


धातु- रस वामक 

रक्त - कन्डु कुष्ठनाशक 


रिठा ,अरिष्ठ .

ई . - Soap - bery , Soap - nut सोप - बेरी , सोप नट . 

लें . - Sapindus trifoliatus सापिंडस ट्रिफोलिएटस ) 


ईश्वराने आपणास ही केवढी मोठी देणगी दिली आहे , की आपणास साबन तयार करण्याचा कधीही उपद्व्याप पडूं नये . रिठ्याची हवीं तितकी फळे रानातून आनली की आपला साबण तयार झाला . 

त्याप्रमाणे शिकेकाई हाही वृक्ष समजावा . सोबत हिंगणबेट फळ खरूज नायटे आदिकरून त्वचागत रोग धुण्यास साबणापेक्षा रिठा हा फारच उत्तम आहे . 

यास कोंकणांत " रिंगी " असेही म्हणतात . 

रिठ्याचा वृक्ष बहशः हिंदुस्थानांत सर्वत्र होतो .

याची पाने उंबराच्या पानांहुन थोडी मोठी असतात , व हा बराच मोठा वाढतो . रिठ्याच्या फळाच्या आतमधे काळे व कठिण बी असते . त्याचे लहान मुलांस दृष्ट होऊ नये म्हणून बजरबट्ट करितात . 

रिठ्याचे बी भिजू घालून त्यास भोके पाडून त्याच्या माळा करून शोभे साठी घोडयाच्या गळ्यांत घालितात . 

दागिने वगैरे उजळण्याच्या कामीही सोनारास रिठ्याचा नेहमी उपयोग पडतो . 

रिठा अंगास लावून स्नान केल्याने , अंगावरील मळ साफ निघून , अंग व केश निर्मळ होतात .

घामट कपडेही रिठ्याच्या पाण्याने धुतले असतां चांगले स्वच्छ निघतात ; 


रिठा - तिखट , पाककाळी तीक्ष्ण , उष्ण , लेखन , गर्भपातकारक , लघु व स्नीग्ध आहे ; आणि त्रिदोष ,  दाह , शूल यांचा नाश करितो . 

1)रिठाहा मोठा विषनाशक आहे - रिठ्याचे पाणी करून डोळ्यांस अंजन करावे ; म्हणजे विष उतरते . विषाचा जोर फारच मोठा झाल्यास , रिठ्याचे पाणी करून ते प्यावयास द्यावे ; म्हणजे उलटी होऊन त्वरित विष उतरते . अफू , बचनाग , सोमल , मोरचूद , हरताल आदिकरून कोणतेही विष पोटात गेले असल्यास , रिठ्याचे पाणी करून प्यावयास द्यावे ; म्हणजे वमन होऊन सर्व प्रकारची विषं उतरतात . अंजनानंतर रिठ्याच्या पानाचाही रस सर्वांगास चोळावा . रिठ्याच्या अंजनाने विष उतरल्यावर डोळ्यांची आग होते व डोळ्यांत लाली चढते , ती नाहीशी होण्यास - डोळ्यांत लोणी किंवा तूप , दोन तीन दिवस घालीत जावें ; म्हणजे डोळे बरे होतात . कोणत्याही रोगावर रिठ्याचे अंजन केल्यास , उतार पडल्याबरोबर डोळ्यांत तूप घालावें , म्हणजे आग होणार नाही . 


( २ ) विंचवाच्या विषावर - एका रिठ्याच्या टरफलाच्या , गुळांत तीन गोळ्या करून प्रथम एक गोळी खाऊन वर थोडे थंड पाणी प्यावे . नंतर थोड्या वेळाने दुसरी गोळी खाऊन थोडे ऊन पाणी प्यावे . नंतर तिसरी गोळी खाऊन थंड पाणी प्यावें . म्हणजे विष उतरते . तंबाखू ओढण्याची संवय असल्यास तंबाखूप्रमाणे रिठा चिलमींत घालून ओढावा ; म्हणजेही विंचवाचे विष तत्काळ उतरतें . 


( ३ ) कफ जाड होऊन उरांत दाटल्यास रिठ्याची साल खावी ; म्हणजे कफ पातळ होऊन पडेल . 


( ४ ) नळवायूस - - रिठ्यांचे पाणी करून तें प्यावयास द्यावे व फेंस पोटास चोळावा . 


( ५ ) मस्तक - रोगावर - रिठ्याच्या पाल्याच्या रसांत मिरी उगाळून , तो रस नाकांत पिळावा ; म्हणजे मस्तकशूळ , अर्धशिशी वगैरे मस्तकरोग बरे होतात . 


( ६ ) नंदवायूवर - प्रसूत स्त्रियांस एकाएकी मस्तकांत वायू होऊन मस्तक जड होते व फिरतें ; डोळ्यांपुढे अंधेर्या येतात , दांतखीळ बसते , वगैरे लक्षणे झाल्यास या वायूस नंदवायु ( अनंतवात ) असे म्हणतात . यावर रिठ्यांच्या फेंसाचें अंजन करावें , म्हणजे वायूचा झटका उतरतो . नंतर डोळ्यांत लोणी अगर तूप , दोन - तीन दिवस घालावे . 


( ७ ) उष्णतेने अंगावर लाल व पसरणारे गजकर्णासारखे नायटे होतात त्यास रिठ्याचा फेंस नायट्यांवर दिवसांतून दोन - तीन वेळ लावून घटकाभर जिरूं द्यावा . नंतर ऊन पाण्याने ती जागा धुऊन टाकीत जावी . म्हणजे ते चट्टे बरे होतात . 


( ८ ) उन्हांतून फिरून आल्याने पायांची आग झाल्यास - पायांस रिठ्याचा फेंस लावावा . 


( ९ ) नारूवर - रिठ्यांतील मगज व हिंग ऊन करून बांधावा . 


( १० ) अपस्मारावर - रिठा लिंबाच्या रसात उगाळून त्याचे नस्य द्यावे . 


( ११ ) मोडशी व तिडकांस - रिठा चोळून , त्याचा फेंस पोटास व पायास चोळावा , व थोडा पोटांतही द्यावा . 


( १२ ) रक्तगुल्मावर रिठ्याच्या पाण्यात कडू वृंदावनाचे मूळ उगाळून द्यावे ; म्हणजे रक्तगुल्म गळून पडतो . 


( १३ ) धनुर्वाताप्रमाणे गुरास मुरडी किंवा धनकी रोग होतो त्यावर - रिठ्याचा फेंस काढून दोन्ही डोळ्यांत अंजन करावे . गुण आल्यानंतर तीन दिवस नित्य डोळ्यांत लोणी घालीत जावे . 


( १४ ) गुरांस सर्पदंश झाल्यास रिठ्याच्या फेसाचे अंजन करावे व रिठ्याचे पाणी एक शेरपर्यंत पाजावे .[संदर्भ -वनौषधी गुणादर्श]] 


मात्रा - फळ वापरावे वमनासाठी 3ते6 ग्रॕम .रेचनसाठी 4ते 8 ग्रॕम अन्यथा 0.5 ते 1 ग्रॕम जास्त मात्रा घेउ नये 



टिप-

माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.

आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.

#Dr_Kailash_Ugale_Shree_Vitthal_Herbals_Pandharpur काॕपी पेस्ट कींवा फाॕर्वर्ड करतांना माहिती संकलक यांचे नाव असावे ही विनंती.

Post a Comment

0 Comments