नागरमोथा अर्थात मुस्तक/
निरोगी स्तन व रक्तशोधक//
गर्भाशय कॕन्सर ब्रेस्ट कॕन्सर प्रमाण खुप वाढत आहे.
सध्याचे सर्व राहणीमान केमीकल प्लॕस्टीक अति वापर आहार विहार हे जरी असल तरी आज हे सर्व सोबत घेउनच जगाव लागणार आहे.त्यातल्या त्यात आपण नक्कीच आहार विहार सांभाळु शकतो.
भांड्यात अॕल्युमीनीअम धातु वापरु नये .
जास्तीत जास्त लोखंडी मातीची भांडी वापरावी . तसेच कपडेही सैल व सुतीच वापरावे .सेंद्रिय अन्न अशी अनेक आरोग्यदायी आपण वापरु शकतो.
आयुर्वेदात गर्भाशय निरोगी राहावे म्हनून गुडमार, अशोक, लोध्र महिन्यातुन दहा दिवस तरी आम्ही देतो.
त्यामुळे गर्भाशय आजार होतच नाही असा अनुभव आला.
स्त्री सौदर्यात स्तनालाही फार महत्व आहे.काही सेलीब्रेटी स्तन सुडोल व्हावे वाढवावे या साठी सर्जरी करतात ते चुकीची बाब आहे.
त्यासाठी घेतलेले ईन्जेक्शनही पुढं जाउन साईड ईफेक्ट करु शकतात.
माझ्याकडे काही पेशंट स्तनसुडोल साठी घेतलेले मलम, तेल घेउन येतात त्यातील हार्मोन्स वाढवणारे घटक पुढ चालुन घातक आजार नीर्माण करु शकतात.ज्या भगीनी स्तनासाठी असे प्रयोग करतात त्यांना या अवयवाची कार्याची काहीच कल्पना नसते.
याच्या आतली दुधग्रंथी रक्तवाहीन्या पेशीजाल याचा अभ्यास असने गरजेच नाही का?ते जर माहीत असल तर तुम्ही असले प्रयोग (सर्जरी ईन्जे.)करणारच नाही.
आणि म्हणूनच आज ऐक टक्काही साईड ईफेक्ट नसणारी नागरमोथा वनस्पतीची माहीती घेउया.
स्तन हे निसर्गाने आईला दिलेले वरदान आहे.त्यातून तुम्हाआम्हास सर्वाना अमृततुल्य पोषण द्रवे मिळतात .
बाळाला आईचे दुध म्हणजे अमृतच .आईचे दुध पूर्णपणे मिळनार बाळ कमी आजारी राहते.आईच्या दुधातील सर्व घटक प्रतिकारशक्ती अबाधित ठेवते .
आई जर व्याधीयुक्त असेल तर त्यावरही दुध अमृत होण्यासाठी उपाय आहेत .ऐवढे आयुर्वेदीय विज्ञान प्रगत आहे.
वातरोगाने दूध बिघडले असतां जाते वामात्मके स्तन्ये दशमूलं व्यहं पिबेत् ।
वातव्याधिहरं सर्पिः पीत्वा मृदु विरचयत् ।।
तीन दिवस दशमुळांचा काढा प्यावा ; व वातव्याधिनाशक तूप पिऊन हलकेंसे रेचक द्यावे .
कफदुष्टे घृतं पेयं यष्टीसैंधवातंयुतं ।
रामप्पैः स्तनौ लिपेच्छिशोश्चदशनाच्छदौ । सुखमेवं वमेद्वालः कफकोपश्च शाम्यति ।
कफानें दूध दूषित असेल तर ज्येष्ठीमध व सैंधव घालून तूप द्यावें . अशोकाची फुलें वाटून स्तनांवर व बाळाच्या ओठांवर लेप करावा , म्हणजे बाळास सुखाने वांति होऊन कफप्रकोप शमतो .
पित्ते दुष्टेऽमृताभीरुपटोलं निंबचंदनं ।
धात्री कुमारश्चपिबेत् क्वाथयित्वा सशर्करं ॥
दुधांत पित्तदोष असेल तर गुळवेल , शतावरी , कडू पडवळ , कडूलिंब , चंदन यांच्या काढ्यांत साखर घालून , आई व बालक यांस द्यावें .
द्वंद्वं दुष्ट हि योगाभ्यां पूर्वोक्ताभ्यां विशोधयेत । वरीलपैकी कोणतेही दोन दोष दुधांत असतील तर पूर्वोक्त दोन दोन योगांनी दूध शुद्ध करावें .
स्तन्ये त्रिदोषसंदुष्टे शकदामं जलोपमं ।
नानावर्णरुजं चार्ध विबद्धमुपवेश्यते ॥
त्रिदोषयुक्त स्तन्य असल्यास , बालक पाण्यासारखा आमयुक्त , अनेक वर्ण व अर्धा बांधलेला असा मुर्डी विसर्जन करतो .
पाठा मूर्वी च भूनियदारुशुंठीकलिंगका । सारिवा तगरं तिक्ता भवेत् स्तन्यविशोधनं ।।
पहाडमूळ , मोरवेल , किराईत , देवदार , सुंठ , इंद्रजव , उपलसरी , तगर आणि कुटकी यांचा काढा घेतला असतां स्तनातील दृध शुद्ध होते .
नागरमोथा
Cyperus rotundus
कुल-मुस्तककुल cyperaceae
नीघण्टु ग्रंथातुन भद्र ,नागर, कैवर्त ह्या जाती आढळतात.
पण नागरमुस्तक श्रेष्ठ आहे.
हा तृणजातीय क्षुपातील 0.33 ते 1 मीटर उंच वाढतो.
फुलांचा दांडा झाडाच्या टोकापासून नीघतो.
फळ -लांबोडे
मुळ-ऐक ते 3 से.मी.मोठे काळसर व सुंगधी असते.
मुळात वसा, साखर ,गोंद, पीष्टमय पदार्थ ,अल्बुमीन, क्षार सुंगधी तेल व बी सिस्टेस्टौराॕल असते.
गुण -लघु रुक्ष रस - कटु तिक्त कषाय.
विपाक -कटु
वीर्य -शीत
उपयोग - मूळ
चुर्ण 1 ते 3 ग्रॕम
काढा 60 ते 100मी.ली.
प्रजननसंस्थान - मुस्तक हा गर्भाशय संकोचक आहे . तसाच तो स्तन्यशोधन करून स्तन्यवृध्दी करणारा आहे .
पाठाशुंठ्यमृतासमुस्तमूर्वेद्रयवाः स्तन्यदोषहराः परम् /
मुस्तादिगण - स्तन्यामयघ्नाः मलपाचनाश्च ॥
वा . सू . अ . १५ ,
सूतिकारोग व स्तन्याच्या अनेक विकारांत उपयोगी पडतो .
वातवाहीण्यांना बल्य आहे.रक्तातील क्लेद कमी करतो.स्तनवृद्धी करुन स्तनाला सुडोल करतो.
शिवाय स्तनातील सर्व पेशी रसवाहिन्या निर्मळ ठेवतो.
स्त्रीयांनी नेहमी नागरमोथा चुर्ण लावुनच स्नान करावे.ज्यायोगे सर्व ग्रंथी निरोगी राहतील.
नाडीसंस्थान - मेध्य व वातवाहिन्यांना बल्य आहे . त्यामुळे मेंदूच्या दौर्बल्यात , अपस्मारात याचा कल्क दुधात देतात .
पाचनसंस्थान - नागरमोथा हा पाचनसंस्थेवरील एक उत्कृष्ट औषध आहे . त्याच्या तिक्त गुणाने दीपन , रोचन , मलपाचन ( मुस्तावचाग्नि द्विनिशा द्वितिक्ता .... मलपाचनाश्च ॥ वा . सू . अ . १५ )
ग्राही , तृष्णानिग्रहण व कृमिघ्न अशी त्याची कार्ये असल्यामुळे अरूचि , छर्दि , अग्निमांद्य , अजीर्ण , संग्रहणी , अतिसार ( पयस्युत्क्वाथ्य मुस्तानां विंशति - स्त्रिगुणेऽम्भसि । हन्यादामं सवेदनम् । वा . चि . अतिसार ) यात उपयोगी , कृमीत मोठ्या मात्रेने द्यावा लागतो . मुलांच्या पचनविकारात नागरमोथा , काकडशिंगी व अतिविष हा संयोग अती उत्तम आहे . ( नाव - बालसंजीवनीचूर्ण )
रक्तवहसंस्थान - रक्तविकारांत नागरमोथा रक्तस्थित अग्निवर्धन करून रक्तातील क्लेद कमी करून उपयोगी पडतो . रक्तप्रसादन या गुणांचा प्रत्यय येतो .
श्वसनसंस्थान - आमाशयविकृती अथवा पाचनसंस्थान विकृतीजन्य कासश्वासात उपयोगी .
मूत्रवहसंस्थान - मूत्रल धर्म आहे . त्यामुळे मूत्रकृच्छ्रात उपयोगी . विशेषत : अतिसारासारख्या पाचनसंस्था दुष्टिजन्य मूत्रकृच्छ्रात उपयोगी पडतो .
नाडीसंस्थान - मेध्य व वातवाहिन्यांना बल्य आहे . त्यामुळे मेंदूच्या दौर्बल्यात , अपस्मारात याचा कल्क दुधात देतात . संदर्भ -द्रव्यगुणविज्ञान भाग 1 व 2
असा हा नागरमोथा अॕटिंव्हायरल म्हणूनही फार उपयोगी आहे.आता करोणाचे संसर्गात तर याचा चहा करुन प्यावा .
डोक्यातील कोंडा व केसासाठी याचे तेल उपयुक्त .
हिंदुस्थानात प्राचीन काळी प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले गेले आहेत . आज त्या ग्रंथांचा अंशही आपणास पाहावयास मिळत नाही . इंग्रजांचे राज्य असल्यामुळे व त्यांची विद्या राजमान्यता मिळाल्यामुळे विकास पावत आहे . आणि त्यामुळे आमच्या पूर्वजांचे कित्येक ग्रंथ त्याचप्रमाणे नाना तर्हेची विद्या नष्ट होत आहे .
कष्टं शिष्टक्षतिकृति कलौ कार्यमृच्छन्ति विद्या । ” असे उद्वेगजनक वाक्य कित्येक लोकांच्या मुखांतून बाहेर पडत आहे याचे कारण हेच आहे . याकरिता आमच्या सुशिक्षित वर्गाने , ज्यांची बुद्धी विशाल आहे , ज्यांना ईश्वराने अनुकूलता दिली आहे , अशा सद्गृहस्थांनी या उद्वेगजनक गोष्टीचा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची फार आवश्यकता आहे .
" -शंकर दाजीशास्त्री पदे [ इ . स . १८ ९ ३ साली लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून ]
1893 आवृत्ती चे वाक्य 150वर्षे मुठभर ईंग्रजांनी राज्य केल. आता 70 वर्षे झाली तरीही पाश्चिमात्य संकृती आपल्यातुन जात नाही .चला सर्वांनी पुन्हा भारताचा हा सुंदर वारसा वाढवूया.
टिप-
माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावी.
लेखक उगले डाॅक्टर पंढरपुर
0 Comments