#सुरणकंद
टिप- पित्तज उष्ण प्रकृतीत सुरण वापरु नये.
वेदात वनस्पती पुजा व वनस्पती स्तुती भरभरून दिली आहे.
चला आज सुरण ची माहीती घेउ
लॅटिन नाव - - Amorphophallus campanulatus . Blume . सूरण .
स्वरूप ३० सें.मी. ते १ मीटर उंचीचे बळकट असे वर्षायू क्षुप .
कन्द जमिनीत अधिक दिवस राहतो .
पर्ण ३० सें.मी. ते १ मीटर रुंद , अनियताकार खंडात किंवा पर्णदलात विभक्त ; गडद हिरव्या रंगाच्या , ग्रंथीयुक्त व ३० सें.मी. ते १ मीटर लांबीच्या पर्णवृन्ताच्या टोकाला येणारे .
पुष्प - एकलिंगी . स्त्रीपुष्प ७ सें.मी लांब व ५ सें.मी. व्यासाचे , वांगी रंगाचे .
पुंपुष्प - फिकट पिवळे परागकोश असलेले .
फळ -लाल , १ सें.मी. लांब , त्यात २ ते ३ बिया . कन्द १५ ते २५ सें.मी .. व्यासाचे , तपकिरी , अर्धगोलाकार व वरच्या बाजूला चपटे .
प्रकार ग्राम्य व वन्य .
ग्राम्य प्रकारांची लागवड करतात .
उत्पत्तिस्थान भारत व श्रीलंका .
उपयुक्तांग कन्द .
कन्दशाखात श्रेष्ठ .
गुण कटु , कषाय ,
विपाक - कटु .
वीर्य - उष्ण . मु . गुण - लघु , रूक्ष , तिक्ष्ण .
मात्रा चूर्ण १ ते ३ ग्रॅ .
कल्प सूरणमोदक , कांकायनगुटी , सूरणवटक .
सावधानतेची सूचना -उष्ण असल्याने त्वचारोग , रक्तपित्त इ . पित्तज विकारांमध्ये वापरू नये . पुटपाकपद्धतीने भाजलेला सूरण अधिक गुणकारी .
सुरणाने त्रास झाल्यास ताक , लिंबाचे सरबत किंवा चिंचेचा कोळ वापरावा .
संदर्भ - द्रवगुणविज्ञान
सुरण हिंदुस्थानांत बहुतेक भागांत होतो . तरी मलबार येथे याचे पीक फार आहे . हा कंद चैत्र वैशाखांत लावतात व मार्गशीर्ष - पौषामध्ये तो खणून काढतात . कोणी कोणी तो मोठा व्हावा म्हणून तीन वर्षेपर्यंत जमिनींत ठेवतात .
असा ठेवलेला सुरण एक ओझ्याचादेखील असतो .
सुरणाची आकृति वाटोळी चाकासारखी असते .
साधारणपणे सुरणाचे वजन मण पाऊण मण असते .
यांत दोन जाती आहेत . एक खाजरी आणि एक गोडी . खाजरा सुरण खाल्ला असता तोंड सुजते व अनेक विकार होतात . परंतु तो औषधास उपयोगी पडतो .
हे सुरण पांच सहा वर्षेदेखील जमिनींत असतात .
देशावर सुरणाची उत्पत्ती फारशी नाही . सुरणाच्या झाडाचा सोट मनगटाएवढा असून , त्यावर विस्तीर्ण छत्रीसारखें पान असते . दांड्याचा रंग पांढरपट असून त्याजवर शुभ्र रंगाचे ठिपके व चट्टे जागजागी असतात .
सुरण हा अर्शरोगनाशक आहे . म्हणून यास ' अर्शोन्नः ' असेंही नाव आहे .
सुरणास फाल्गुन - चैत्राच्या सुमारास फूल येते . त्याची भाजी सरस होते . याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करून खातात , व जून झाल्यावर मधल्या दांड्याची भाजी करितात . सुरणाची भाजी चांगली होते . या भाजीस तुपाची फोडणी देतात .
सुरण उष्ण व पौष्टिक आहे .
सुरण - रुचिकर , तिखट , उष्ण , अग्निदीपक , रुक्ष , तुरट , छेदी , लघु , पित्तकोपन , विशद , पाचक , मलस्तंभक ; व शूल , अर्श , गुल्म , कफ , कृमि , मेद , वायु , अरोचक , दमा , प्लीहा , खोकला , वांती यांचा नाश करितो .
हा रक्तपिती , कुष्टी व दुरोगी यांना हितकारक होत नाही .
याचा दांडा दिपन , रुन्य , लघु ; व वायु , कफ , अर्श यांचा नाश करितो .
( १ ) मूळव्याधी वर - सुरणाच्या कापट्या तुपांत तळून खावयास द्याव्या .
( २ ) आंवेवर - सुरणाचा कांदा वाळवून चूर्ण करावें व तुपांत तळून द्यावे , किंवा तुपात तळून साखर घालून द्यावें .
( ३ ) सुरणवटक , मूळव्याधीवर - सुरण वाळवून चूर्ण करून ३२ तोळे घ्यावे ; चित्रक १६ तोळे , सुंठ ४ तोळे , मिरे २ तोळे घ्यावी . साऱ्या औषधांचे चूर्ण करून त्याच्या दुप्पट गूळ घालून गोळ्या करून घ्याव्या , म्हणजे सहा प्रकारची मूळव्याध दूर होते . .
सुरणमोदक
(12 ग्रॕम ऐक तोळे प्रमाण )
चित्रकमूळ ४ तोळे , सूरण ८ तोळे , सुंठ २ तोळे , मिरी ८ मासे , व बिबवे पिंपळमूळ , वावडिंग , त्रिफळा , पिंपळी , तालीसपत्र , हीं तोळा तोळा , वरधारा ८ तोळे , काळी मुसळी ४ तोळे , दालचिनी व वेलदोडे ही आठ आठ मासे , ही सर्व एकत्र करून त्यांत सर्व चूर्णाच्या दुप्पट गूळ घालून त्याचे मोदक करावे . हा नित्य १ तोळा भक्षण करावा ; म्हणजे मूळव्याधीचा नाश होतो , व यापासून अग्निप्रदीप्त होतो . हा नित्य घेतला असता मोठा गुणकारी होतो . .
संदर्भ -आर्यभिषक् अर्थात हिंदुस्थानचा वैद्यराज ( भाग १ ते ८ एकत्र )
ईतरही महत्वाची माहिती ...
सुरण . Amorphophallus campanulatus .
वर्णनः - या प्रकारच्या सुरणाच्या दोन जाती आहेत . एक जंगली व दुसरी लागवड केलेली ; पैकी जंगली जात फार खाजरी असते.
सुरणाच्या भाजीने यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होतें . ह्या दोन कारणांमुळे मूळव्याधींत रक्त तुंबून राहात नाही आणि शिवाय अर्शातील रक्तवाहिन्यांचे संकोचन होते , म्हणून रक्त वाहणाऱ्या अर्शरोगांत सुरण फार हितावह होतो . सुरणास अर्शोघ्न हे नांव रास्त आहे . आंतड्याच्या रोगांत सुरणाची भाजी प्रशस्त आहे .
जंगली सुरण Amorphophallus sylveticus . अरण्यसूरण ;
मदनमस्त
वर्णनः - ह्या खाजऱ्या सुरणाची साल काढून तुकडे करून सुकवितात व ते दोरींत ओवून मदनमस्त ह्या नावाने विकतात . हे तुकडे उदी रंगाचे , सुरकुतलेले असून त्यावर पुळ्या असतात . पाण्यात भिजविल्यावर ते फुगतात , नरम होतात ; आणि जलदी कुसकरतां येतात . त्यास किळसवाणा वास येतो .
रुचि पिठुल , जरा कडू आणि तिखट .
रसशास्त्रः - यांत पुष्कळ पीठ असते .
उपयोगः - ह्यांच्या २० ते ३० गुंजाची पेज दूधसाखरेबरोबर करून वाजीकरणासाठी देतात . याने मूत्रमार्गास उत्तेजन येतें , शिश्नास खाज सुटते आणि तें जोराने उत्थित होते . ह्याच्याबरोबर स्नेहन पदार्थ द्यावे लागतात नाही तर केव्हां केव्हां फार त्रास होतो . हे औषध मूत्रपिंडाचे रोग असलेल्या पुरुषास देऊ नये .
कडू सुरण Amorphophallus dubias . नामः- ( सं . ) कढ तिक्त सूरण ,
वर्णनः ह्या सुरणाचा दांडा
जांभळ्या रंगाचा असतो .
संदर्भ -औषधी संग्रह .
हिंदुस्थानात प्राचीन काळी प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले गेले आहेत . आज त्या ग्रंथांचा अंशही आपणास पाहावयास मिळत नाही . इंग्रजांचे राज्य असल्यामुळे व त्यांची विद्या राजमान्यता मिळाल्यामुळे विकास पावत आहे . आणि त्यामुळे आमच्या पूर्वजांचे कित्येक ग्रंथ त्याचप्रमाणे नाना तर्हेची विद्या नष्ट होत आहे .
कष्टं शिष्टक्षतिकृति कलौ कार्यमृच्छन्ति विद्या । ” असे उद्वेगजनक वाक्य कित्येक लोकांच्या मुखांतून बाहेर पडत आहे याचे कारण हेच आहे . याकरिता आमच्या सुशिक्षित वर्गाने , ज्यांची बुद्धी विशाल आहे , ज्यांना ईश्वराने अनुकूलता दिली आहे , अशा सद्गृहस्थांनी या उद्वेगजनक गोष्टीचा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची फार आवश्यकता आहे .
" -शंकर दाजीशास्त्री पदे [ इ . स . १८ ९ ३ साली लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून ]
1893 आवृत्ती चे वाक्य 150वर्षे मुठभर ईंग्रजांनी राज्य केल. आता 70 वर्षे झाली तरीही पाश्चिमात्य संकृती आपल्यातुन जात नाही .चला सर्वांनी पुन्हा भारताचा हा सुंदर वारसा वाढवूया.
टिप-
माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
साभार माहीती डाॅ.कैलास उगले पंढरपुर
0 Comments