।। गावगाड्यातील काम पाहणारे चौगुला व महार हे दोन अधिकारी त्यांची कामे व हक्क.।।
चौगुला- कुलकर्ण्याच्या खालचा तिसऱ्या क्रमांकावरील व महाराच्या वरचा चौगुले नावाचा अधिकारी, पाटलाला मदत करीत असे व कुलकर्ण्याच्या दफ्तराची काळजी घेत असे. पाटलाच्या दप्तराची काळजी घेणारा कुलकर्णी व कुलकर्ण्याच्या दप्तराची काळजी घेणारा चौगुला हा पाटलाचा लेकावळा (रक्षापुत्र) (अनौरस) किंवा त्या घराण्यातील लेकावळ्याचा असे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्या सारखी आहे. पाटलाच्याच घरातील एकास चौगुलापण दिले जात होते. गावगाड्याचा कारभार चालवत असताना कुलकर्ण्याकडून कोणती अफरातफर झाली तर ती चौगुल्या कडून उघडकीस येत असे. अस्या प्रकारे गावातील कारभार चाले. चौगुल्याचा गावातील हक्क हा कुलकर्ण्या नंतर चा. कुलकर्ण्यास जो हक्क होता त्या नंतर चा वाटा हा चौगुल्याचा असे. गावचा सारा वरुन करत असताना पाचलास व कुलकर्ण्यास चौगुला मदत करीत असे. त्या मोबदल्यात त्याला वाटा ही दिला जात असे. आणि गावातील जमिन असे.
या नंतर गावगाडा चालवत असताना अजून एक महत्वपूर्ण अधिकारी पद येत ते महार. महार हा अधिकारी जरी जातीने कनिष्ठ असला तरी त्याच्याकडे फार मोलाची कामे असत. प्रत्येक गावाला चहु बाजुनी तटबंदी असे. त्याच्या आधाराने गावच्या वेशीत गावावर पहारा ठेवणे हे काम करावे लागे. सारावसुलीच्या कामासाठी चावडीवर लोकांना बोलावणे, गावची स्वच्छता राखणे ही कामे त्यास करावी लागे.(यासाठी तो नोकर हि ठेवित असे) त्याला स्वच्छतेच्या कामाच्या मोबदल्यात मेलेल्या जनावराचे कातडे मिळत असे. महाराचे अधिकार आणि त्यांचे वतन पुढील प्रमाणे- गावात बैल व ढोरे मरतात, त्यांची कातडी खेरीज धुरेचा बैलाचा हक्क. दसरियाचे मांगाची परते घरोघर भरतात, त्याचे पांच नैवेद्य व पाच पैसे असा हक्क. (मांगाकडुन घेतला जाणारा कर वस्तु स्वरुपात व पैसे स्वरुपात.) पोळाच्या बैलाचा नैवेद्याचा हक्क. (जसा मंदिरात ह्क्क गुरुवाचा असे तसाच बैल पोळ्यात अधिकार महार या अधिकाऱ्याचा असे). दसरियाचा टोणगा सातीचा गावाभोवती फिरतो, त्या समागमे पेढ्याची घागर असते. ती पेढ्याची घागर व टोणगा हे महाराचा असे. आमचा महारांचा नवरा घोड्यावर काढण्याचा हक्क. गावातील सुगीच्या वेळेस प्रत्येक शेतकऱ्यांकडून धांन्याचा वाटा. व इतर अजून काही अधिकार होते. महारकिचे वतन हे या अधिकाऱ्याचे असे. ते जरी हलके वतन असले तर ते एक वतन होते. महारा नंतर येतो तो पाचवा अधिकारी म्हणजे पोतदार.
संदर्भ:-
¤ Administrative System of Maratha- डाॅ. सुरेंद्रनाथ सेन
मराठी अनुवाद
¤ मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था
¤ कित्ता पृष्ठ २२४
0 Comments