।। गावगाडा चालवत असताना कुलकर्णी याची कामे व त्याचे मानपान व गावाकडून मिळणारा कर. ।।
गावगाडा चालवत असताना पाटला नंतर ज्याचा माण असतो तो कुलकर्णी. गावातील कारभार पाहण्यासाठी पाटलासोबत जे अधिकारी असतात त्यातील दुय्यम (दुसरा) अधिकारी हा कुलकर्णी. कुलकर्णी हा बहुतांशी ब्राह्मण समाजाचा असे. पाटलाचे दप्तर सांभाळणे त्याचे काम तो पाटलाचा कारकून म्हणून काम पाही. पाटिल व कुलकर्णी यांच्यावर गावचा सारा सरकारात भरण्याची संयुक्त जबाबदारी असे. तो जर भरला नाही तर काही वेळेस त्यांना कारावास हि भोगावा लागे. जर शत्रु पक्षाच्या तावडीत सापडल्यावर काही वेळा त्याना कैद हि केला जाई नंतर खंडणी भरल्यावर सोडले जाई. नियमीतपणे गावचा कर भरण्याची संयुक्त जबाबदारी पाटिल व कुलकर्णी यांच्यावर असे. गावचा सारा न भरल्या बद्दल चे उल्लेख उल्लेख ऐतिहासिक साधनात मिळतात त्यातीलच एक उल्लेख तो म्हणजे पेशवेकाळात "मौजे किणगावच्या पाटील व कुलकर्णी यांनी १९२५ रुपयांची सारावसुली केली नाही व त्याचा भरणा केला नाही. म्हणून त्यांना त्या पैकी १६०० रुपयांची तरतूद करुन भरे पर्यंत मुक्त केले नाही. ज्या समयास राजकीय अस्थिरता असेल शत्रुच्या फौजा उतरल्या असतील अस्या परस्तिथीत गावच्या चांगल्या वर्णनासाठी गावच्या पाटलाने व कुलकर्णी यांनी जामीन रहावे लागत असे. तसेच गावातून एखादी मान्यवर व्यक्ती प्रवासा दरम्यान पुढे जात असेल तर त्या व्यक्तीला पाटिल व कुलकर्णी यांना मदत करावी लागत असे. ज्या वेळेस ति व्यक्ती पुढच्या गावच्या वेशीत गेली कि त्यांची जिम्मेदारी संपत असे.
पाटला नंतर कुळकर्णी यांचे मानपान व मिळकत- दिवाणातून शिरपाव पाटलामागुन घ्यावा. पाटलांनी घेतल्या नंतर. दिपवाळी दसरा वाजविणे पाटलामागे (पटलाच्या नंतर चा माण) तेलियाचे तेल दर दुकानास दररोज नवटाक घेणे. माळियाची सेव सवाजी पाटलामागे (माझ्याकडून भाजी घेणे). चांभाराचा जोड वर्षास एक. कोळीयाचे पाणी पाटलामागे (कोळ्याने पाटलाचे पाणि झाल्यावर कुलकर्णी यांचे भरावे.) लाकडाची मोळी सणाची एक. शाईस तेल व रुमाल गावापैकी. तांबोळी याकडील पाने पाटील घेईल त्याची निमे घ्यावी. गावातील देवाचे उत्पन्न जर पाटिल कुलकर्णी यांना असेल तर त्यातील पाटलांचा हिस्सा झाल्यावर मग कुलकर्णी यांचा मान. भंडार प्रसाद पाटलामागे अश्विन आदितवारी महिन्यात ऊद पाटीलामागे एक वारी घ्यावे. (गावच्या यात्रेतील कर पाटलाच्या नंतर). यात्रेतून कर स्वरुपात जे वसुल होईल त्या सर्व गोष्टीत पाटलाच्या नंतर चा माण. बारा बलुतेदारांच्या कडून वस्तु स्वरुपात कर.
¤ भा.इ.स.म. तृतीय संमेलनवृत्त,
¤ मराठ्यांच्या इतिहासाची साधने- वि.का. राजवाडे,
¤ Administrative System of Maratha- डाॅ. सुरेंद्रनाथ सेन
मराठी अनुवाद
¤ मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था- सदाशिव शिवदे
0 Comments