बाराव्या शतकातील नागांची अधिष्ठात्री मनसा देवीचे प्राचीन शिल्प 👇( पूर्व भारतातील पाल साम्राज्यातील शिल्पकृती)
श्री मनसा मंगल काव्यातील काही पद्य :
वंदीतो वंदीतो पद्मा माता विषहारी |
शंभुदुहीता मनसा आयुवृध्दी कारी ||
उमा विरहे कामुक शिवशंकर करी विर्यपात |
पद्मअंकुराच्या माध्यमातून दिव्यविर्य गेले पाताळात ||
त्या शिवविर्यातून जन्मली सुलक्षणा कन्याजाता |
पालन-पोषण करी तिचे महर्षी काश्यपासह कद्रूनागमाता,
वासुकीनागाची भगीनी ती सर्वविद्याशक्ती संपन्न- सिद्धीयोगीनी | विधी-हरीहर देई नाव शिवमानसकन्या "मनसा" म्हणूनी || निळकंठांचे केले तिने विषहरण तेव्हा पासूनी ती "विषहारी" म्हणूनी जगी ख्याता |
जरत्कारु मुनींची पत्नी आस्तिक मुनीची माता ||
नागकुळ हितकारी सदा त्रिभुवन पुज्जीता |
सर्पभय दुरकरी,दोषनिवारी जीवरक्षीता ||
दक्षिणांगी बेहुला, वामांगी सेवा करी नेता |
नवनागासनी विराजमान नागकुळाची माता ||
श्रावणमासी सर्पभयाचे उपद्रव सर्वत्र |
जनमानस मनसा चरणी करी प्रणिपात ||
कर्कसंक्रमण विशेषकाल शुक्लापंचमी मूळ तिथी |
विधिवत आचारावे मनसा पूजेची सर्व रिती ||
नवनाग शोभे वासुकी-तक्षक-शेष,कालीयादी |
नागकुळांची मूळ अधिष्ठात्री मनसा पद्मावती |
#Nagpanchami #नागपंचमी
0 Comments