Ticker

6/recent/ticker-posts

सिझेरियन दरवाढ व लज्जागौरी

सिझेरियन दरवाढ व  लज्जागौरी - वैद्य विश्वनाथ जाधव।
सर्व सस्तन (गाय, कुत्री, गाढवीण इ.) प्राण्यात गर्भाशय असले तरी त्यांच्यात सिझेरियन प्रमाण नगण्य असल्याचे कारण प्रसवेला प्रसूतीसाठी टेबलावर झोपविले जात नाही व आडवे होऊनच प्रसूती कळा घेण्याचे बंधन नसते. जोवर महिलांना प्रसूती कळा आवडीनुसार घ्यायला स्वातंत्र्य होते सिझर दर नगण्य होता. 

आधुनिक वैद्यक (Modern medicine) शास्त्राने प्रसवेचा , इच्छेनुसार कळ घेण्याचा , “मुलभूत” अधिकार हिसकावून घेतला.  प्रसवेला प्रसूती-टेबलावर (Obstetric table) आडवे पडून कळा घेण्याचा अलिखित नियम केला . आडवी पडलेली महिला नर्स व डॉक्टरला हाताळायला , तपासायला सोपी असते. ह्या सत्याचा उलगडा बी जे मेडिकल कोलेजच्या स्व. अनिल जुन्नरकर यांना मराठवाड्यात चाळीस वर्षापूर्वी गावात भटकताना झाला.Dr junnrkar was a Prof community Medicine in BJMC. मराठवाड्यातील महिला उभ्या अवस्थेत प्रसूती कळा घेऊन कमी वेळात, सहजतेने नैसर्गिकरीत्या प्रसूत होत असल्याचे त्यांना दिसले. 

कर्नाटकातील लज्जागौरी  व वेरूळ लेण्यातील 21 क्रमांकाच्या गुफेत उभ्या अवस्थेतील माता बाळाला जन्म देत असल्याचे शिल्प पाहून त्यांची खात्री पटली. मग त्यांनी प्रसूती-टेबलात थोडासा फेरफार करून डॉक्टर तसेच महिलांना सोयीचे होईल असे टेबल बनविले व 1993 ते 1998 या सहा वर्षात 1040 महिलांची प्रसूती त्या टेबलावर केली. 1040 पैकी 1017 (97 %) महिला नैसर्गिकरीत्या प्रसूत झाल्या व 23 महिलांचे सिझेरियन करावे लागले . सिझेरियन दर फक्त 3 % होता. 
      
शास्त्रीय भाषेत उभ्या अवस्थेला vertical Squatting Posture म्हणतात.  1040 पैकी 16 जणीचे आधीचे सीझर असूनही 15 जणीना सिझर करावे लागले नाही. 113 जणीचे, गर्भाच्या मानेभोवती नाळेचे वेढे असूनही, सिझर करावे लागले नाही.    

प्रश्न पडतो की झोपून कळा न घेता लज्जागौरी प्रमाणे उभे राहून कळ घेतल्याने कोणता फायदा होतो ? स्व. जुन्नरकर यांच्या मते , झोपून कळ घेताना बाळ (Foetus) बाहेर येण्याचा मार्ग (pelvic passage) अरुंद होतो , व सिझर करावे लागते. छाती व पोटातील पडदा(diaphragm)  उंचावून श्वास घायला त्रास होतो, बाळ गुदमरते व सिझर करावे लागते.
        
सरकारला व स्त्रीरोग तज्ञांना जर मनापासून सिझर दर कमी करायचा असेल तर, महिलेला कळ घेताना आवडेल ती स्थिती घेण्याचे स्वातंत्र  द्या. सगळ्या आरोग्य केंद्रात  Woman-friendly “जुन्नरकर टेबले” ठेवा, डॉ. फ्रीडमनने विकसित केलेला “प्रसूती आलेख” (Partograph) भरायचे निर्देश द्या. लज्जागौरी शिल्प व जुन्नरकराचे अद्वितीय संशोधन हा आपला वारसा आहे.

 फेसबुक पोस्टवरून साभार।

Post a Comment

0 Comments