उपयोगी कीती पहा//
जटामांसी चे वर्णन केसाळ व रानडुकराच्या केसासारखे असे ग्रंथात केलेले आहे.
हिमालयात जेथे बर्फ असतो तिथे येणारी हि वनस्पती ऐखाद्या तपस्वी साधू सारखी आहे.
खुप दिवस तप केलेली व जटा आलेली वनस्पती वाटायलाच हवी.तशीच परोपकारी .
जटामासी नीत्य घेत राहिल्यास रक्ताभिसरण नेहमी छान राहते.
आणि म्हणून रोजच्या चहात ती हवीच.
अर्जुनसाल सोबत ह्रदयाची गती व कार्य उत्तम ठेवते.
ब्राम्ही सोबत मेंदुचे कार्य बिघडु देत नाही.
सावधान-जटामासी रोज ऐक ते तिन ग्रॕम यावर घेउ नये .
वांती ,मुरडा होतो.
जटामांसी चे तेल उत्तम केशवर्धन आहे.
वडाचे पारंब्या व जटामांसी तेल ह्याचा केसांचे आरोग्य निरोगी ठेवन्यात फार छान उपयोग होतो.म्हणून गेली पंधरा वर्षे मी हे तेल वापरतो.
मज्जातंतु व मेंदुकार्य सुरळीत ठेवायच असेल तर जटामांसी रोज लहान मात्रेत घ्यायलाच हवी असा आग्रह राहील.
आणि हो जर तुम्हाला मानसिक आजाराच्या गोळ्या असतील तर मग हि नीत्य हवीच .
nardostachys jatamansi.
धर्म : -जटामांसी तिक्त , सुगंधि , कडू , कषाय , शीतल , वायुहर , संकोच विकासप्रतिबंधक , हृदयबल्य , रक्ताभिसरणास उत्तेजक , अस्रजित् , त्वग्दोषहर , ज्वरहर , वातहर , वेदनास्थापन , कपन , केशवर्धक , कांतिवर्धक आणि मोदकृत् आहे .
जटामांसीने भूक वाढते , पचन चांगले होते , परंतु कब्ज होत नाही .
हिने उदरांत गरमी आल्या सारखी होते , ढेकर येतात , सर्व अंग गरम होतें , घाम सुटतो , लघवी सुटते व नाडी सुधारते .
सावधान -मोठ्या मात्रेत उलट्या होतात , पोटांत मुरडा होतो आणि जुलाब होतात .
मेंदू व मज्जातंतूंवर हिची पौष्टिक व उत्तेजक क्रिया होत असते . लहान मात्रेत पुष्कळ दिवस देत राहिल्यास मन शांत होते .
मात्रा : -१० ते २० गुंजा .
उपयोग : -जटामांसी फार महत्त्वाचे व अतिशय उपयुक्त औषध आहे . ही जुनाट काळापासून सुगंधि द्रव्य व उत्तेजक औषध म्हणून वापरण्यांत आलेली आहे . मेंदूच्या व मज्जातंतूच्या रोगांत जटामांसी फार उपयोगी पडते . दारुड्यांना जखम झाली असतां किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली असता त्यांना एक तर्हेचा भ्रमणयुक्त कंप उत्पन्न होत असतो .त्यांत जटामांसीने शांतता येते .
अतिशय मानसिक काम पडून किंवा कोणत्याहि कारणाने मन अस्थिर झाले असतां थकवा येतो आणि नाडी लहान व त्वरित चालते , अशा स्थितीत जटामांसीने नाडीचा जोर सुधारतो व ती शांत होते .
अपतंत्रकांत जटामांसीने रोग्याच्या लहरी ( उचलं ) कमी होतात .
हे औषध स्त्री अशक्त असल्यास व अतिकाम आणि काळजीमुळे रोग उद्भवलेला असल्यास विशेष उपयोगी पडते .
मानसिक धक्का किंवा अतिशय मानसिक काम ( श्रम ) ह्यामुळे उद्भवलेलें भ्रमण किंवा मानसिक शांतता , जणू काय आघातच झालेला आहे , अशा स्थितीत जटामांसी त्वरित काम करते डोकेदुखीमध्ये जटामांसी उत्कृष्ट औषधापैकी एक आहे .
मेंदूच्या व मज्जातंतूच्या रोगांत देण्याची औषधे हिंग , कस्तूरी वगैरे औषधांपेक्षा जटामांसी जलदी जोराने व चांगले काम करते .
भूत लागल्याप्रमाणे
होणाऱ्या रोगांत जटामांसी
वाप रण्याचा प्रघात आहे .
ह्या रोगांत जटामांसीबरोबर ब्रह्मीचा अंगरस , वेखंड मधातून द्यावे .
रक्ताभिसरण नीट होत नसल्यास जटामांसी फारच उपयुक्त औषध आहे . मेंदूचे रक्ताभिसरण जास्ती झाल्यास मस्तकात रक्ताचा भरणा झाल्यासारखा वाटते व दुसरी कांही विवक्षित चिन्हें होत असतात आणि रक्ताभिसरण कमी झाल्यास मूर्छा येते , ऐकू कमी येते , डोळ्यांपुढे अंधारी येते , वगैरे चिन्हे होतात ; अशा स्थितीत जटामांसीने मेंदूतील रक्ताभिसरणाचा तोल सुधारतो .
हृदयाची शिथिलता , धडधड व काही हृदयाचे रोगांत उदरांत वायूचा संचय होत असतो , अशा स्थितीत जटामांसी इतर सुगंधि द्रव्यां बरोबर व नवसागरांतील वायू- ( अमोनिआ ) बरोबर देतात .
जटामासीची रक्ताभिसरणा वरील ही क्रिया खुद्द हृदयावर , रक्तवाहिन्यांवर , हृदय आणि संकोचनशिरास जाणारे मजातंतु व रक्ताभिसरणाचे केंद्रस्थान ह्यांवर घडते . हिने रक्तवाहिन्यांचे संकोचन होते म्हणून रक्तपित्त , विसर्प व रक्तस्राव ह्यांत जटामांसीने गुण येतो .
मिश्रणाज्वरांत किंवा शोथज्वरांत त्रिदोष वाढून रोगी थकतो व सन्निपाताची चिन्हें दिसू लागतात ; तेव्हां जटामांसी देण्याचा प्रघात आहे . तिने रक्ताभिसरण सुधारतें , मजातंतु व्यूहास जोम येतो , कंठांतील व श्वासनलिकेतील कफ सुटतो , अंगाचा दाह कमी होतो . व शोथ देखील होतो .
जटामांसीस त्रिदोषजित् म्हणून जी संज्ञा दिलेली आहे ती अगदी यथायोग्य आहे .
विषमज्वरांत हिचा फार उपयोग होतो .
जखमेवर व व्रणावर लेप केला असतां दाह व पीडा कमी होते .
मुखपाक रोगांत जटामांसीने आग व पीडा कमी होते . विसर्प , कुष्ठ व रक्तपित्त ह्या रोगांत जटामांसी पोटांत देतात व तिचा लेप करतात . हिने त्वचेची कांति सुधारते व केसहि वाढतात .
पीडितार्तवांत जटामांसीने पीडा कमी होऊन आर्तवहि नीट वाहण्यास लागते ; स्त्रियांचा महिना बंद होण्याच्या सुमारास किंवा बंद झाल्यानंतर काही विवक्षित चिन्हें होत असतात , तेव्हां जटामांसी फार उपयोगी पडते . हिंग , कस्तुरी व इतर वस्तूंपेक्षा देखील ही विशेष गुणकारक आहे .
शारीरिक जीवनविनिमयक्रिया बिघडून लघवीतून साखर जाते किंवा एक तर्हेचा मूत्रक्षार जातो , अशा स्थितीत जटामांसीने लघवींतील साखर व मूत्रक्षा कमी होतात .
हिने विनिमयक्रिया सुधारून शरीराचा नाश होत नाही .
संदर्भ -औषधी संग्रह
हिंदुस्थानात प्राचीन काळी प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले गेले आहेत . आज त्या ग्रंथांचा अंशही आपणास पाहावयास मिळत नाही . इंग्रजांचे राज्य असल्यामुळे व त्यांची विद्या राजमान्यता मिळाल्यामुळे विकास पावत आहे . आणि त्यामुळे आमच्या पूर्वजांचे कित्येक ग्रंथ त्याचप्रमाणे नाना तर्हेची विद्या नष्ट होत आहे .
कष्टं शिष्टक्षतिकृति कलौ कार्यमृच्छन्ति विद्या । ” असे उद्वेगजनक वाक्य कित्येक लोकांच्या मुखांतून बाहेर पडत आहे याचे कारण हेच आहे . याकरिता आमच्या सुशिक्षित वर्गाने , ज्यांची बुद्धी विशाल आहे , ज्यांना ईश्वराने अनुकूलता दिली आहे , अशा सद्गृहस्थांनी या उद्वेगजनक गोष्टीचा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची फार आवश्यकता आहे .
" -शंकर दाजीशास्त्री पदे [ इ . स . १८ ९ ३ साली लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून. ]
स्वतंत्र होउन सत्तर वर्षे होउनही आपण अजुनही
भारतीय परंपरा जपत नाही. चला प्रयत्न करुया व अमुल्य ठेवा जपुया
टिप-
माहिती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.
डाॕ.लिलाधर देवराव उगले
पन्नासवर्ष अविरत होमीओपॕथी सेवा.
डाॕ.कैलास लिलाधर उगले
पंचवीस वर्षे आयुर्वेद हर्बल संशोधनात्मक उत्पादन व अॕक्युंपंक्चर सेवा.
कु.कीर्ती कैलास उगले
student of B.A.M.S.
सर्व प्रकारचे शास्त्रशुद्ध पदध्तीने तयार केलेले आयुर्वेदिय वेदनाहारी तेल , केशवर्धक तेल,धन्वंतरी हर्बल चहा ,दंन्तमजंन ,विषाणूरोधक तेलाची उदबत्त्ती, धूप ,ह्रदयासाठी काढे,सुवर्णयुक्त अमृतप्राश ,च्यवनप्राश सर्व प्रकारचे चुंबकीय साहीत्य सर्व प्रकारच्या गोळ्या योग्य दरात तयार करुन मीळतील.
#Dr_Kailash_Ugale_Shree_Vitthal_Herbals_Pandharpur
0 Comments