Ticker

6/recent/ticker-posts

क्षत्रिय_मराठा_राष्ट्रकूट_राजवंश

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास भाग 
#क्षत्रिय_मराठा_राष्ट्रकूट_राजवंश
-------------------------------------------
क्षत्रिय मराठा चालुक्य राजवंशाच्या वातापी शाखेच्या 222 वर्षाच्या कारकिर्दीनंतर वातापी चालुक्य राजवंशाच्या असता नंतर म्हणजेच इसवी सन 757 नंतर उदय झाला राष्ट्रकूट राजवंशाचा. राष्ट्रकूट राजवंशाचा मूळ पुरुष #दंतिदुर्ग होता. दंतीदुर्गाच्या अगोदरील राष्ट्रकूट राजे हे चालुक्य राजांचे मांडलिक होते राष्ट्रकूट राजवंशाचे मूळ स्थान #वेरूळ होते. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्गाने वातापिच्या चालुक्य वंशातील शेवटचा शासक #किर्तीवर्मन_द्वितीय चा पराभव करून स्वतःला स्वतंत्र घोषित केले व महाराष्ट्रात राष्ट्रकूट वंशाची स्थापना केली. राष्ट्रकूट वंशाचा कार्यकाळ इसवी सन 757 ते इसवी सन 973 पर्यंत होता म्हणजे सुमारे 216 वर्षे राष्ट्रकूट राजांनी महाराष्ट्र, कर्नाटक व आसपासच्या प्रदेशावर राज्य केले. राष्ट्रकूट साम्राज्याची राजधानी सुरुवातीला #मयूरखंडी होती म्हणजेच कर्नाटक राज्यातील बसवकल्याण जवळील महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेलगत आताचे #मोरखंडी हे गाव होय.  
नंतर राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष प्रथम ने ती #मान्यखेट ला स्थलांतरित केली. राष्ट्रकूटांची भाषा संस्कृत, कन्नड व प्राकृत महाराष्ट्री होती.

राष्ट्रकूट राजवंशात अनेक राजे झाले त्यापैकी काही महत्त्वपूर्ण राजांची वंशावळ पुढे देत आहे.
●दंतिदुर्ग
●कृष्ण पहिला
●गोविंद दुसरा
●ध्रुव किंवा धरावर्ष
●गोविंद तिसरा
●अमोघवर्ष
●कृष्ण दुसरा
●इंद्र तिसरा
●अमोघवर्ष दुसरा
●गोविंद चौथा
●अमोघवर्ष तिसरा
●कृष्ण तिसरा
●खोट्टिग अमोघवर्ष चौथा
●कर्क दुसरा

राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग ने चालुक्य राजा द्वितीय किर्तीवर्मनच्या पराभवानंतर परमेश्वर, परमभट्टारक, महाराजाधिराज या उपाध्या धारण केल्या. त्यानंतर त्याने उज्जैन विजयानंतर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात #हिरण्यगर्भ व #तुलापुरुषदान यज्ञ केला. त्यावेळी गुर्जर प्रतिहार वंशातील एक राजा दंतिदुर्गाने द्वारपाल म्हणून उभा केला होता.
तिकडून परत आल्यानंतर दंतिदुर्गणे वेरूळ येथे दशावतार मंदिर बांधले.


दंतिदुर्ग नंतर त्याला पुत्र नसल्याने त्याचा चुलता #कृष्णराज_प्रथम गादीवर आला याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे याने जगप्रसिद्ध वेरूळ येथील #कैलास_मंदिर बांधले. हे कार्य त्याने पैठण येथील #कोकस नावाच्या शिल्पकाराकडून करून घेतले. त्यानंतर त्याचा पुत्र #गोविंद_द्वितीय गादीवर आला. त्यानंतर त्याचा पुत्र राजा #ध्रुव किंवा #धारावर्ष गादीवर आला त्याने उत्तर भारतातील गुर्जर प्रतिहार वंशातील राजा #वत्सराजा चा पराभव केला. याने उत्तर भारतातील राजकारणात हस्तक्षेप केला कन्नौजच्या त्रिपक्षीय संघर्षात भाग घेतला. त्यानंतर त्याचा पुत्र गोविंद तृतीय गादीवर आला.

#गोविंद_तृतीय हा राष्ट्रकूट वंशातील सर्वात पराक्रमी राजा होता याने कन्नोजच्या त्रिपक्षीय संघर्षात भाग घेऊन विजय प्राप्त केला. त्यानंतर त्याने श्रीवल्लभ व पृथ्वीवल्लभ या उपाध्या धारण केल्या. याने उत्तरेतील पालवंश व गुर्जर प्रतिहार वंश या दोन शक्तिशाली राजवंशातील राजांचा पराभव केला व उत्तरेत राष्ट्रकूट साम्राज्याची सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर त्याने दक्षिणेतही कांची आंध्रप्रदेश व श्रीलंका हे सर्व प्रदेश जिंकले व दक्षिणेत देखील राष्ट्रकूट साम्राज्याची सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे याच्या घोड्यांनी हिमालयापासून तर कन्याकुमारी पर्यंतचे पाणी पिले आहे असे म्हटले गेले.

त्यानंतर #अमोघवर्ष_प्रथम गादीवर आला याने नृपतुंग वीरनारायण व कवीवल्लभ या उपाध्या धारण केल्या. याने राजधानी मयूरखंडी वरून #मान्यखेट ला स्थलांतरित केली मान्यखेट म्हणजेच सध्याच्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील #मालखेड हे गाव होय. हा लेखक होता याने रत्नमालिका व कविराजमार्ग हे दोन ग्रंथ लिहिले. याच्या दरबारात जिनसेन, महावीराचार्य व शाकतायन हे कवी व लेखक होते. यापैकी जीनसेन ने आदीपुराण म्हणून ग्रंथ लिहिला महावीराचार्य ने गणितसारसंग्रह हा ग्रंथ लिहिला आणि शाकतायन ने अमोघवृद्धी हा ग्रंथ लिहिला. शाकतायन हा जैन पंथीय होता त्याच्या प्रभावाने अमोघवर्षाने देखील जैन पंथ स्वीकारला होता. 

त्यानंतर #कृष्ण_द्वितीय गादीवर आला याचा कार्यकाळ चालुक्य राजांशी संघर्षात गेला त्यानंतर #इंद्र_तृतीय गादीवर आला त्यानंतर #अमोघवर्ष_द्वितीय गादीवर आला त्यानंतर #गोविंद_चौथा गादीवर आला त्यानंतर #अमोघवर्ष_तिसरा गादीवर आला त्यानंतर #कृष्णराज_तृतीय गादीवर आला याने चोल राजा #परांतक_प्रथम चा पराभव केला त्यानंतर त्याने रामेश्वरम येथे सुंदर मंदिर व विजयस्तंभ यांचे निर्माण केले त्यानंतर त्याने कांची व तंजावर विजय मिळवून तंजयकोंड उपाधी धारण केली. त्यानंतर #अमोघवर्ष_चतुर्थ गादीवर आला त्यानंतर #कर्क_द्वितीय गादीवर आला. हा राष्ट्रकूट राजवंशातील शेवटचा राजा होता याला कल्याणीच्या चालुक्य राजवंशातील राजा #तैलप_द्वितीय ने पराभूत केले अशा प्रकारे राष्ट्रकूट साम्राज्याचा अंत झाला व कल्याणीच्या चालुक्य राजवंशाची स्थापना झाली.

आजच्या क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील #राठोड व #शंखपाळ आडनावाचे लोक राष्ट्रकूटांचे वंशज आहेत.

#राष्ट्रकूट
#मराठा
#क्षत्रिय
#जय_भवानी
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#जय_महाराष्ट्र
#हर_हर_महादेव🚩

लेखक :- आशिष इंगळे पाटील.

Post a Comment

0 Comments