Ticker

6/recent/ticker-posts

बेलफळाचे फायदे

*बेल - आरोग्यदायी फायदे -* 
बेलफळ प्रोटिन्सचा अत्यंत उपयोगी स्रोत आणि टॉनिकही आहे. थंडावा प्रदान करणारा आहे. बेलफळात अ‍ॅंटीबायोटिक गुण असतात. डायरिया, हगवण, बद्धकोष्ट, अपचन या व्यतिरिक्त बेल अमिबिक डिसेंट्री आणि पोटदुखीतही बेलफळ उपयोगात येते.

◼️बेल या वनस्पतीचे जेवढे अध्यात्मिक  महत्त्व आहे. तेवढेच आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे.


◼️बेलाच्या पानाचा 30ml रस रोज सकाळी उपाशीपोटी पिल्याने मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो.
◼️बेलाच्या पानाचा दोन दोन थेंब रस डोळ्यांमध्ये टाकल्याने डोळ्याचे विकार दूर होतात.

◼️ज्या लोकांमध्ये मानसिक अस्थिरता असते अशा लोकांनी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची तीन-चार पाने चावून खावीत.
◼️दहा-पंधरा बेलाची पाने चेचून एक कप तिळाचे तेल गरम करून घ्यावेत हे तेल कानामध्ये टाकल्याने कानाच्या समस्या दूर होतात.

◼️बेलाच्या पानाचा रस पिल्याने किडनी व यकृताच्या समस्या दूर होतात.

◼️कच्चा बेलफळाचा रस पिल्याने पोटाच्या समस्या जसे पोटामध्ये मुरडा येणे पोट दुखणे आतड्यावर सूज असणे अल्सरेटिव कोलाइटिस यासारख्या समस्या दूर होतात.

◼️ बेल पानाचा रस 30 ते 40 ml सकाळी उपाशीपोटी पिल्याने हृदयाच्या सर्व समस्या निघून जातात व त्याचे कार्य सुधारते.

◼️बेलफळ हे शरीरातील उष्णता नष्ट करण्यासाठी खूप गुणकारी आहे.

◼️बेल पानाचा रस नियमित पिल्याणे शरीरामध्ये रक्त वाढ होते. व कॅन्सरसारख्या आजारापासून शरीराचे रक्षण करते.

◼️सात ते आठ बेलपान चा एक कप काढा बनवून सकाळी उपाशीपोटी पील्याने शरीरामधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रनात ठेवते.

◼️बेलाच्या पानाचा रस ४-५ चमचे सकाळी उपाशीपोटी पिल्याने अपचन गॅसेस मलावरोध यासारख्या समस्या त्वरित नष्ट होतात.

◼️बेल या वनस्पतीचे पानाचे फळाचे सालीचे मुळीचे अध्यात्म मध्ये वेगवेगळे फायदे आहेत. आरोग्य मध्येही खूप गुणकारी फायदे आहेत. या वनस्पतीचे संवर्धन केले पाहिजे संगोपन केले पाहिजे. आपले आजार नष्ट करण्यासाठी निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी वापर करावा.

वात विकार असणार्‍यांना तसेच कफाची व्याधी असणार्‍यांनाही बेलामुळे आराम मिळतो. अपचनामुळे अनेकांना भूक न लागण्याची समस्या निर्माण होते. अशांनी बेल नियमित खाल्ल्यास त्यांना भूक लागणे सुरू होते. पोट साफ नसल्यास तसेच अपचन झाले असल्यास आपल्याला अनेक व्याधींना तसेच शरीराच्या अनेक तक्रारींना तोंड द्यावे लागते. अशा रुग्णांनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी 20 ग्रॅम बेलफळ खाल्ल्यास उपयुक्‍त ठरते. बेलफळ खाण्यापूर्वी त्यातील बी काढून टाकली पाहिजे. उष्णता, आतड्यांच्या व्याधी, बद्धकोष्टता यासारख्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये बेलाचे सेवन उपयुक्‍त ठरते. काळ्या मिरचीबरोबर बेलाच्या पानांचा रस घेतल्यास अपचनाच्या तक्रारी दूर होतात.

*....निरोगी राहा आनंदी राहा...*

*सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया |*
*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत् ||*

Post a Comment

0 Comments