Ticker

6/recent/ticker-posts

पावनखिंड स्पर्धा

प्राचीन काळी ग्रीस देशामधे मॅरथॉन नावाचे एक पठार होते. तिथे एक लढाई झाली असता, ती लढाई जिंकल्यावर, ती बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथपासून ते अथेन्सपर्यंत धावत गेला होता.
ते अंतर ४२.१९५ किमी होते. ज्या गावी लढाई ही झाली, त्या गावाचे नाव 'मॅरथॉन' हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या जगभर स्विकारले गेले. दुर्दैवाने अतिश्रम होऊन तो पोहोचताच विजयाचा निरोप देऊन मरण पावला.
या सैनिकाचे नाव फेडापेद्दीस. काही इतिहासकार तो ३५ किमी पळाला असे म्हणतात. ते काहीही असो. पण याची दौड अजरामर झाली. फेडापेद्दीस, ४२ किमी पळाला. रिकाम्या हातानी पळाला. 

आणि आमचे मावळे ? आषाढी पौर्णिमेला गुरुवार १२ जुलै, १६६० च्या पावसाळी रात्री पन्हाळा ते पावनखिंड हातात शस्त्र आणि पाठीवर शत्रू घेऊन मुसळधार पावसात दगड धोंडे तुडवत पळाले.

किती? ३५ नाही, ४२ नाही तर तब्बल ५२ किमी. आणि बलाढ्य शत्रूशी लढले. कुठे आहे याची जगाच्या इतिहासात नोंद?

असणारच नाही! आम्ही आमच्या कर्माने इंग्रजांचे गुलाम झालो. त्यांनी आमचा इतिहासच बदलून टाकला आणि आम्हीच आम्हाला लुटारू म्हणू लागलो.

जाऊ दे. इंग्रज परकाच होता. उलट्या काळजाचा होता. तो जातीवरच जाणार. पण आम्ही? आम्ही का आपला इतिहास विसरलो?

आम्हाला आपल्या इतिहासाचा सार्थ अभिमान का नाही???

Post a Comment

0 Comments