Ticker

6/recent/ticker-posts

सराटा गोखरु

सराट्याची फळांची ची भाकरी/
ठेच्या सोबत मजाच न्यारी// 
टिप  -सराटा / गोक्षुर /गोखरु तीनही नावाने ओळखला जातो.
सहसा गुण लवकर देतो .
यातील साईड ईफेक्ट नसलेले स्टिराॕईड, स्टिराॕल, नायट्रेटस, सॕपोजेनिन, किंफेराॕल नामक क्षारतत्वे ,राळ, टॕनीन ,थोड्या प्रमानात ग्यायकोसाईड्स ही लवकर उपयोग देतात.गोक्षुर पाने (सराटा पाने) भाजीत चालते पण फळ घेतांना प्रमाणात घ्यावी .
आयुर्वेदात गुग्गुळ प्रमाण अगदि वैद्दाने रुग्णाची प्रकृती बघुन ठरवाव लागत गुग्गुळात आठ अतिमहत्वाचे  स्टिराॕईड असतात ते कुणीही कसेहि घेउन चालत नाही.
मात्र सराट्यास तसे बंधन नाही 
खेड्यातील जनता बिनधास्त सराटा भाजी व फळ वापरतात व कंबर, मनके ,मुत्रल अवयव कीडण्या निरोगी ठेवतात.
चला आज या सराट्याची माहिती घेऊया. 
माझ्या भारत देश्यात जो पिकवतो तो उपाशी अन् नोकरदार व श्रींमत व्यापारी तुपाशी. 

अशी भयानक वास्तविकता आहे.
अन्न तर रोज ऐवढे वाया जाते की त्याचे नियोजन केले तर ऐकही गरीब उपाशी झोपनार नाही. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हनतात 
धन हे गरीबाच रक्त समजोनी वागोत श्रींमंत/
श्रम ही गावाची दौलत /म्हणोनी व्हावा मान तीचा//(ग्रामगीता)..
हेच जराशे जरी धन गरीबाच्या पोटासाठी लावले तर आपल्या पोषनकर्त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागनार नाही.
आता हायब्रीड मुळे पोट भरते पन सकस आहार मिळत नाही.
लहानपणी गरीबांच अन्न धान्यातील कोंडा असायच मीलो ज्वारीची मला फार आठवन आहे .
त्यातीलच सराट्याचे बी[फळ] दळुन त्याच जरा ज्वारीचे पीठ टाकुन केलेली गरीबाघरची भाकर चटणी टाकुन मी मोगरा ऐक लहानस खेड [अमरावती जवळ प्रॕक्टीस करायचो तीथे] नेहमी खायचो.
त्यावेळी ऐवढ पोस्टीक अन्न असायच की व्हीटामीन अन प्रोटिन वरुन घ्याव लागत नव्हतच.ज्वारी भाकरी खाने नित्याचेच.
गहु म्हणजे फार महाग व श्रींमंत जेवण  अन आता भाकरी ला महत्त्व आले.
आता अशी भाकरीची मेजवानी कुठं मिळत नाही मग घरात अंगनातच चुल मांडुन सौ. आमच्या ईच्छा पुर्ण करते.
पिझ्झा बर्गर अन सॕडवीच जमान्यात तुमच्या आरोग्याच सॕडवीच होत आहे.
अजुनही वेळ गेली नाही चला वळुया आपल्या पुर्वजांनी दिलेल्या आहार विहाराकडे. अन आरोग्य अबाधित ठेउ या. 

गोक्षुर /गोखरु अर्थात सराटा-गण- मुत्रविरेचन, शोथहर, कृमीघ्न, वाताश्मरी भेदन,
कुल - गोक्षुरकुल 
जमीनीवर पसरनारे क्षुप 0.5 ते ऐक मीटर लांब वाढणारे,हरबर्याचे पानासारखे पान ,फुले लहान पीवळ्यारंगाची ,फळ थोडे पंचकोनी ,2/3 तीष्ण काटे असनारे,बीया पुष्कळ असतात .मुळ दहा ते तेरा से.मी.लांब धुरकट रंगाचे उग्रगंधी व गोडसर असते.
जाती दोन आहेत
1)बृहत (तीलकुलात मोडणारी)
2)लघु
मोठ्याचे फळ व पान मोठे असते.
(चींबुक कोट म्हणजे गोखरु नव्हे.)
उत्पती - संपुर्ण भारतात विशेषत्ः उत्तर व दक्षीण भारतात
माझ्यामते लहान काटे असलेला सराटा नाडीसंस्थान वातश्यामक आहे,व मोठा काट्याचा अश्मरी व मुत्रल विकारात उपयोगी पडतो.
तसेच सराटा (गोखरु)आमाशयशबल्य,, ग्राही कृमीघ्न ,अधीक मात्रेत सारक.रक्तपीत्तश्यामक, शोथघ्न मुत्रल, बारीक मुतखडेनाशक, बल्य [शुक्रानु वाढवतो], नाडीदौबर्ल्य, कास, स्वास यात उपयोगी पडतो.
उपयुक्तांग -फळ मुळ पचांग
मात्रा -फळचुर्ण 2.5 ते 5 ग्रॕम काढा 60ते 100मी,ली.
विशेष-मुत्रकृच्छनाशकत्व हा गोखरुचा गुण आहे,
गोखरु ची हरभरा सारखे पानांची भाजी पावसाळ्यात खुप मीळते .ती घराघरात खावीच,ज्वारी पीठात भाकरीमागे दोन चमचे गोखरु बि दळुन आणून हीभाकरी आठवड्यातून तरी खावीच ज्या योगे कंबर गुडघे झीज होनार नाही .
वातनाडी छान राहील .
मुत्रल व कीडणी विकार तुमच्या जवळसुद्धा फीरकणार नाही.
चला तर मग अशी मस्त व स्वस्त भाजी व भाकरीचा स्वाद व लाभ नक्कीच घेउ या.
(काही अजुन संदर्भ बघुया,खालील लेख वाचावा) 

* शास्त्रीय नाव-ः Tribulus terrestris (ट्रायब्युलस टेरिस्ट्रिस) 
* कुळ ----phyllaceae झायगोफायलेसी 

स्थानिक नावे - गोखरू या वनस्पतीला ‘सराटा’, ‘काटे गोखरू’, ‘लहान गोखरु’, ‘गोक्षुर’ अशीही अन्य नावे आहेत. 
इंग्रजी नाव - गोखरूला इंग्रजीत ‘स्मॉल कॅलट्रोप्स’ असे म्हणतात. 

उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती वाढते. शेतात, ओसाड, पडीक जमिनीवर ही तण म्हणून सर्वत्र आढळते. गोखरू हे तण असले तरी, ती महत्त्वाची औषधी वनस्पती असून तिला वर्षभर फुले व फळे येतात. 

खोड - पसरत वाढणारे, केसाळ, फांद्या अनेक बारीक केसाळ, लवयुक्त, 
पाने - संयुक्त, समोरासमोर ५ ते ८ सें.मी. लांब, संमुख जोडीतील एक पान लांबीने दुसऱ्यापेक्षा आखूड, पर्णिकेच्या ४ ते ८ जोड्या ८ ते १२ मि.मी. लांब, पर्णिकांचे देठ अगदी लहान, पानाला उपपर्णाची जोडी. पर्णाक्षावर टोकाला पानांचा आकार लहान-लहान होतो. पर्णिकांच्या खालील बाजूला दाट लव व कळाकडील भाग विषम विभागी. 
फुले - पिवळी, द्विलिंगी, नियमित १ ते १.५ सें.मी. व्यासाची, पानांच्या बगलेत, विरुद्ध बाजूला, एकांडी, पुष्पकोश ५ दलांनी बनलेला. पाकळ्या रुंद ५. पुंकेसर १०. बीजांड कोषाखाली चकती १० भागांनी बनलेली. बीजांडकोष पाच कप्पी, परागधारिणी आकाराने मोठी, ५ भागांनी बनलेली. 
फळे - गोलाकार पंचकोनी, ५ कप्पी. प्रत्येक कप्पीवर काट्यांच्या दोन जोड्या, एक जोडी लांब, एक लहान, फळांवरील काटे तीक्ष्ण, फळांच्या प्रत्येक कप्प्यात अनेक बिया. गोखरूची फळे नेहमी पायांना, कपड्यांना, जनावरांच्या शरीराला, वाहनांच्या चाकांना चिकटतात. 

गोखरूचे औषधी उपयोग 

गोखरूचे मूळ व फळे औषधात वापरतात. मूळ बारीक चिवट, १० ते १२ सें.मी. लांब, गोलाकार, फिकट उदी रंगाचे असते. त्यास थोडासा सुगंध असून, रुची गोड तुरट असते. गोखरूचे मूळ दशमुळातील एक घटक आहे. गोखरू स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक व बल्य आहे. गोखरू शीतल असून, मूत्रपिडांस उत्तेजक आहे. 

गोखरुची फळे मूत्राच्या विकारांवर, लैंगिक आजारपणात अत्यंत उपयोगी आहेत. फळांचा काढा संधिवातावर आणि मूत्राशयाच्या विकारावर उपयोगी आहे. 
मूत्रपिंडाच्या दुबळेपणात पाण्यात धने, जिरे, गोखरू समप्रमाणात घेऊन कुटून, उकळवून गार करून घेतल्यास मूत्रप्रवृत्ती सुधारते, मूत्रपिंडास ताकददेखील येते. लघवी फार आम्लधर्मी असल्यास गोखरू फळांच्या काढ्यातून यवक्षार देतात. मूत्रपिंडाशोथात लघवी क्षारस्वभावी व गढूळ असल्यास फळांच्या काढ्यातून शिलाजित देतात. मूतखड्यावर फळांचे चूर्ण मधात खलून देतात. 

गोखरू परमा आणि बस्तिशोधात वापरतात. वाजीकरणासाठीही गोखरूचा वापर करतात. लैंगिक दुर्बलतेत गोखरू व तिळाचे चूर्ण मध व बकरीच्या दुधातून देतात. धातूपुष्टतेसाठी गोखरू, गुळवेल आणि आवळे समभाग घेऊन त्याचे चूर्ण दुधातून द्यावे. आमवातात गोखरू व सुंठ यांचा काढा उपयुक्त आहे. पंडुरोगावर गोखरूचा काढा मध घालून देतात. 

गर्भाशयाची शुद्धी होऊन वांझपणा नाहीसा होण्यासाठी गोखरू वापरतात. गर्भिणीच्या धुपणीस गोखरू चूर्ण खडीसाखर व तुपात कालवून देतात. धातुविकार व प्रदर या विकारांवर गोखरूची फळे तुपात तळून त्याचे चूर्ण करून गाईचे तूप व खडीसाखर घालून देतात. 

गोखरूची भाजी 

गोखरूची पाने व कोवळी खोडे भाजीसाठी वापरतात. यामुळे मूतखडा होण्याची प्रवृत्ती थांबते. कारण एकदा मूतखडा झाला, की वारंवार होत राहतो. हे होऊ नये म्हणून गोखरूची भाजी उपयोगी पडते. प्रमेहासारख्या व्याधीतही गोखरूची भाजी उपयुक्त ठरते. हृदयरोगांना मज्जाव करते. छाती भरली असल्यास ती कमी करण्यासाठी गोखरूची कोरडी भाजी देतात. कंबरदुखी, अंगदुखी यासाठीसुद्धा गोखरूची भाजी उपयोगी आहे. 

पाककृती 

साहित्य - कोवळी भाजी, भिजवलेली मूगडाळ किंवा तूरडाळ, बारीक चिरलेला कांदा, जिरे, मोहरी, हिंग, तिखट, मीठ इ. 
कृती - भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्यावी. कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग यांची फोडणी करून त्यात डाळ व कांदा परतून घ्यावा. नंतर चिरलेली भाजी घालावी. चांगले परतून घ्यावे. तिखट, मीठ घालावे. नंतर थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी.[संग्रहीत]
औषधांत याचे पंचांग व फळेही घेतात . 
( १ ) पांडुरोगावर गोखरूंचा काढा मध व साखर घालून द्यावा . 
( २ ) प्रमेहावर- गोखरूंचे चूर्ण साखरेशी द्यावें . 
( ३ ) मूत्रकृच्छ्र व उष्णवायूवर - गोखरूंच्या झाडाचा अथवा गोखरूंचा काढा करून , आंत मध व खडीसाखरेची पूड घालून द्यावा . 
( ४ ) पुष्टतेस - गोखरूंची पूड करून नित्य दूध पावशेर , तूप ४ तोळे , खडीसाखर १ तोळा , यांतून नित्य ३ मासेप्रमाणे घ्यावे . याने अंगांत भिनलेले उपदंशविकार नाश पावतात . 
( ५ ) उष्णप्रमेहावर , तिडक्या प्रमेहावर , व मूत्राघातावर गोखरूंची ओली झाडे आणून एका परातीत थोडे पाणी घेऊन त्या पाण्यावर दहा पांच वेळ जोराने मारून वर उचलीत रहावे , व दहा - पांच वेळ ती पाण्यांत फिरवावीं ; म्हणजे सर्व पाणी बोळासारखें थलथलीत जाड होईल . यांत खडीसाखरेची पूड व जिऱ्याची पूड घालून ७ दिवस द्यावे . पथ्य गव्हाची रोटी , तूप , साखर , तुरीचे अळणी वरण , 
( ६ ) आमवातावर - गोखरूं व सुंठ यांचा काढा नित्य सेवन केला असतां , तो आमवात व कटिशूळ यांचा नाशक व पाचक आहे . 
( ७ ) प्रमेहावर- गोखरूंच्या पाल्याचा रस पावशेर , त्यांत सब्जाचे बी १ तोळा वाटून एकत्र करून प्यावे . 
( ८ ) इंद्रलुप्त- म्हणजे चाईवर गोखरूं , तिळाची फुलें , मध  हे समान घेऊन मस्तकाला लेप करावा . 
( ९ ) गर्भशूळ- म्हणजे गर्भपातानंतर काही दिवस शूळ उत्पन्न होतो त्यावर -गोखरूं , ज्येष्ठमध व द्राक्षे दुधांत वाटून त्यांत साखर घालून ते द्यावे . 
( १० ) मूतखड्यावर- गोखरूंचे चूर्ण व मध ही मेंढीच्या दुधांत द्यावी . 
( ११ ) मूत्रकृच्छ्र व उन्हाळी यांवर- गोखरूंचे चूर्ण करून दुधांत खडीसाखर टाकून त्यांतून द्यावे . 
( १२ ) गोक्षुरादि घृत - धने , गोखरू यांचा काढा किंवा कल्क यांमध्ये घृत सिद्ध करावें ; तें मूत्राघात , मूत्रकृच्छ , दारुण शुक्रदोष यांवर हितकारक आहे .
( १३ ) गोक्षुरादि अवलेह-(ऐक तोळा बारा ग्रॕम) गोखरूंचें पचांग 100 तोळे घेऊन ते ४०० तोळे पाण्यात उकळवून १०० तोळे पाणी उरवावे . मग त्यांत ५० तोळे साखर घालून चाचणी करावी , आणि त्यांत सुंठ , पिंपळी , मिरी , दालचिनी , एलची , नागकेशर , तमालपत्र , जायफळ , अर्जुन सादड्याची साल , कांकडीचे बीज ही प्रत्येक दोन दोन तोळे , व वंशलोचन ४ तोळे घालून अवलेह तयार करावा . हा मूत्रसंबंधी रोगांवर फार उत्तम आहे . 
(संदर्भ -आयुर्वेदमहोपाध्याय कै.शंकर दाजीशस्त्री पदे गुरुजी)
गोखरूचें मूळ दशमूळांत वापरलेले आहे . 
मुळांचा किंवा ठेचलेल्या फळांचा धणे किंवा जिऱ्याबरोबर क्वाथ करून देतात . अथवा तांदळाच्या पेजेंत उकडून पेजेचे निवळ देतात . गोखरु परमा आणि बस्तिशोथांत वापरतात . ह्याचा वेदनास्थापन धर्म अल्प असल्यामुळे ह्याच्याशी खोरासानी अजवान किंवा अफू मिसळतात . लघवी फार अम्ल असल्यास व मूत्रकृच्छ्रांत काव्यांतून यवक्षार देतात . बस्तिशोथांत किंवा मूत्रपिंडशोथांत लघवी क्षारस्वभावी , दुर्गन्धियुक्त आणि गढूळ असते . तेव्हां काब्यांतून शिलाजित देतात . पंजाबांत वाजीकरणार्थ देतात . गोखरु व तिळाचे समभाग चूर्ण मध व बकरीच्या दुधांतून मुष्टिमैथुनापासून उद्भवलेल्या षंढ्यपणांत देतात . 
गोखरुपाक
निरोगी आरोग्य
सप्तधातुपोषक 
आमवात
बलवर्धक 
नाडीशुद्धीसाठी
गोखरुपाक वैद्द सल्याने करुन खाव्यात खुप सुंदर गुणकारी आहे. 

गाईचे दुधात गोखरु चुर्ण घालुन खवा करावा 

प्रमाण तोळे (ऐक तोळा बारा ग्रॕम)नुसार दिले आहे 

घरच्याघरी तज्ञांच्या सल्याने केलेले हे विनादुष्परीणामी पाक कींवा आपल्या समोर वैद्याने केलेले पाककृती खुप उपयुक्त व फायदेशीर सीद्ध होते. 

गोखरूपाक ' 
- गोखरूचे चूर्ण ६४ तोळे , गाईचे दूध २५६ तोळे , 
, - साखर पीठ्ठी१६ शेर , भुईकोहळा ४ , कचोरा ४ , सुरण ४ , लाजाळु ४ , मुसळी ४ , नागरमोथे ४ , भद्रमोथ ४ , शतावरी ४ , निवळीच्या बिया ४ , भारंगमूळ ४ , खुरासनी ओंवा ४ , जिरे ४ , शहाजिरे ४ , काकडीचे बीज ४ , गोखरूचे मूळ ४ , डाळिंब ४ , बेलाचे मूळ ४ , 
अर्जुनवृक्षाची साल ४ , घोटीचीसाल ४ , सालफळी ४ , बदामाचे गोळे ४ , बेदाणा ४ , आसंध ४ , कवच बीज ४ , केशर ४ , बळबीज ४ , खडीसाखर ४ , द्राक्षे ४ , काळी द्राक्षे ४ , कमळाक्षांतील गोळे ४ , गजपिंपळी ४ , दालचिनी ४ , अडुळसा ४ , मोचरस ४ , पुनर्नवा ४ , रानउडीद ४ , एलचीदाणे ४ , ब्रासकापूर ४ मासे , श्वेतचंदन ४ , काळावाळा ४ , सालममिश्री ४ , चोपचिनी ४ , ओवा ४ , आंकोली ५ , तालीमखाना ४ , पुष्करमूळ ४ , कापूरकचेरी ४ , देवदार ४ , चित्रकमूळ ४ , तमालपत्र ४ , नागकेशर ४ , गुळवेल ४ , त्रिकटू १२ , त्रिफळा १२ , पिंपळमूळ ४ , चवक ४ , रुईचे मूळ ४ , वावडिंग ४ , चारोळी ४ , कस्तुरी ४ , शेपा ४ , ज्येष्ठीमध ४ , पद्मकाष्ठ ४ , केळी कंद ४ , गुलाबाचे फूल १६ , शेवग्याची साल ४ , अक्रोड ४ . लवंग ४ , लोघ ४ , कंकोळ ४ , तालीसपत्र ४ , रुमामस्तकी ४ , शिंगाडे ४ , तवकीर ४ , मुरडशेंग ४ , गोडंब्या ४ , काजूच्या बिया ४ , रेणुकबीज ४ , मंजिष्ठ ४ , खोबरे ४ , खसखस ४ , मोरवेल ४ , अगर ४ , वंशलोचन ४ , काकडशिंगी ४ ; मुंडी ४ , कोशिंब ४ , डाळिंब ४ , महाळुग ४ , रससिंदूर ४ , वंगभस्म ४ , लोहभस्म ४ , हिंगूळ ४ , अभ्रकभस्म ४ , माक्षिकभस्म ४ , हेमगर्भ ४ , वसंत ४ , मृगांक ४ या औषधांचे चूर्ण पाकांत घालावे . नंतर सुगंधी द्रव्ये वड्या करावयाचे पूर्वी घालावयाची ती चार तोळे केशराचे पाणी करून साखरेचे चांचणीत घालावे . चातुर्जात १६ , लवंग ४ , जायफळ ४ , एलची दाणे ४ , जायपत्री ४ यांत चूर्ण वड्या करावयाचे पूर्वी घालावे .
[संदर्भ -आर्यवैद्दकलानिधी भाग 1ते 3]
टिप-
माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.
#Dr_Kailash_Ugale_Shree_Vitthal_Herbals_Pandharpur काॕपी पेस्ट कींवा फाॕर्वर्ड करतांना माहिती संकलक यांचे नाव असावे ही विनंती.

Post a Comment

0 Comments