#महाजनपद_कालीन_महाराष्ट्र - भाग १
---------------------------------------
महाराष्ट्राचा इतिहास म्हटला तर आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रच काय आजचा हा जो हिंदुस्थानचा नकाशा आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हा हिंदू धर्म अस्तित्वात आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच.....
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या महाराष्ट्राची काय ओळख होती. हा प्रश्न नक्कीच सर्वांच्या मनात येत असेल तर त्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रात कोणते क्षत्रिय मराठा राजवंश होऊन गेले कोणते राजे होऊन गेले त्याबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास पाहणार आहोत.
तर त्यात आपण अगदी सुरुवातीपासून महाभारत कालापासून द्वापारयुगापासुन महाराष्ट्राचा इतिहास पाहूयात. आज जसे भाषावार प्रांत आहेत भाषे नुसार राज्यांची रचना आहे पूर्वी असे नव्हते पूर्वी महाजनपद पद्धती हाती. प्रथमतः आपण महाभारतकालीन द्वापार युगातील कुठल्या महाजनपदा मध्ये महाराष्ट्राचा भूभाग येत होता ते पाहू.
महाभारत कालीन महाजनपद:- महाभारत काळात द्वापारयुगात जे भारतात महाजनपद होते. त्यामध्ये महाराष्ट्र हा #विदर्भ महाजनपदाचा भाग होता. ज्याला आज देखील विदर्भच म्हटले जाते. चंद्रवंशी क्षत्रियांच्या यादव कुळामध्ये विदर्भ नावाचा राजा झाला या राजाने विदर्भ महाजनपदाची स्थापना केली म्हणून या प्रदेशाला विदर्भ असे नाव मिळाले.
भगवान #श्रीकृष्णांची पत्नी #श्रीरुक्मिणी माता याच विदर्भाची राजकन्या होती. रुक्मिणी मातेच्या वडिलांचे नाव #भिष्मक होते आणि आईचे नाव #शुद्धमती होते. त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांची आजी म्हणजेच राजा दशरथ यांची आई ही देखील विदर्भाची राजकन्या होती. विदर्भ महाजनपदाची राजधानी #कुंडीनपूर होती म्हणजेच आजच्या महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील #कौडिण्यपूर गाव होय.
महाभारत युद्धानंतर द्वापार युगाच्या अंतानंतर कलियुगाचा प्रारंभ झाला त्यामुळे महाजनपदांचे स्वरूप बदलले कलियुगामध्ये संपूर्ण भारतात 16 महाजनपद होते. आणि या सर्व महाजनपदांचे अस्तित्व कलियुगाच्या आरंभापासून म्हणजे 5000 वर्षे पूर्वीपासून तर इसवी सन पूर्व 6 व्या शतकापर्यंत म्हणजेच आजपासून सुमारे 2600 वर्षे पूर्वी पर्यंत अस्तित्वात होते.
या सर्व महाजनपदांमध्ये महाराष्ट्र हा #अश्मक महाजनपदाचा भाग होता आणि अश्मक महाजनपद हे एकमात्र दक्षिण भारतातील महाजनपद होते इतर 15 महाजनपद हे उत्तर भारतामध्ये होते. अश्मक महाजनपदावर भगवान श्रीरामाचे वंशज म्हणजेच #इक्ष्वाकु वंशीय राजे राज्य करीत होते. भगवान श्रीरामाच्या इक्ष्वाकु वंशातील अश्मक नावाच्या राजाने गोदावरी नदी किनारी #प्रतिष्ठानपुरी नावाचे नगर वसवले तेच आत्ताचे #पैठण होय. म्हणून या महाजनपदाला अश्मक महाजनपद म्हटले गेले. अश्मक महाजनपदाची राजधानी प्रतिष्ठानपुरी म्हणजेच सध्याचे पैठण ही होती.
याच अश्मक महाजनपदावर शासन करणाऱ्या इक्ष्वाकु वंशाला पुढे #शिसोदे म्हटले गेले. क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील 92 क्रमांकाचे कुळ शिसोदे आहे. भोसले कुळ याच शिसोदे राजवंशाची एक शाखा आहे छत्रपती शिवाजी महाराज याच शिसोदे वंशातील होते. छत्रपती शिवाजी महाराज शिसोदे वंशातील होते म्हणून काही लोक अपप्रचार करतात की ते रजपूत होते त्यांचे पूर्वज मेवाड वरून वेरूळला आले पण सत्यस्थिती याच्या उलटी आहे पैठणच्या शिसोदे राजवंशाची एक शाखा राज्यविस्ताराला उत्तरेत मेवाड ला गेली तिथे शिसोदे चा अपभ्रंश सिसोदिया झाला त्यामुळे मेवाडच्या सिसोदिया वंशाचे पूर्वज हे मुळचे महाराष्ट्रातील पैठणचे शिसोदे वंशातील होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज इथलेच महाराष्ट्रातील वेरूळ आणि त्या अगोदर पैठणचे होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे 96 कुळी क्षत्रिय मराठाच होते.
तर हा झाला आपला क्षत्रिय महाराष्ट्राचा महाजनपद कालीन इतिहास लेख जास्तीत जास्त शेअर करा
#जय_भवानी🚩
#जय_शिवराय🚩
#जय_शंभूराजे🚩
#जय_सातवाहन🚩
#जय_महाराष्ट्र🚩
#क्षत्रिय_मराठा🚩
#महाजनपद🚩
#विदर्भ🚩
#अश्मक🚩
लेख:- आशिष इंगळे पाटील
0 Comments