|| मराठ्यांचे कुणबीकरण एक षडयंत्र ||
विषय :- ब्रिटिश गॅजेट नुसार मराठा ही जात आहे... कुणबी हा एक व्यवसाय आहे. नंतर शेती व्यवसायाला १८८१ नंतर कुणबी जात संबोधली,गणली गेली आहे.
ब्रिटिश गॅजेटरिज नुसार मराठा हें मूळचे कुणबी आहेत का? याची चिकित्सा खालील प्रमाणे :-
आरक्षण हा विषय मागील ३/४ दशका पासून राजकारणात आणि समाजकारणात महत्वाचा विषय म्हणून नावारूपाला आला आहे, असं असताना आरक्षणासाठी अनेक आंदोलन झाली, त्यातील काही यशस्वी झाली.... कही अजूनही प्रतीक्षेत आहेत.. त्यापैकी एक मराठा आरक्षण!!
मराठा आरक्षणाचा लढाई चालू असताना मराठा समाजात काही विशिष्ट ध्येयाने पच्छाडलेले चमकू लोक भर्ती झालेले आहेत,
ज्यांचा उद्देश मराठा इतिहास आणि मराठ्यांचे अस्तित्व पूर्णतः बरबाद करने आणि मराठा जातीचं अस्तित्व संपवणे हा आहे...
यासाठी " मराठा ही जात नाही " असं म्हणत " मराठा हें आधी कुणबी होते " असा दावा आजकल जोर धरत आहे... "मराठ्यांचा कुणबी दाखला करून द्यायचं त्यांकडून ठराविक रक्कम घ्यायची" असा नवीन हंगामी व्यवसाय सुरु झाला आहे...
हा व्यवसाय छान पैसे कमवून देणारा असला तरी हा फारकाळ टिकणारा नाही पण ह्याचे परिणाम मात्र दूरगामी असतील....
अनेक लोक म्हणतात " इतिहासाने पोट भरत नाही " त्यांचं म्हणणं खरं असलं आणि इतिहासाने पोट भरत नसलं तरी इतिहासामुळे स्वाभिमानाने मान ताठ ठेऊन संघर्ष करण्याची ऊर्जा मिळते आणि हा स्वाभिमान इतिहासातूनच येतो "
मराठ्यांची ओळख पुसण्यासाठी आजकल अनेक लोक हा दावा करतात की मराठा ही जात नव्हती ब्रिटिश काळात मराठ्यांना कुणबी समजलं जात होतं, कुणबी जातीतील लोक स्वातंत्र्या नंतर अहंकार म्हणून मराठा ही जात लावून राहू लागले...
परंतु हें सत्य नाही... मराठा ही जात आधीपासून होती...
ब्रिटिश गॅजेटियर मराठा वं कुणबी जाती बद्धल काय लिहितो याबाबत आपण पाहू.
Bombay gazeteer, Satara Vol. XLX, Page 75 ( मुंबई गॅजेटियर सातारा,भाग 19, पान क्रमांक 75 यात लिहिले आहे
" Marathas are found all over the districts. The 1881 Census includes them under kunbis from whom they are not from a separate cast"
बहुतेक साताऱ्यात मराठा जातींचे लोक आढळून येतात.
मराठ्यांचा शेती व्यवसाय असल्याने शेती करणाऱ्याना कुणबी बोलले गेले
मराठा ही एकच जात असल्याने सन 1881 च्या जनगणनेत ज्या मराठ्यांना शेती व्यवसायावरून कुणबी म्हटले त्यांना कुणबी सदरात दखल केले गेले आहे. ( मराठा आणि कुणबी हे एकच आहेत त्यामुळे मराठा वं कुणबी या दोन वर्गाचे भिन्न भिन्न जनगणना न करता त्या ठिकाणी असलेल्या बहुसंख्य मराठा जे शेती करत होते त्यांना कुणबी या नावाखाली मोजले गेले आहे पण इथे हा अर्थ कोणीही काढू नये की त्यांना कुणबी म्हटलं आहे कुणबी कोणाला म्हटलं आहे आपण पुढे पाहू )
🔴Bombay Gazeteer, Belgaon Vol. XXI, Page 126 (मुंबई गॅजेटियर, बेळगाव भाग 21 पान क्रमांक 126 ) नुसार
" The marathas are returned as numbering 11,93,000 and are found all over the district. They are come into the district from satara and other parts of the Deccen... They wear the sacred thread and the careful to performe the regular hindu observance. *Cultivating Marathas are called kunbis.* there is no objection to a son of maratha marrying kunbi doughter and Occasionally doughters of poor Marathas are given in marriage to a rich kunbi, The marathas are hardworking, strong,hardly and hospitable but hot tempered as soldiers they are brave and loyal; they are landholders, husbandman,pleaders, traders,labourers,soldiers,writers, messengers and servants"
अर्थ :- " या जिल्ह्यातील वं मुंबई प्रदेशातील मराठा लोकांची संख्या 11,93,000 इतकी असून हें या जिल्ह्यात सर्वत्र आढळून येतात, ते पवित्र जानवे घालतात, आणि हिंदू धर्मा प्रमाणे पवित्र आचार विचार पाळतात. *शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबी म्हणतात.* मराठा जातीच्या वर मुलाला कुणबी मुलीशी विवाह करताना हरकत येत नाही आणि गरीब मराठा मुलीचा विवाह श्रीमंत कुणबी मुलाला देतात. मराठा जातींचे लोक फार मेहनती, मजबूत, चिवट हाडाचे, इमानदार असतात परंतु त्यांचा स्वभाव तापट असतो, ते शूर राजनिष्ठ शिपाई आहेत. ते जमीनदार, शेतकरी, वकील, शिपाई, मजदूर ,व्यापारी,कारकून पट्टेवाले या धंद्यात काम करतात... "
यावरून स्पष्ट होते की मराठा हें मूळचे कुणबी नाहीत तर ज्या मराठ्यांनी शेती करून उपजीविका चालवली अश्या मराठ्यांना कुणबी म्हटलं गेलं...
मराठा ही जात पुसणे आणि क्षत्रिय मराठ्यांना कुणबी म्हणजे शेतकरी दाखवणे यासाठी महाराष्ट्र मध्ये अनेक तथाकथित इतिहासकार काम करत आहेत जे मराठ्यांचा इतिहास कृषक म्हणून दाखवून मराठ्यांच्या तलवारीचे तेज लपवत आहेत.... मराठ्यांचे क्षत्रियत्व नष्ट करने आणि महाराष्ट्रात अन्य ठराविक जातीला या भूमिचे क्षत्रिय दाखवणे असा हेतू बहुजनवादी विचारधारेचा आहे जों यातून दिसून येतो...
" मराठा ही जात नाही अठरा पगड जाती आणि 12 बलुतेदार म्हणजे मराठा " असा संदर्भ काही लोक जोडतात त्यांचे हें मत ब्रिटिशांनी वरील गॅजेटियर ने खोडून काढले आहे कारण मराठा जातीची जनगणना संबंधित वरील उल्लेख हा गॅजेटरीज यात आला आहे आणि यात कुठेही मराठा शब्द प्रांतवाचक किंवा 18 पगड जाती 12 बलुतेदार यांच्यासाठी नसून मराठा या जातीसाठी आला आहे हें पूर्णतः स्पष्ट होतं...
कुणबी या व्यवसायाचे जातीत रूपांतर 1881 नंतर झालं असावं असं म्हणायला हरकत नाही कारण त्या आधीचे रेकॉर्ड हें मराठा ही जात असल्याचे सिद्ध करतात.
दुधाचा दही होतो दह्याचे दूध होत नाही दही हा दुधापासून बनतो यामुळे या अर्थी मराठा जातींचे कुणबीकरण करण्याची खेळी जाणीवपूर्वक होत आहे.
अठरापगड जाती 12 बलुतेदार सगळ्यांना त्यांच्या जातीवरून आरक्षण भेटले त्यांचा मुळ जातीत बदल नाही मग
मराठ्यांची जात बदलून मराठा ही जात पुसून मराठा कुणबीकरण करणे आणि मराठ्यांना आरक्षण घ्या बोलणं षडयंत्र आहे स्पष्ट होत आहे.
#क्षत्रिय_मराठा ✍️🚩
जयस्तु क्षत्रिय मराठा 🚩🙏
0 Comments