Ticker

6/recent/ticker-posts

नागपुरकर भोसले वंशीय रघुजीराजे भोसले

*जगन्नाथपुरी येथील यात्रा पुन्हा सुरू करणारे नागपुरकर भोसले वंशीय रघुजीराजे भोसले.* 🚩⚔️👑

*भोसले राजवंशाचे रघूजीराजे भोसले (१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५) हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार होते. ते रघूजी भोसले प्रथम, राघोजी भोसले या नावांनीही ओळखले जातात. त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत पूर्व-मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला. १८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा घेण्यापर्यंत त्यांच्या वारसांनी नागपुरात राज्य केले.*

नागपुरकर भोसले यांचे मुळ गाव देऊर, देऊर हे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा, हे संमत वाघोलीपैकी एक गाव होत. देऊर गाव रघुजी भोसलेना मोकासा व नंतर इनाम होते. देऊरचा भोसलेंचा राजवाडा असला तरी तो भोईटे घराण्याच्या ताब्यात मालकी हक्काने आहे. शिवाय, देऊरची राजवाडा संबंधीत जमीन भोईटेंकडे आहे. देऊर रेल्वे क्राँसिंगची जागा ही भोईटेंची गेली आहे. हे भोईटेे भाऊबंद परिवार व नागपुर संस्थानचे सरदार घराणे होय. माणकोजीराव, महादजी इ. भोईटे नागपूरचे लढवय्ये होते. पण, मुधाई देवस्थानचे मालक राजेभोसले नागपुरकर व मानकरी चव्हाण दहिगावकर आहेत. देऊर गावात कदम बहुसंख्य असलेतरी गाढवे देशमुख पण आहेत.

गिरवी, मालगाव, देऊर ही गावे कदमांच्या भावकीची आहेत. तिन्ही नातेवाईक. नागपुरकर भोसलेंच्या सोबत मोहिमेत आठ कदम देऊरकर होते.

*मालगाव, देऊर आणि आराळे या तिन्ही गावचे कदम हे गिरवीकर कदमच आहेत.* मुधी पौर्णिमेला देवी आली म्हणून मुधाई हे नाव पडले. एक दहिगावकर चव्हाण या घराण्यातील भक्तामुळे आली हे खरे आहे. पण, दहिगावकर चव्हाण पैकी सरदार भिवजी, सेट्याजी, मुधोजी ही नावे इनाम व मोकासदार होती. देऊरची मुधाई देवी ही नागपुरकर राजेभोसलेंची आद्यदेवता . *नागपुरकरांच्या 'संस्थानी' आणी 'वैयक्तिक' दोन्ही राजचिन्हात सुद्धा "जय मुधाई" असा उल्लेख आहे.*

कोरेगाव तालुक्यात छत्रपतींचे निष्ठावंत भोईटे, येवले, चव्हाण, धुमाळ, यादव सोळसकर, पवार, भोसले, जगताप, बर्गे, शिंदे, कदम, जगदाळे, फाळके,महाडिक काटकर, जाधव, बोधे, माने, पिसाळ, निकम, लेंभे, वीर, शिर्के, घोरपडे, नलवडे, क्षीरसागर, मोरे, इ.वतन दार वीरांची गावं आहेत.नागपूरकर भोसले यांच्यावर भालचंद्र अंधारे यांची बरीच पुस्तकं आहेत.

भोसले कुटुंब हे मूलतः देऊर (सध्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात) गावचे प्रमुख होते. रघुजींचे आजोबा आणि त्यांचे दोन बंधू शिवाजी महाराजांच्या सैन्यांत लढले होते आणि त्यांच्यातील सर्वात प्रतिष्ठित लोकांना सैन्यात उच्च लष्करी पदे आणि बेरारमधील चौथांचा संग्रह बहाल करण्यात आला होता. 

त्यावेळी त्यावेळी गोंडवाना साम्राज्याची राजधानी होती जिथे देवगडच्या गोंड घराण्याचे राज्य होते. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली.

१७३९ साली राजा गोंड यांचे निधनानंतर त्यांच्या वर्षांमध्ये वाद उद्भवला. रघुजी त्यावेळी मराठ्यांच्या वतीने बेरार प्रांतात शासन करीतहोते. राजाच्या विधवाने मराठ्यांच्या वतीने रघुजींची मदत मागितली. रघुजींनी मध्यस्ती करून राजा गोंडच्या दोन पुत्रांना ज्यांना आधी राज्याबाहेर काढून बेरारला धाडण्यात आले होते, राज्य दिले. पण १७४३ मध्ये दोन भावात परत वाद उद्भवला. थोरल्या भावाने परत रघुजींना विनंती करून हस्तक्षेप करण्यास सांगितले. तेव्हा रघुजींनी थोरल्या भावयाविरोधातील बंडाळी मोडून काढली. पण कमी काळात दोनदा एवढ्या जवळ हाती आलेली सत्ता परत न करण्याचा मोह रघुजींना आवरला नाही आणि त्यांनी गोंड राजा बुरहान शानला, फक्त राजकीय बाहुले बनवून खरी सत्ता आपल्या हातात घेतली.

दोस्त अली खानने चंदासाहेबांना तिरसव्यपुरम राजाच्या विरोधात मोर्चा काढायला सांगितलं. तेव्हा तिरसव्यपुरमच्या राजाने मराठा साम्राज्याची मदत मागितली. लवकरच मुघल सेना आणि मराठा सरदार रघुजींच्या कमानीत मराठा सेना दमलेचररी येथे भिडल्या. ही मुघल आणि मराठा शैब्यातली एक मुख्य लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. या लढाईत रघुजींनी दोस्त अली खानाचा पाडाव करून कर्नाटकेत तीन वर्षांपर्यंत कब्जा मिळवला.

कर्नाटकातील त्रिचनापोलीच्या लढाईतील यशस्वी मोहिमेनंतर मराठा साम्राज्याने बंगालमधील मोहीम हाती घेतली. रघुजींना या मोहिमेचे नेते बनवण्यात आले. १७२७ मध्ये मुर्शीद कुली खानच्या मृत्यूनंतर त्या भागात अंदाधुंदीच्या परिस्थितीचा यशस्वीपणे वापर करून राघूंईंनी रघुजींनीओरिसा आणि बंगालच्या काही भागावर कायमचा कब्जा केला. बंगालच्या नवाबाने मराठ्यांना सुवर्णरेखा नदीपर्यंतचा प्रदेश आणि बंगालची २० लाख रुपये (पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दोन्हीसह) आणि बिहार (झारखंडसह) साठी १२ लाख कर मान्य केला. अशा प्रकारे बंगाल मराठा साम्राज्यात सामील झाले. रघूजीराजे अत्यंत धाडसी आणि शीघ्र निर्णयी असे मराठा सरदार होते. त्यांनी शेजारील राज्यातील राजकारणिक समस्यांचा फायदा उचलत आपले धोरण आखले आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्या. त्यांच्या सैन्याने दोनदा बंगालवर आक्रमण केले आणि कटकवर सुद्धा आपला अंमल स्थापित केला. सन १७४५ ते १७५५ दरम्यान त्यांनी चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले.

१४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजींचे निधन झाले. निधनानंतर जानोजी नागपूरच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून आले. २६ जानेवारी १७७४ रोजी रघुजींचे दोन पुत्र जानोजी आणि मुधोजी ह्यांच्यात सत्तेवरून पाचगांव येते लढाई झाली. या लढाईत मुधोजींनी जानोजींचा वध केला आणि आपला मुलगा रघुजी द्वितीय ह्याला गादीवर बसवले. 

नागपूर साम्राज्याचे राजकुमार बख्त बुलंद यांनी नागपूरची स्थापना केली असल्याचे ताजा इतिहास सांगतो. त्यानंतरचा देवगडचा राजा चांद सुल्तान होता. त्याने नागपूरला आपली राजधानी निश्चित केले हकेली आणि या शहराला त्याने वॉल सिटी बनविले होते. 1739 मध्ये चांद सुल्तानचे निधन झाल्यानंतर चांद सुल्तानचा अनौरस पुत्र वाली शाह हा राजा झाला आणि चांद सुल्तानची विधवा पत्नी आपली दोन मुलेे अकबर शाह आणि बुरहान शाह यांचे हित जोपासण्यासाठी बेरारचे मराठा नेते रघुजी भोसले यांना जाऊन मिळाली. 1743 नंतर मराठा राज्यकर्ते सत्तेवर येऊ लागले. रघुजी भोसले यांच्यापासून ही सुरुवात झाली. देवगड, चांदा आणि छत्तीसगड या प्रांतांवर त्यांनी 1751 पर्यंत राज्य केले.

1803 मध्ये राघोजी (द्वितीय) दुसर्या अँग्लो —मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, या युद्धात ब्रिटीशांचा विजय झाला. 1816 मध्ये राघोजी (द्वितीय) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा पारसाजी याला मुधोजी (द्वितीय) याने हद्दपार केले आणि त्याचंी हत्या केली. 1817 मधील मुधोजी तिस-या आन्गलो — मराठा युद्धाच्या काळाच्या काळात मुधोजी इंग्रजांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, सध्या नागपूर शहरात असलेल्या सीताबर्डी येथील युद्धात त्यांचा पराभव झाला. हे युद्ध भोसल्यांच्या साम्राज्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. या युद्धानंतर भोसल्यांच्या साम्राज्याला घरघर लागली आणि ब्रिटीशांनी नागपूर शहर काबिज केले. तात्पुरत्या ताजपोशीनंतर मुधोजींना हद्दपार करण्यात आले आणि ब्रिटीशांनी राघोजी (द्वितीय)चे नातू राघोजी (तृतीय) यांच्या डोक्यावर राजमुकुट ठेवला. 1840 पर्यंत त्यांची सत्ता होती. त्यांच्या सत्तेच्या काळात या प्रांताची प्रशासकीय सूत्रे इंग्रज रेसिडेंटच्या हातात होती. राघोजी (तृतीय) यांच्या निधनानंतर 1853 मध्ये ब्रिटिशांनी नागपूरची सूत्रे आपल्या हातात घेतली.

1853 ते 1861 या काळात नागपूर, छिदवडा आणि छत्तीसगडचा समावेश असलेला नागपूर प्रांत सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारचा भाग बनले आणि ब्रिटीश केंद्रीय सरकारमध्ये हे शहर आयुक्तांच्या प्रशासकीय नियंत्रणात आणण्यात आले. नागपूरला या प्रांताची राजधानी करण्यात आले. 1903 मध्ये यात बेरारचा समावेश करण्यात आला.

रघूजीराजे भोसले (१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५) हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार होते. ते रघूजी भोसले प्रथम, राघोजी भोसले या नावांनीही ओळखले जातात. त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत पूर्व-मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला.[१] १८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा घेण्यापर्यंत त्यांच्या वारसांनी नागपुरात राज्य केले.

रघुजी अत्यंत धाडसी आणि शीघ्र निर्णयी असे मराठा सरदार होते. त्यांनी शेजारील राज्यातील राजकारणिक समस्यांचा फायदा उचलत आपले धोरण आखले आणि आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण केल्या. त्यांच्या सैन्याने दोनदा बंगालवर आक्रमण केले आणि कटकवर सुद्धा आपला अंमल स्थापित केला. सन १७४५ ते १७५५ दरम्यान त्यांनी चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले. १४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजींचे निधन झाले. निधनानंतर जानोजी नागपूरच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून आले. २६ जानेवारी १७७४ रोजी रघुजींचे दोन पुत्र जानोजी आणि मुधोजी ह्यांच्यात सत्तेवरून पाचगांव येते लढाई झाली. या लढाईत मुधोजींनी जानोजींचा वध केला आणि आपला मुलगा रघुजी द्वितीय ह्याला गादीवर बसवले.

*छत्रपती शिवाजी महाराज की जय.* 🙏🏻🚩⚔️👑

संदर्भ :- Forgotten Indian History. The Brutal Maratha Invasions of Bengal.
Cp

Post a Comment

0 Comments