*"लिडर" कसा असावा...??*
*१) दूरदृष्टी (Vision) :*
*लीडरने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते. त्या वातावरणातूनच तो कार्यकर्त्यांच्या हातून कार्य घडवून घेत असतो.*
*२) ध्येयनिश्चिती (Goals):*
*लीडरने आपल्या पुढे काही ध्येय निश्चित केली पाहिजेत. त्या ध्येय निश्चितीनुसारच प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे.*
*३) आत्मविश्वास*
*(Self Confidence) :*
*संघटनेच्या ध्येयावर असलेला जबरदस्त विश्वास आणि निष्ठा ही नेतृत्वाची खरी शक्ती असते. आणि त्यातच खरा विजय असतो.*
*४) अनुशासन (Discipline):*
*एक चांगला लीडर, एक चांगली अनुशासीत व्यक्ती असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट मीच एकटा करतो अशी भावना नसावी. स्वतः नियमांचे पालन करणे गरजेचे असते.*
*५) चिकाटी (Persistance):*
*कोणत्याही कामामध्ये विजय मिळविण्यासाठी लीडरच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक असते. खचून न जाता एकाग्रतेने प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते. आणि यावरूनच लिडरची कार्यक्षमता लक्षात येते.*
*६) नियोजन (Planning):*
*नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे ध्येय गाठण्यासाठी योजना तयार असाव्या लागतात. आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन व पूर्व तयारी करण्याची जबाबदारी लीडरलाच पार पाडावी लागते. तसेच सर्वांना बरोबर घेऊन जबाबदारी पार पाडावी.*
*७) योग्य निर्णय*
*(Proper Judgement):*
*लीडरला सर्वांची बाजू ऐकून , सर्वांचे हित पाहून योग्य निर्णय घेतला पाहिजे. मी करतो तेच बरोबर असा विचार असू नये.*
*८) धैर्य (Patience):*
*नेतृत्व करताना लीडरला चौकटी बाहेरच्या काही गोष्टी अमलात आणाव्या लागतात. त्यासाठी नेत्याकडे धैर्य असावे लागते. घेतलेओअ निर्णय बरोबरच असल्याचे कार्यकर्त्यांना पटवून देणे आवश्यक असते.*
*९) जबाबदारी स्वीकारणे* *(Accept Responsibilities):*
*नेतृत्व हे जबाबदारी स्वीकारणारे असले की टीमची कार्यक्षमता वाढते व कामाचे समाधान मिळते. नेतृत्व स्वीकारणे म्हणजे यश-अपयश दोन्ही स्वीकारणे.*
*१०) बदलाचा स्वीकार* *(Accept changes):*
*बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असतांना , आपल्या बदलाचा वेग मंदावला असेल तर... नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असे समजावे.*
*११) मार्गदर्शक व प्रशिक्षक व्हा*
*(Be A Coach & Guide):*
*प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातलं आणि क्षमतेच काम वाटून दिल पाहिजे. प्रसंगी मार्गदर्शन आणि त्या त्या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे. लिडरला सर्व प्रकारचे ज्ञान असणे आवश्यक आहे.*
*१२) आकर्षक व्यक्तिमत्व* *(Pleasing Personality):*
*एक लीडर म्हणून तुमच्यावर , तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येय धोरणांवर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी सहकाऱ्यांशी सतत संवाद राखायला पाहिजे.*
*१३) प्रशासनिक कौशल्य* *(Administrative skills):*
*एक लीडर म्हणून त्याच्या जवळ प्रशासनिक कौशल्य असणे गरजेचे आहे. सर्व प्रशासकीय बाब म्हणजे पत्रव्यवहार आणि त्यातील मजकुरावर लिडरची पत समजते. प्रशासनाचे ज्ञान आत्यावश्यक आहे.*
*१४) संभाषण कौशल्य* *(Communication skills):*
*एक चांगला लीडर बनण्यासाठी सर्वात मोठी कला हवी असते ती म्हणजे संभाषण कौशल्याची क्षमता. सहका-यांना काही गोष्टी पटवून देणे महत्त्वाचे असते.*
*१५) निर्णय घेण्याची कला*
*(Decision making ability):*
*एक लीडर म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेता आला पाहिजे. कार्यकर्त्यांवर अन्याय होणार निर्णय घेणार नाही व वरिष्ठांच्या मर्जीसाठी चापूलुसी करून निर्णय घेणारा नसावा.*
*१६) जोखीम घेण्याची क्षमता*
*(Risk Taking Ability):*
*नेतृत्व करताना धैर्याबरोबरच जोखीम घ्यायची तयारीसुद्धा लीडर मध्ये असली पाहिजे.*
*१७) क्रिएटिव्हिटी, संशोधन आणि प्रेरक*
*(Creativity and Innovation):*
*हि कौशल्य लीडर मध्ये असली पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असते.*
*१८) समस्या सोडविण्याचे कौशल्य*
*(Problem solving skills):*
*खऱ्या लीडरची ओळख तेव्हाच होते जेंव्हा तो आपल्या समस्यांचा सामना कसा करतो यावरूनच त्याची बुद्धिचातुर्य लक्षात येते.*
*१९) लवचिक आणि अनुकूल क्षमता*
*(Flexibility And Adaptability):*
*लीडर म्हणून नेहमी लवचिक व अनुकूल राहता आले पाहिजे. शक्यतो शांत राहणे. साधी राहणी आणि उच्च विचारसारणी असावी.*
*२०) वेळेच्या व्यवस्थापणाचे कौशल्य*
*(Time Management Skills):*
*लीडरला जर आपले ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन केलेच पाहिजे. स्वतः वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे.*
*२१) लोकांना प्रोत्साहित करा*
*( Motivate People):*
*लीडर ने आपल्या लोकांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी विविध योजना आखाव्यात. कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यासाठी अधूनमधून कार्यक्रम ठेवावे.*
*२२) आपण स्वतः आधी कार्यप्रवण होणे.*
*(Lead By Example):*
*कोणत्याही लीडर ने फक्त सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन कामाची दिशा आणि आखणी तयार करावी.*
*२३) टीम प्लेयर्स व्हा*
*( Be Team Players):*
*लीडर ची प्रमुख जबाबदारी आहे की एक चांगली टीम तयार करणं आणि त्या टीमचा एक भाग बनणे.*
*२४) त्यागशील* *(Sacrificial) :*
*लीडर हा त्यागशील असावा.स्वतः त्यागाची भावना ठेवून कार्यकर्त्या समोर आदर्श ठेवावा.नेहमी इतरांना संधी देणारा खरा लीडर असतो. इतरांची संधी हिसकावून घेणारा कधीच खरा लीडर होऊ शकत नाही.*
*२५) अपयशाचा स्वीकार* *(Acceptance of failure) :*
*यश सर्वांचे तर अपयश फक्त माझे अशा विचाराचा लीडर असावा.*
*२६) सामूहिक हीत* *(Collective interest) :*
*लीडरने स्वतःच्या हिताकडे दुर्लक्ष करून संघटनेचे हीत लक्षात घेऊन ध्येय, धोरण निश्चित केले पाहिजे.*
*२७) निःस्वार्थी (Selfless) :*
*लीडर स्वार्थी आपमतलबी व कौतुकाचा भोक्ता नसावा.*
*२८) इतरांना सन्मान देणारा* *(Respectful of others) :*
*लीडरने नेहमीच सर्व स्तरातील कार्यकर्त्यांचा व लोकांचा सन्मान केला पाहिजे. स्वतः उच्च पदावर काम करताना इतरांना आदरपूर्वक वागणूक दिली पाहिजे.*
*२९) लोकसंग्रह, समभाव, सत्कार्य :*
*लिडरने लोकांचा संग्रह करून त्यांच्यामध्ये समानतेची भावना निर्माण करून आणि मग त्यांच्या हातून सत्कार्य घडविले पाहिजे...!!*
0 Comments