Ticker

6/recent/ticker-posts

बांबू वंशलोचन

वेळू,बांबूचे वंशलोचन/
निरोगी फुफ्फुसांचे वचन// 

चांगल्या टिप-माहीतीच्या नर्सरीकडुन गावरान बांबू घरी लावावा व भाजी करावी जंगलातील वनसंपदा तोडु नये .उलट बांबू चे उपयोग बघता लग्नात देशी वृक्ष व बांबू रोप भेट द्याव व जोपासना करायला सांगावी ही विनंती
बाळंतपण झाल्यावर आम्ही बांबूची भाजी खावयास सांगतो त्यामुळे गर्भाशय शुद्धी होते.
तसेच बांबू भाजी खानार्या स्त्रीयांना गर्भाशय विकृती सहसा होतच नाही . त्यायोगे गर्भपीशवी घातक आजारास आळा बसतो. तरुण मुलींना हार्मोनल pcod असता बांबू, गूडमार ,अशोक ,लोध्राने खुप गुण येतो.

संसर्गजन्य आजार असो दमा असो वा अलर्जी तुमच्या फुफ्फुसावर या सर्वांचा परिणाम ठरलेला.
आणि म्हणून फुफ्फुसे ताकदवान व कायमनिरोगी राहावी वाटत असेल तर बांबूपासुन नैसर्गिक बनलेले वंशलोचन घ्यावे.
बाजारात वंशलोचन सर्रास भेसळयुक्त मिळते.
म्हणून वंशलोचन लाकडावर घासुन बघावा काहिंच खूणा उठत नाही तोच वापरावा.
नकली वंशलोचनाच्या रेषा उमटतात.
वंशलोचनासोबतच निरोगी आयुष्यासाठी बांबू भाजी घरी नियमीत खावी हि विनंती राहील.
त्यासाठी ऐकतरी बांबू घरी लावावा जरा बेटाचा त्रास होतो.
पण सारखे स्वच्छ केले तर आजुबाजूस फार वाढत नाही.
यातील रसायने वातावरण शुद्ध ठेवतो.म्हणून धर्मात पवीत्र आहे.वास्तुशास्त्रास बांबू महत्त्व दिले ते यामुळेच. 

हिंदु धर्मात बांबूस फार महत्व आहे.
ते उगाच नाही .त्यात तेवढे सत्व आहेत.ऐवढेच काय मृतशरीर नेतांना बांबूबांधुन नेतात 
व स्मशानात नेल्यावर बांबू मोडतात पण जाळत नाही.हे धर्मात स्पष्ट आहे.मला हा प्रश्न फार पडायचा अनेकांना कारणही विचारले पण कुणी सांगितले नाही .ते आता बांबूचा अभ्यास करतांना लक्षात येते की धर्माच्या प्रत्येक गोष्टी निसर्गनियमास आखून व आरोग्यास पुरक आहेत.
बघाना मृतशरीरास नेतांना निगेटिव्ह ऐनर्जी प्रसारीत होते.शिवाय शुष्म विषाणू , जिवानू व आजाराचे संसर्ग असलेल्या सर्व गोष्टी यात आल्या .खांदेकरी प्रेत उचलतांना मृताच्या फार जवळ असतात.आणि यासाठी बांबू हा संरक्षणासाठी तयार असतो .बांबूच्या आतील सर्व रसायने आजूबाजूच्या वातावरणात बाकी मानसांवर अपाय होउ देत नाही.
आता बांबू सरनावर जाळत नाही त्याचाही धर्मात स्पष्ट नकार आहे.बांबूत जसे चांगली रसायने आहेत तसी ती जाळल्यावर अत्यंत घातक होतात.म्हणून बांबूची उदबत्ती पेटवु नये .उदबत्तीस रानगवताची कांडीच वापरावी. 

[ ] बांबूच्या राखेत सिलीका चुना मॕग्नेसीया पोटॕश सोडीअम क्लोरीन गंधक ई .असतात
राखेत सीलीका व क्षार फार असतात.
वंशलोचनांत जितकें सिलिसिक अॕसिड जास्त तितके चांगले . बांबूची राख पाण्यांत घालून गाळून काढलेले क्षार शुद्ध वंशलोचनांत मिसळतात . ते अजिबात घेउ नये .
ह्या दोन्ही वस्तु गरम करून मग पाण्यांत ठेवितात . सुकल्यावर वंशलोचन म्हणून विकतात .
बांबूची राख असलेले वंशलोचन गुण देत नाही.
खऱ्यावंशलोचनाने श्वासोच्छ्वासेन्द्रियांच्या श्लेष्मल त्वचेस पुष्टि येते व असे झाल्याने त्यापासून होणारा श्लेष्मा म्हणजे कफ उत्पन्न होण्याचा कमी होतो . सितोपलादि चूर्णाचा पाठ चांगला आहे . तो मुलांस व तरुणांस चांगला उपयोगी पडतो . याने कफरोगांतील त्वचेचा दाह कमी होतो व केव्हां केव्हां कफांतून रक्त पडत असल्यास बंद होते . 

[ ] बांबूची क्रिया गर्भाशयावर होते म्हणजे गर्भाशयाचे संकोचन होते . ह्यामुळे बांबूच्या कोवळ्या पेरांचा किंवा कोंवळ्या पानांचा काढा बाळंतपणांत देतात . ह्याने विटाळ पडतो . 

[ ] पर कुटून सांधेसुजीत बांधतात . कोवळी पानें दालचिनीबरोबर वाटून कफांतून रक्त पडत असल्यास देतात . 

[ ] बांबूची शेती खरोखरच फायदेशीर आहे.
पडीक शेती असेल तर बांबूचा नक्की विचार करावा.
पावसाच्या कमी जास्त होणार्‍या प्रमाणाने इतर शेतीचे जसे नुकसान होते तसे बांबूच्या बाबतीत होत नाही.
अमुकप्रकारची, नदी काठाची, काळ्या मातीची जमीनच लागवडीसाठी असावी असा बांबूचा हट्ट नसतो. पाणथळ जमिनीवर, क्षारयुक्त जमिनीवर, अगदी मुरमाड जमिनीत पण बांबूची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर प्रतिकूल परिस्थितीत पण वाढणारे -जगण्याची चिवट्ट इच्छा असलेले हे गवत आहे. 
आपला विषय बांबूचे आरोग्यदायी फायदे असल्याने
बांबूची शेती महत्त्व सरकारी केंद्रातून घ्यावे तसच सरकारी अनूदान या बांबूशेतीस आहे.तेही शेतकर्यांनी बघावे. 

[ ] बांबूचे इमारती व कागदनिर्मितीसाठी व्यापारी मूल्य आहे. सोबतच ही वनस्पती औषधी गुणधर्माचीही आहे. 

[ ] बांबूचे मूळ, पाने, बिया, कोवळ्या खोडाचे कोंब व वंशलोचन हे सर्व आयुर्वेदीय औषधात वापरतात. 

[ ] बांबू खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक म्हणून वापरतात. हे कफ, क्षय आणि दम्यात अत्यंत उपयोगी आहे. हे उत्तेजक व ज्वरशामक म्हणूनही गुणकारी आहे. यामुळे कफरोगातील त्वचेचा दाह कमी होतो व कफातून रक्त पडत असल्यास ते बंद होते. 

[ ] बांबूच्या मुळांचा रस भाववर्धक आहे. त्याची साल पुरळ बरे होण्यासाठी उपयुक्त आहे. बांबूचे बी रुक्षोष्ण असून स्थूलांसाठी आणि मधुमेहींच्या आहारात उपयुक्त आहे. 

[ ] बिया कोमोत्तेजक व संसर्गरक्षक म्हणून उपयोगी आहेत. 

[ ] बांबूच्या कोवळ्या कोंबाचा किंवा कोवळ्या पानांचा काढा गर्भाशयाचे संकोचन होण्यासाठी बाळंतपणात देतात. यामुळे विटाळ पडतो व विटाळ स्राव नियमित होतो. 

[ ] गुरांना अतिसारात बांबूची पाने व काळी मिरी मिठाबरोबर देतात. 

[ ] बांबूच्या कोंबापासून बनविलेले पोटिस, व्रणातील किडे काढण्यासाठी वापरतात. 

[ ] कोवळ्या कोंबापासून तयार केलेले लोणचे व कढी अपचनात उपयुक्त आहे. यामुळे भूक व पचनशक्ती वाढते. 

[ ] कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात. 

[ ] कोवळी पाने दालचिनीबरोबर वाटून कफातून रक्त पडत असल्यास देतात. 

[ ] बांबूच्या भाजीचे औषधी गुणधर्म 

बांबूच्या कोवळ्या खोडांच्या कोंबाची भाजी करतात. अगदी मांसल, मऊ कोंब भाजीसाठी वापरतात. बाळंतपणात नाळ पडून गेल्यानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. तसेच स्त्रियांचा विटाळ साफ होत नसल्यास ही भाजी गर्भोत्तेजक म्हणून द्यावी, यामुळे मासिक पाळी साफ होते. 

[ ] बांबू ही खूपच तंतुमय वनस्पती आहे, शिवाय ती क्षारयुक्तही आहे, यामुळे या भाजीतील तंतू व क्षार शरीराला मिळतात. 

[ ] बांबूच्या कोंबाची भाजी
पावसाळ्यात नवीन बांबू रुजून जमिनीतून वर येतात, तेव्हा ते कोवळे असतात. हेच कोंब भाजी करण्यासाठी योग्य असतात. हे कोंब सोलून त्यावरील टणक आवरणे काढून टाकावीत. आपले नख खुपसता येईल, असा आतला कोवळा भाग काढून घ्यावा, तो पाण्याने धुवावा. बारीक चिरून मिठाच्या पाण्यात ठेवावा. त्याला असणारा उग्र वास यामुळे कमी होता. तो मऊदेखील होतो. यासाठी आदल्या रात्री कोंब चिरून ठेवून, दुसऱ्या दिवशी भाजी करावी.
साहित्य
चिरलेला कोंब, कांदा, भिजवलेली मसूरडाळ किंवा हरभराडाळ, तिखट, ओले खोबरे, तेल हळद, मीठ, मोहरी, हिंग इ.
कृती
चिरलेला कोंब कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावा. भांड्यात तेल तापवून मोहरी, हिंग घालून फोडणी करावी, त्यावर चिरलेला कांदा टाकून परतावा. मग शिजवून घेतलेला कोंब व भिजवलेली डाळ घालावी. नंतर हळद, तिखट, मीठ घालून चांगले परतावे. भाजी वाफवून शिजवावी. नंतर किसलेले ओले खोबरे वरून पसरावे व सुकी भाजी बनवावी. पातळ भाजी करायची असेल तर भाजीत थोडे पाणी घालावे. ओले खोबरे बारीक वाटून घालावे व भाजी परतून शिजवून घ्यावी.
साहित्य
बांबूचे कोवळे कोंब, भिजवलेली हरभळाडाळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे, दूध, तेल, फोडणीचे साहित्य इ.
कृती
बांबूचे कोंब सोलून घ्यावेत. कोंब किसणीवर किसावा. थोडा वेळ तो पाण्यात टाकावा. नंतर कीस चांगला वाफवून घ्यावा. फोडणी करून घ्यावी. भिजवलेली डाळ फोडणीत परतून घ्यावी. त्यावर वाफवलेला कीस, तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालून भाजी शिजवावी. शिजवताना भाजीत पाणी घालू नये, दूध घालावे. ही अतिशय चविष्ट अशी भाजी आहे. 

बांबू भाजी रेसीपी - डॉ. मधुकर बाचूळकर सर 

[ ] ईतर विस्तृत माहीती बघुया 

वेळू ( सं . - वंश ). ई.- Bamboo canc बाम्बू केन . Bombusa vulgar
वेळूस बांबू , माणगा , चिवा असेही म्हणतात . कोकणांत वेळूची बेटे पुष्कळ ठिकाणी आहेत . जशी कळकीची बेटे असतात , तशीच वेळूची बेटे असतात . वेळूची पाने कळकीच्या पानांसारखींच , परंतु त्याहून रुंदट व लांबट असतात . 
वेळूचे झाड पन्नास - साठ हातदेखील उंच वाढते . वेळू बारीक असला म्हणजे त्यास बांबू म्हणतात . वेळूची बेटे इतकी कठीण असतात की , त्यावर तोफेच्या गोळ्यांचा जोर लवकर लागू होत नाही . वेळूस साठ वर्षांनी चवर येते . तेव्हां त्यास कांडा फुलला असे म्हणतात . तो असा येतो की , दर कांड्यास सुमारे चार चार अंगुळे गुच्छ येतात , आणि त्यांत गव्हासारखा दाणा उत्पन्न होतो . तें धान्य पिकलें म्हणजे वेळू मरूं लागतात . एकदा हे बी येऊ लागले म्हणजे वेळूची बेटे नाहीशी होतात . मग नवें बेट जमावयास पांचपंचवीस वर्षे लागतात . ज्या वर्षी हैं बी येते . ते लोक हे धान्य जमा करून सांठवून ठेवितात . मग लागेल तेव्हां सड देऊन दळतात . त्याच्या पोळ्या , भाकरी असे अनेक पदार्थ करितात . वेळूच्या अनेक वस्तु होतात . घरास ओमण घालतात . भिंतीऐवजी त्यांचा कूड घालतात . त्याच्या चटया , हंतऱ्या , टोपल्या , सुपें , पंखे , करंडे इत्यादी नाना प्रकारच्या वस्तु करितात . होडीच्या डोलकाठ्या वेळूच्या करितात . त्याच्या कोंबाची भाजी व लोणचे करितात . या कोंबांस वासोटे म्हणतात . हा कोंब जेव्हां जमिनीतून बाहेर निघतो तेव्हां त्याच्या अंगी इतका जोर असतो की तो एखाद्या दगडाखालून जर निघाला तर त्यास एकीकडे सारतो , किंवा त्याला भेदूनदेखील बाहेर पडतो . वेळूच्या पालख्याच्या दांड्या करितात . बांबूच्या खुर्त्या , कोचें , पलंग वगैरे नाना प्रकारच्या वस्तु करितात .
मिठांत घातलेले वासोटे , वर्ष दोन वर्षेदेखील टिकतात . वेळूत जे पाणी वाळते त्यापासून ' वंशलोचन ' होतो . वेळू - शीतल , आंबट , तुरट , कडू , सारक , बस्तिशोधक , स्वादु , छेदक व भेदक आहे ; आणि कफ , रक्तविकार , पित्त , कुष्ट , सूज , व्रण , मूत्रकृच्छ्र , प्रमेह , अर्श व दाह यांचा नाश करितो . 

पोकळ वेळू - रुचिकारक , दीपन , पाचक व हृद्य असून अजीर्ण , शूल व गुल्म यांचा नाश करितो . वरकड गुण वेळूसारखेच आहेत . 

वेळूचा कोंब - तिखट , कडू , आंबट , लघु , तुरट , रुचिकर व शीतल आहे . आणि पित्तरक्त , दाह , मूत्रकृच्छ्र व त्रिदोष यांचा नाश करितो . वेळूचे बीज ( माणग्याचे बीज ? ) तुरट , रुक्ष , मधुर , पौष्टिक , वीर्यकारक , व बलकर असून , प्रमेह , विष , पित्त व कफ यांचा नाश करितें . 

वंशलोचन- रुक्ष , तुरट , मधुर , रक्तशुद्धिकारक , शीतल , ग्राहक , वृष्य , धातुवर्धक व बलकर आहे ; आणि क्षय , दमा , खोकला , अपची , गंडमाळा , रक्तपित्त , ज्वर , कुष्ट , कामला , पांडुरोग , दाह , तृषा , वण , मूत्रकृच्छ्र व वायु यांचा नाश करितें . 
( १ ) मूत्राघातावर - तांदुळाच्या धुवणांत वेळूची राख व साखर घालून द्यावी . ( २ ) पारा अंगांत राहिला तर वेळूच्या पाल्याच्या चार पैसेभार रसांत पैसाभार साखर घालून तो द्यावा . 
( ३ ) रक्तजन्य दाहावर- वेळूच्या सालीचा काढा थंड झाल्यावर मध घालून द्यावा . ( ४ ) सर्व प्रमेहावर - वंशलोचन , कंकोळ , नागकेशर व वेलदोड्यांतील दाणे , समभाग घेऊन बारीक कुटून वस्त्रगाळ पूड करावी . नंतर ती पूड भिजेइतकें उत्तम चंदनी तेल घेऊन , त्यांत ती पूड चांगली भिजवून लहानशा सुपारीएवढ्या गोळ्या करून ठेवाव्या . नित्य प्रातःकाळी सुमारे चार तोळेपर्यंत थंड पाणी घेऊन त्यांत एक गोळी घालावी ; आणि अर्धा तोळा खडीसाखरेची पूड घालून तें प्राशन करावें . याच क्रमाने सायंकाळीही घ्यावे . हे औषध घेतल्यापासून सहा प्रहरांत आग होत असलेली बंद होते ; व दुस्तर प्रमेहाचा सात दिवसांत नाश होतो . पथ्य गव्हाची पोळी , तुरीचे वरण , तूप व साखर इतकेच पदार्थ खावे . ( ५ ) थंड्या प्रमेहावर वेळूची पाने सुकवावी . नंतर प्रति वेळी अर्ध तोळा ती पाने , व १ तोळा उपर साळीची मुळे घेऊन , साधारण कुटून २८ तोळे पाणी घालून अष्टमांश काढा तयार करावा . हा काढा तयार होत आला म्हणजे त्यांत १ तोळा खडीसाखर घालून काढा उतरून वस्त्रगाळ करून घ्यावा . 
( ६ ) बहुमूत्ररोगावर- कळकीच्या ओल्या अथवा वाळलेल्या पाल्याचा काढा करून दुवक्त द्यावा . आणि प्यावयासही हाच काढा द्यावा . ( ७ ) बालकाचा खोकला व दमा यांवर - वंशलोचनाचे चूर्ण मधाशी द्यावे . अथवा वेळूची गांठ पाण्यात उगाळून द्यावी .
संदर्भ -वनौषधी गुणादर्श 

टिप-
माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.
#Dr_Kailash_Ugale_Shree_Vitthal_Herbals_Pandharpur काॕपी पेस्ट कींवा फाॕर्वर्ड करतांना माहिती संकलक यांचे नाव असावे ही विनंती.

Post a Comment

0 Comments