ऐकलं का! आता बांबूपासून तयार होईल इथेनॉल, नंदुरबार येथे होणार जगातला पहिला बांबू पासून इथेनॉल तयार करणारा प्रकल्प
65 कोटींच्या गुंतवणुकीतून होईल का शेतकऱ्यांना फायदा
बांबू शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन व्हावे यासाठी गेल्या चार वर्षापासून जे प्रयत्न करण्यात येत होते त्या प्रयत्नांचे यश म्हणजे हा प्रकल्प आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर आणि नागार्जुन इंडस्ट्रीज यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे भारतात प्रत्येकी 65 कोटींच्या गुंतवणुकीची सोबत मध्यम प्रमाणात बांबू आधारित इथेनॉल यंत्र उभारणे शक्य झाले आहे. या प्रकल्पासाठी जो काही कच्चामाल लागेल त्याची गरज पूर्ण करण्यासाठी 1500 एकरावर उगवलेल्या तब्बल 60 हजार टन बांबू ची वार्षिक आवश्यकता असेल. त्यामुळे जे शेतकरी बांबू उत्पादन करतात अशा शेतकऱ्यांना खात्रीशीर वार्षिक उत्पन्न तसेच हक्काचे बाजारपेठ मिळेल.
बांबू पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पहिली कापणी तीन वर्षानंतर घेतली जाते परंतु पहिली दोन वर्षे त्यामध्ये आंतर पीक घेता येऊ शकते. सध्या पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे परवानगी मिळाली असल्याने इथेनॉल वापरायला चांगला वाव निर्माण झाला आहे.
English Summary: ethenol making from bamboo project set up in nandurbaar in maharashtra
Published on: 09 March 2022, 09:42 IST
0 Comments