🙏🌺|| शुभं करोति ||🌺🙏
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
ऐक लक्ष्मि बैस बाजे |
माझे घर तुला साजे |
घरातली पीडा बाहेर जावो |
बाहेरची लक्ष्मि घरांत येवो |
घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ ||
दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन |
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते || ४ ||
अधिराजा महाराजा वनराज वनस्पती |
इष्टदर्शनं इष्टानं शत्रूणां च पराभवम् |
मुले तु ब्रह्मरुपाय मध्ये तु मध्यरुक्मिणी |
अग्रतः शिवरुपाय अश्वत्थाय नमो नमः || ५ ||
0 Comments