महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास
#क्षत्रिय_मराठा_चालुक्य_राजवंश
-------------------------------------------
चालुक्य राजवंशाच्या 4 शाखा आहेत 1)वातापी चे चालुक्य 2) वेंगीचे चालुक्य 3) गुजरातचे चालुक्य 4) कल्याणीचे चालुक्य. यामध्ये वातापी आणि कल्याणीचे चालुक्य मुख्य आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर सार्वभौम सत्ता गाजवली. वेंगीचे म्हणजेच सध्याच्या आंध्रप्रदेशचे चालुक्य जी चालुक्य वंशाची एक शाखा होती त्यांनी सार्वभौम सत्ता गाजवली नाही ते मांडलिक राहिले. त्यानंतर गुजरातचे चालुक्य किंवा सोलंकी हे देखील सार्वभौम राजे नव्हते. आणि यामध्ये दुमत आहे काही इतिहासकारांच्या मते गुजरातचे चालुक्य हे दक्षिणेच्या चालुक्यांचे वंशज होते. तर काहींच्या मते तो वेगळा वंश आहे त्यांचा दक्षिणेतील चालुक्यांशी संबंध नाही.
आपण महाराष्ट्रावर सार्वभौम सत्ता गाजवणाऱ्या दोन मुख्य वातापी म्हणजेच बदामीचे चालुक्य आणि कल्याणीचे चालुक्य यांच्या बद्दल माहिती घेऊयात.
#वातापीचे_चालुक्य.
क्षत्रिय मराठा वाकाटक राजवंशाच्या 250 वर्षाच्या कारकिर्दीनंतर वाकटक राज सत्तेच्या आस्था नंतर म्हणजेच इसवी सन 500 नंतर उदय झाला चालुक्य राजवंशाचा. काही ठिकाणी चालुक्यांचे मूळ स्थान #अयोध्या सांगितले आहे चालुक्य राजवंशाचा मूळ पुरुष #जयसिंह होता. त्याच्यानंतर त्याचा पुत्र #रणराग गादीवर आला हे दोघेही सार्वभौम राजे नव्हते पण त्यानंतर रणरागाचा पुत्र #प्रथम_पुलकेशी गादीवर आला आणि यानेच चालुक्य राजवंशाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले त्यामुळे यालाच चालुक्य राजवंशाचा संस्थापक मानले जाते. वातापीच्या चालुक्य साम्राज्याचा कार्यकाळ इसवी सन 535 ते इसवी सन 757 पर्यंत होता म्हणजे सुमारे 222 वर्ष वातापीच्या चालुक्य राजवंशाने महाराष्ट्र कर्नाटक आणि आसपासच्या प्रदेशावर राज्य केले. वातापीच्या चालुक्य साम्राज्याची राजधानी #वातापी होती म्हणजेच सध्याच्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील #बदामी हे शहर होय.
वातापीच्या चालुक्य राजवंशात अनेक राजे झाले त्यापैकी काही महत्त्वपूर्ण राजांची वंशावळ पुढे देत आहे.
●जयसिंह
●रणराग
●पहिला पुलकेशी
●पहिला किर्तीवर्मा
●दुसरा पुलकेशी
●पहिला विक्रमादित्य
●विनयादित्य
●विजयादित्य
●दुसरा विक्रमादित्य
●दुसरा किर्तीवर्मा
चालुक्य अगोदर #कदंब राजांचे मांडलीक होते त्यानंतर कदंबांचे अधिपत्य झुगारून प्रथम पुलकेशीने महाराष्ट्र आणि कर्नाटकावर आपली सत्ता स्थापन करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने #अश्वमेध, #अग्नीष्टोम, #वाजपेय, #बहुसुवर्ण हे यज्ञ केले. त्याच्यानंतर त्याचा पुत्र #प्रथम_किर्तीवर्मा गादीवर आला त्याने कर्नाटकातील कदंब कोकणातील मौर्य मध्यप्रदेश आणि ओरिसातील नलराजांवर विजय मिळवून साम्राज्यविस्तार केला.
किर्तीवर्माच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा पुलकेशी अल्पवयीन असल्यामुळे किर्तीवर्माचा लहान भाऊ #मंगलेश गादीवर आला त्यानंतर दुसरा पुलकेशी वयात आल्यानंतर त्याने सिंहासनावर आपला हक्क सांगितला. परंतु मंगलेशाने त्याला नकार दिल्यामुळे मंगलेश आणि दुसरा पुलकेशी यांच्यामध्ये युद्ध होऊन मंगलेशाचा पराभव झाला आणि तो मारला गेला.
#दुसरा_पुलकेशी इसवीसन 611 मध्ये गादीवर आला हा वातापीच्या चालुक्य वंशातील सर्वात बलाढ्य आणि श्रेष्ठ राजा होता. दुसरा पुलकेशी ने उत्तर भारतातील त्याकाळचा सर्वात श्रेष्ठ राजा #हर्षवर्धन याचे दक्षिण भारतातील आक्रमण रोखले व त्याचा पराभव केला. हर्षवर्धनाचा पराभव ही द्वितीय पुलकेशीच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना होती हर्षवर्धनाच्या पराभवामुळे द्वितीय पुलकीशीचे नाव भारतभर पसरले त्यानंतर त्याने #दक्षिणापथनाथ आणि #परमेश्वर या उपाध्या धारण केल्या.
त्यानंतर द्वितीय पुलकेशीने पल्लव राजा महेंद्र वर्मन प्रथम चा देखील पराभव केला व तिकडे आपला भाऊ #विष्णुवर्धन ला प्रतिनिधी म्हणून नेमले व तिथून सुरुवात झाली #वेंगीच्या_चालुक्य वंशाची त्यामुळे वेंगीच्या चालुक्य वंशाचा संस्थापक विष्णुवर्धनला मानले जाते.
द्वितीय पुलकेशीने दक्षिण कोसल व कलिंगाच्या राजांना आपले स्वामित्व कबूल करायला लावले दुसरा पुलकेशी आश्रित रवी कीर्ती याने ऐहोळ बदामी येथे उत्कृष्ट लेण्या पट्टदकल व अनेक देवालये बांधली द्वितीय पुलकेशीचे संबंध इराणचा राजा खुसरोशी होते. दुसरा पुलकेशीने उत्तरेत नर्मदेपर्यंत आपला साम्राज्य विस्तार केला त्यावेळी चिनी यात्रेकरू युआन च्वांग ने पुलकेशीच्या दरबारात भेट दिली होती तेव्हा त्याने द्वितीय पुलकेशी ला महाराष्ट्राचा स्वामी म्हटले.
द्वितीय पुलकेशीनंतर त्याचा मुलगा #प्रथम_विक्रमादित्य राजा झाला त्यानंतर त्याचा मुलगा #विनयादित्य गादीवर आला त्यानंतर त्याचा मुलगा #विजयादित्य गादीवर आला हा सर्वाधिक काळ शासन करणारा राजा होता. त्यानंतर त्याचा मुलगा #द्वितीय_विक्रमादित्य गादीवर आला त्याच्या काळात भारतावर अरबांचे आक्रमण झाले.
वातापीच्या चालुक्य वंशातील शेवटचा राजा होता #द्वितीय_कीर्तीवर्मा याच्यावर मान्यखेतच्या राष्ट्रकूट वंशातील राजा #दंतिदुर्ग ने आक्रमण करून त्याचा पराभव केला व अशा प्रकारे वातापिच्या चालुक्य राजवंशाचा अंत होऊन राष्ट्रकूट वंशाला महाराष्ट्रात सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे 200 वर्ष महाराष्ट्रावर राष्ट्रकूटांची सत्ता होती.
#कल्याणीचे_चालुक्य.
कल्याणीच्या चालुक्य राजवंशाचा मूळ पुरुष #तैलप_द्वितीय होता याने राष्ट्रकूट राजा #कर्क_द्वितीय चा पराभव करून चालुक्य राजवंशाची पुन्हा स्थापना केली याने आपली राजधानी कल्याणपूरला बनवले कल्याणपूर म्हणजेच सध्याच्या महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण शहर होय.
कल्याणीच्या चालुक्य राजवंश देखील अनेक राजे झाले त्यापैकी काही महत्त्वपूर्ण राजांची वंशावळ पुढे देत आहे.
●तैलप द्वितीय
●सत्याश्रय
●दशवर्मा
●पंचम विक्रमादित्य
●द्वितीय जयसिंह
●सोमेश्वर प्रथम
●सोमेश्वर द्वितीय
●शष्ठ विक्रमादित्य
●सोमेश्वर तृतीय
●जगेदकमल्ल द्वितीय
●तैलप तृतीय
●जगेदकमल्ल तृतीय
●सोमेश्वर चतुर्थ
कल्याणीच्या चालुक्य राजवंशाचा कार्यकाळ इसवी सन 973 ते इसवी सन 1190 पर्यंत होता म्हणजे सुमारे 217 वर्षे कल्याणीच्या चालुक्य राजवंशाने महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशावर राज्य केले. तैलप द्वितीय नंतर त्याचा पुत्र #सत्याश्रय गादीवर आला त्यानंतर त्याचा भाऊ #दशवर्मन गादीवर आला त्यानंतर त्याचा पुत्र #पंचम_विक्रमादित्य गादीवर आला त्यानंतर त्याचा पुत्र द्वितीय जयसिंह गादीवर आला याने 1015 ते 1042 असे प्रदीर्घकाळ राज्य केले. त्यानंतर त्याचा पुत्र #प्रथम_सोमेश्वर गादीवर आला याने चोल राजा #राजेंद्र_द्वितीय चा पराभव केला. त्यानंतर त्याचा पुत्र #द्वितीय_सोमेश्वर गादीवर आला त्यानंतर त्याचा पुत्र षष्ठ विक्रमादित्य गादीवर आला.
#शष्ठ_विक्रमादित्य हा कल्याणीच्या चालुक्य राजवंशातील सर्वात श्रेष्ठ राजा होता याने 1076 ते 1126 असे सुमारे 50 वर्ष राज्य केले. शष्ठ विक्रमादित्याने चोलांचा अनेक वेळा पराभव केला कांची शहर लुटले शिवाय त्याने माळव्याच्या राजकारणातही हस्तक्षेप केला होता. याने श्रीलंकेवर स्वारी केली होती केरळच्या राजाचा पराभव केला होता. याने गंगवेंगी व चक्राकोट यावर देखील विजय मिळवला होता काश्मिरी कवी #बिल्हन याच शष्ठ विक्रमादित्यच्या दरबारात होता
त्याने शष्ठ विक्रमादित्य व त्याच्या पूर्वजांवर #विक्रमांकदेव_चरिता हा ग्रंथ लिहिला.
शष्ठ विक्रमादित्याने कला आणि साहित्याला प्रोत्साहन दिले त्याने #विक्रमपूर शहर वसवले तिथे #भगवान_विष्णूंचे भव्य मंदिर बांधले त्याने इसवी सन 1076 ला राज्याभिषेकावेळी #चालुक्य_विक्रमसंवत सुरू केले होते. त्यानंतर त्याचा पुत्र #तृतीय_सोमेश्वर गादीवर आला त्याने #माणसोउल्हास पुस्तक लिहिले व #भूलोकमल्ल ही उपाधी धारण केली. त्यानंतर त्याचा पुत्र #द्वितीय_जगेदकमल्ल गादीवर आला त्यानंतर त्याचा पुत्र #तृतीय_तैलप गादीवर आला त्यानंतर त्याचा पुत्र #तृतीय_जगेदकमल्ल गादीवर आला त्यानंतर त्याचा पुत्र #चतुर्थ_सोमेश्वर गादीवर आला आणि हा कल्याणीच्या चालुक्य वंशातील शेवटचा राजा होता.
क्षत्रिय मराठा चालुक्य किंवा चाळुक्य राजवंशाचे गोत्र #मांडव्य होते काही #भारद्वाज सांगतात यांचे राजचिन्ह #वराह होते आत्ताच्या क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील #साळुंखे व #इंगळे आडनावाचे लोक चालुक्यांचे वंशज आहेत.
#चालुक्य
#क्षत्रिय
#मराठा
#इतिहास
#जय_भवानी
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#जय_महाराष्ट्र
#हर_हर_महादेव🚩
लेखक:- आशिष इंगळे पाटील.
0 Comments