Ticker

6/recent/ticker-posts

बुऱ्हाणपूर लुट सरसेनापती हंबीरराव

 ¶¶  शंभूराजे हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावर  बसल्यानंतर केवळ १४ दिवसात  



" *सेनापतीं हंबीररावांच्या* " नेतृत्वात पार पाडलेली एक मोठी यशस्वी लूट। ¶¶   

         बुऱ्हाणपूर हे शहर मध्य प्रदेशात पूर्व निमर जिल्ळ्यातील तापी नदीच्या किनार्यावर वसले आहे. खानदेशचे नबाब फारुकी यांच्या वास्तव्याच्या हे ठिकाण या बुऱ्हाणपूरचा काळा इतिहासही रक्तरंजित आहे.

"नासीर फारुकीचा बाप मलिक फारुकी आणि असीरगडाचा श्रीमंत आणि सुस्वभावी राजा ' आशा ' यांचे मित्रत्वाचे व दृढ संबंध होते. शात्रासैण्यापासून बचाव करण्यासाठी किल्ल्यात आश्रय द्यावा" असा निरोप नासीर फारुकीने पाठवला. भोळ्या आणि सरळ स्वभावाच्या ' आशा ' या हिंदू राजाने त्याला किल्ल्यात घेतले आणि घात झाला ! पालखीच्या पडद्याआड लपलेल्या नासीर फारुकीच्या सैन्याने आशा व त्याच्या कुटुंबियांची निघ्रून हत्या केली! दगाबाज नासीरने पाठीत खंजीर खुपसला धर्मगुरू झैनुद्दिन याच्या नावाने ' झैनाबाद ' आणि दौलताबादाचा संत बुऱ्हाणद्दीन याच्या नावाने ' कुऱ्हानपूर ' हि दोन शहरे तापी नदी तीरी वसवण्यात आली.

अनेक मोघल बादशाहांच्या आठवणीचे हे शहर साक्षीदार होते. औरंगजेबाची आई मुंताज्महाल आणि धाकात्याभावाची पत्नी येथेच वारली. औरंगजेबाच्या दोघी बहिणी आणि दोन्ही मुले यांचा जन्म इथलाच !

इतकेच नव्हे टार दक्षिणेचा सुभेदार असताना हिराबाई या गुलाम स्त्रीस पळवून औरंगजेबाने तिचे 'जैनाबदिमहाल ' ठेवले ! तिची कबरसुद्धा बुऱ्हाणपुराचा आहे.

संपती , वैभव, कला, वाणिज्य यांनी भरभराटीला आलेले बुऱ्हानपूर हे उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानाला जोडणारा एक महत्वाचा दुवा होते.

बुऱ्हाणपूर हे सोने ,चांदी , हिरे , मोती, माणिक, जडजवाहीर दागिने , उंची वस्तू , अत्तरे व वस्त्रे यांची मोठी बाजारपेठ असल्याने मोठे आर्थिक केंद्र होते.धनाढ्य आणि करोडपती व्यापार्यांची इथे वस्ती होती. शहराच्या बाहेर नवाबपुरा, बहादुरपुरा, करणपुरा , खुरमपुरा , शहजान्ग्पुरा इ. सतरा पुरे अतिश्रीमंत व्यापार्यांच्या वास्तव्यामुळे प्रसिध्द होते.

          अशा यां महत्वाच्या आर्थिक केंद्रावर सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अचानक छापा घातला. २० हजार फौजेनिशी हंबीरराव बुऱ्हानपुरा वर येऊन धडकले ! तो दिवस होता ३० जाने. १६८१ बुऱ्हाणपुरच्या बाहेर तीन मैलांवर बहादुरपुरा नावाचा श्रीमंत आणि संपन्न पुरा मराठ्यांच्या भक्ष्य स्थानी पडला. सोने, चांदी, रत्ने ,जवाहीर व किमती जिन्नस यांचा प्रचंड मोठा साठा मराठ्यांनी लुटून घेतला.

बुऱ्हानपूर च्या बाहेर वसलेल्या सगळ्या सतरा पुरांवर मराठे तुटून पडले आणि त्यांनी सर्वत्र आगी लावल्या. आगीचे लोळ आणि धूर आकाशात उंच पसरेपर्यंत बुऱ्हाणपूरच्या मोगली अधिकार्याना व व्यापाऱ्यांना मराठ्यांच्या या हल्य्याच्या पत्ताच नव्हता.


औरंगाबादचा सुभेदार 'खानजाहन' आणि त्याचा सहाय्यक काकारखान अफगाण याच्याकडे केवळ २०० सैनिक होते ! काकारखानाची नेमणूक औरंगजेबाने हिंदू रयतेकडून ' जिंझीया ' कर वसूल करण्यासाठी केली होती. हंबीररावांच्या या वादळी हल्ल्यामुळे काकार्खानाचे धाबे दणाणले. त्याने शहराचे दरवाजे बंद केले आणि तटबुरुज आणि वेशी यांचा बंदोबस्त करू लागला. बुऱ्हाण पुरच्या भोवती असलेल्या सर्व १७ पुरांमध्ये मराठ्यांनी धाडी घातल्या. सराफ आणि व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांची लुट मिळवली.

आक्रमक म्हणून आलेले मुसलमान बादशहा हिंदुस्थानच्या जनतेला जबरदस्तीने लुबाडून आपले खजिने भरत असत. बहुसंख्य हिंदू जनतेवर अन्यायी 'जिझीया ' कराची सक्ती करणारा औरंगजेब तर सगळ्या जुलमी बादशाहांचा मेरुमणीच ! त्याला धडा शिकवण्यासाठीच शिवप्रभुनी सुरात लुटली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज त्यांचा ' छावा ' औरंगजेबाच्या लाडक्या बुऱ्हाणपुरावर छापा घालत होता . 

          "" हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण सिंहासनावर बसल्यानंतर सरसेनापती हंबीररावांनी हाती घेतलेली  ही मोहीम !""


केवळ १७ पुरे लुटून मराठे स्वस्थ बसले नाहीत तर पुरे मराठ्यांनी खणून काढले ! अनेक वर्षे जमिनीखाली पुरलेली संपती मराठ्यांच्या हाती पडली. या संपतीचा घर मालकानाही पत्ता नव्हता. हसनपुरा , शहागंजपुरा , शहजन पुरा ,खुर्मपुरा नवापुरा इ. सर्व १७ पुरे लुटून मराठे मुख्य बुऱ्हाणपूरकडे वळले ! " शिड्या लावून शहराभोवती तटावरून आत चढण्याचा मराठ्यांनी प्रयत्न केला. पण आतल्या मनसबदारांनी निकराचा प्रतिकार करून बुऱ्हाणपूर मराठ्याना दाखल होऊ दिले नाही.

बुऱ्हाणपुरच्या छाव्यात मराठ्यांनी भांडी, काच, सामान , धान्य तसेच मसाले व वस्त्रेसुद्धा लुटून घेतली होती पण ही लुट इतकी मोठी होती कि ती सर्व वाहून नेणे अशक्य असल्यामुळे अराथ्यानी हे समान तसेच टाकून दिले. प्रचंड मोठी लुट घेऊन मराठे परतले तेव्हा बुऱ्हाण पुरातील रस्त्यांवर जळलेल्या मोठ्या वस्तूचा सदा पडला होता.

औरंगाबादचा सुभेदार खांजाहन बुऱ्हानपुरास येईपर्यंत मराठे साल्हेर ला येऊन पोहोचले होते. खानजाहन डोक्याला हात लावून बसला. हम्बीररावांच्या धडकेमुळे भयभीत झालेल्या मुल्ला-मौलवी व्यापारी आणि नागरिकांनी बादशहाला विनंती केली:-"काफरांचा जोर झाला. आमची अब्रू आणि संपती नष्ट झाली " यापुढे शुक्रवारची नमाज बंद पडेल.

बुऱ्हाणपुरची लुट ही औरंगजेबाच्या अंत; करणावर झालेली मोठी जखम होती. संतापलेल्या बादशाहने खानजाहन सुभेदाराला हाकलून त्याजागी इराजखानास नेमले !"

"दक्षिण प्रांताची अशीच दुर्दशा झाली आहे. हा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे भूतलावरील स्वर्ग आणि बुऱ्हाणपूर हे तर विश्व सुंदरीच्या गालावरील तिळ ! पण हे शहर आज पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे ...! "

   ■■ जय शिवराय ■■

Post a Comment

0 Comments