✨ 🌾..गोकर्ण चहा(अपराजिता) ☕...
खूप मस्त लागतो चवीला आणी बाकी पण सगळे आयुर्वेदीक औषधी वनस्पती त्या सोबत वापरून बनवल्यास आणखीन च खूप चविष्ट आणि आरोग्यास फायदेशीर बनतो .मी रोज घेते असा चहा माझ्या बागेतील सर्व आयुर्वेदीक झाडांपासून बनवलेला ...☕
गोकर्ण च्या फुला मध्ये मोठ्या प्रमाणात कॅ्शियम, मॅग्नेशियम , जस्त , मंग्निज , सोडियम आणि अँटी ऑक्साईड असते .ज्याचे शरीराला खूप जास्त फायदे होतात . जाणून घेऊ त्याची कृती आणि अनेक फायदे ..
☕...चहा बनवण्याची कृती _ गोकर्ण ची फुले हलकेच धुवून घ्यावीत . फक्त फुले पाण्यात उकळून सुध्धा हा चहा बनवला जातो . परंतु त्याची उपयुक्तता आणखी वाढावी या साठी मी त्या मध्ये तुलसी , पुदिना , आल्याची पाने उपलब्ध असल्यास अन्यथा आले घातले एक तुकडा तरी चालते . गवती चहा ची काही पाती , आणि all spice चे एक दोन पाने घेते ...सर्व पाने स्वच्छ धुवून घ्यावीत .
एका पातेल्यात दोन कप पाणी घ्यावे .या मध्ये गोकर्णची फुले , पुदिना , तुलसी , आले , all spice आणि खडीसाखर एक छोटा खडा टाकून छान उकळून घ्यावे .2 कप चे एक कप पाणी करावे व गाळून घेऊन पिण्यास तयार आरोग्यवर्धक गोकर्ण चहा ...
☕☕गोकर्ण चहा चे फायदे _☕☕
1_ नियमित सेवनाने थकवा दूर होतो .
2_ मानसिक ताण तणाव कमी करून डिप्रेशन कमी करण्यास मदत करतो.
3_रक्त साफ करण्यास खूप मदत होते .
4_त्वचेचे विकार या मुळे कमी होतात .
5_ पिंपल येणे कमी होते .त्वचा निरोगी राहते .
6_वजन कमी करण्यात मदत होते.
7_सर्दी खोकला या सारख्या विकारात खूप गुणकारी असतो हा चहा.
8_डायबेटिस च्या पेशंट ना खूप फायदेशीर असतो .शुगर कंट्रोल करण्यास मदत करतो.
9_स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
10_गोकर्ण चहा मध्ये कॅन्सर च्या पेशी कमी करण्याची ताकत आहे .कॅन्सर रोखला जातो याचा नियमित सेवनाने.
11_संपूर्ण शरीर शुध्दी / बॉडी डिटॉक्स होते .
12_केसांच्या सर्व समस्या याच्या नियमित सेवनाने कमी होतात .
13_दिवस भराचा थकवा दूर होतो याच्या एक कप सेवनाने .☕
असे अनेक फायदे असणारा गोकर्ण चहा आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे . आणि आपले शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे ....😊🙏
कमी जास्त माहीती होउ शकते.. कृपया सल्ल्यानेच वापरावे.
0 Comments