करोणाकाळात सुंठीचा तुकडा व पींपळी सारखी तोंडात ठेवावी .
खुप छान गुण आहे. फुफ्फुसाची ताकद वाढवने व फुफ्फुसात ईन्फेक्शन न होउ देण्याची किमया पींपळीत आहे. मात्र छातीत ईफेक्शन व्हायचे आतच वापरावी.
म्हणून आजचा लेख....
नीसर्गाची अमुल्य देण पिंपळी/
गुणांची उपयोगी सगळी//
आयुर्वेदात पिंपळीला फार महत्व आहे.ती तेवढि गुणाचीही आहे.
मात्र बराच काळपींपळी वापरल्यास व पथ्थ न पाळल्यास कफपीत्त वाढु शकते.
पण वर्धमान पिंपळी यास अपवाद आहे.
पिंपळीची शुद्धी -चीत्रकाच्या काढ्यात पिंपळी शीजवुन वाळवुन वापरावी.
मात्रा 0.5 ते 1ग्रॕम.
कुल - पिप्पलीकुल . ( Piperaceae ) . लॅ . नाव - Piper longum .
म - पिंपळी .
स्वरूप - विशिष्ट गंध असलेल्या वेली . जमिनीवर पसरणाऱ्या किंवा दुसऱ्या झाडाच्या साहाय्याने वर जाणाऱ्या .
पर्ण - ५ ते ८ सेंमी . लांब , नागवेलीच्या पानाप्रमाणे दिसणारे , एकान्तर , पाच शिरा उठून दिसतात .
पुष्प - एकलिंगी , वेगवेगळ्या वेलींवर उगविणारे .
फल - लांब , सोंडेच्या आकाराचे , पिकल्यावर लाल व वाळल्यावर धुरकट काळे दिसणारे .
वर्षाऋतूत फुले व शरदात फळे येतात .
प्रकार - पिंपळी , गजपिंपळी , सिंहली व वनपिंपळी .
गजपिंपळीतही Piper chaba नावाची वनस्पती असून तिचे फळ बरेच मोठे असते .
सिंहली पिंपळी श्रीलंका , सिंगापूर येथे होते .
वनपिंपळी रानात अपोआप उगवते . ही लहान , पातळ व कमी तीक्ष्ण असते .
बंगालमध्ये पुष्कळ उगवते . पिंपळी बहुतेक आयात करतात . छोटी सिंहली व मोठी वनपिंपळी येथे उगवते .
उत्पत्तिस्थान - बंगाल , बिहार , आसाम , पूर्वनेपाळ , कोकणापासून केरळपर्यंत पश्चिम किनाऱ्याला , मलेशिया , इंडोनेशिया , सिंगापूर , श्रीलंका व निकोबार बेटे . तामिळनाडूच्या अन्नमलाई तसेच आसामच्या चेरापुंजी भागात आणि पिंपळमुळासाठी आंध्रात विशाखापट्टण जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात व्यापारी तत्त्वावर लागवड करतात . (द्र.गु.विज्ञान भाग 1/2)
पिंपळीच्या वेली असतात .
हिची पानें नागवेलीच्या पानांसारखी असून , वाटोळी व तिखट असतात .
या वेलींवर भाद्रपदाच्या सुमारास शेंगा येतात , त्यास पिंपळ्या असे म्हणतात . पिंपळीत जाडी व बारीक असे दोन प्रकार आहेत . बारीक पिंपळीस " लेंडी पिंपळी " असे म्हणतात . कोंकणांत कित्येक ठिकाणी डोंगराळ प्रदेशांत पिंपळीच्या वेली उत्पन्न होतात . पिंपळी वातनाशक व उष्ण आहे . पिंपळी च्या मुळास पिंपळमूळ " असे म्हणतात . ओल्या पिंपळ्या लोणच्यांत घालतात .
पिंपळी- स्निग्ध , तिखट , उष्ण , रतिकाळी हितकारक , अग्निदीपन करणारी , कडू , रसायन , सारक , लघु , हृदयप्रिय , रेचक , पचनकारक , वात , दमा , कफ , क्षय , खोकला , ज्वर , कुष्ट , अरुचि , गुल्म , मूळव्याध , प्रमेह , उदर , त्रिदोष , तृषा , कृमि , अजीर्ण , आमांश , पांडू , कावीळ व शूल यांची नाशक आहे .
ही ओली असतां- स्निग्ध , शीत करणारी , मधुर , कफकर , पित्त नाशक व गुरु अशी आहे .
पिंपळी- उष्ण , अग्निदीपक , तिखट , कोष्ठ - शुद्धिकारक , व कृमि , कफ , वात व श्वास यांची नाशक आहे .
वानरपिंपळी -कडू , तुरट , गोड ; व मूत्रकृच्छ्र , अश्मरी , योनिशूल यांचा नाश करिते .
रानपिंपळी- रुचिकर , तिखट , उष्ण व दीपन अशी आहे . ही ओली गुणांनी अधिक आहे ;
शुष्क अल्पगुण आहे , व अति तीक्ष्ण आहे .
पिंपळमूळ- अग्निदीपक , रुचिकर , पित्तल , पाचक , रुक्ष , भेदक , तीक्ष्ण , कडू , लघु , उष्ण ; व आम , शूल , प्लीहा , गुल्म , उदर , कफ , वायु , दमा , खोकला , कृमि , आनाह , क्षय , कफ व वातोदर यांचा नाश करिते .
( १ ) सर्व वातविकार व श्वास - कासावर चौसष्टी पिंपळी - पिंपळीचा एकसारखा चौसष्ट प्रहर खल करावा ; तीस चौसष्टी पिंपळी म्हणतात . ही पिंपळी फारच तीन होते . ही तांदुळाइतकी मधात द्यावी . हिने फारच दाह वगैरे झाल्यास उतार - तूप द्यावें .
( २ ) अपस्मार वायगोळ्यावर ( हा वायगोळा एकाएकी उठून काळजापर्यंत येतो , व लहान वरवंट्याएवढा एकाच ठिकाणी दिसतो ) . पिंपळी दोन भाग , मिरे तीन भाग , व सैंधव एक भाग यांची पूड करून ती ताकाच्या निवळींत ६ मासेपर्यंत द्यावी .
( ३ ) पिंपळीचूर्ण -पिंपळीचे चूर्ण करून ते गुळाशी द्यावे . म्हणजे अरुचि , हृदयरोग , श्वास , कास , . क्षय , कावीळ , अग्निमांद्य , पांडू , सामान्य फॅपरें व जीर्णज्वर यांचा नाश होतो . पिंपळीचे चूर्ण मधाशी घेतले असतां मेद , कफ , श्वास , कास , उचकी , ज्वर , पांडु रोग व प्लीहा यांचा नाश होतो .
( ४ ) निद्रा येत नसल्यास- पिंपळमूळाचें चूर्ण गुळांत द्यावे . ( ५ ) श्वासावर- पिंपळमूळाचा आठ प्रहर खल करून ते चूर्ण मधाशी द्यावे .
( ६ ) स्तनांत दूध येण्यास- तापलेल्या दुधात दोन मासे चूर्ण घालून द्यावें .
( ७ ) ओकारी , कास , श्वास व उचकीवर- पिंपळीचे चूर्ण व मोराच्या पिसाची राख मधांत कालवून वारंवार चाटावी .
( ८ ) आमातिसारांत शूळ होतो त्यावर- पिंपळी व हरीतकी यांचे चूर्ण उष्णोदकाशी द्यावे , म्हणजे सुखरेचन होऊन शूळ राहील .
( ९ ) रातांधळ्यास- गोमूत्रांत पिंपळी उगाळून अंजन करावे , व अगस्त्याची भाजी रोज खात जावी .
( १० ) पानथरी वर- पिंपळी व मध घालून ताक प्राशन करावे .
( ११ ) सर्व उदररोगांवर गोमूत्राच्या अथवा निवडुंगाच्या चिकाच्या सहस्र भावना दिलेली पिंपळी द्यावी ; अथवा वर्धमानपिंपळी द्यावी . किंवा निवडुंगाच्या चिकांत पिंपळीचा एक दिवस खल करून ते शक्तितारतम्याने द्यावें ; व याचाच पोटावर लेप करावा .
( १२ ) वर्धमानपिंपळी- गाईचे दूध ४ तोळे , पाणी १६ तोळे , पिंपळी ३ तोळे एकत्र करून कल्हईच्या भांडयांत कढवून , पाणी आटले म्हणजे त्यांतील पिंपळ्या चावून वर दूध प्यावे .
( १३ ) अन्न न जिरेल तर- जेवणानंतर लागलीच पिंपळीची पूड मधातून खावी .
( १४ ) गुल्म रोगावर - पिंपळी व जवखार यांचे चूर्ण तीन मासे , आल्याचा रस व मधाशी द्यावे . ( १५ ) वमन होण्यास- पिंपळी , गेळफळ व सैंधव यांचे चूर्ण ऊन पाण्याशी द्यावें .
( १६ ) आमशूळ , अजीर्ण व सुजेवर- पिंपळी व सुंठ यांचे चूर्ण गुळांत द्यावें .
( १७ ) कफरोगावर-- पिंपळीच्या चूर्णात तूप व मध , विषम भागाने घालून ते द्यावे .
( १८ ) अपस्मारावर- पिंपळी निंबाच्या रसांत उगाळून नस्य द्यावे .
( १ ९ ) आम्लपित्तावर- गांठे पिंपळमुळाचे चूर्ण प्रतिवेळी पाव तोळा , खडीसाखरेशी घ्यावे . हे औषध प्रत्यही दुवक्तप्रमाणे एक महिना घ्यावे .
( २० ) बालकांचे ज्वर , खोकला , अतिसार व ओकारी यांवर- पिंपळी , मंजिष्ठ , नागरमोथे व काकडशिंगी यांचे मासा दोन मासे चूर्ण मधातून द्यावे .
(२१ ) ओकारीवर - गांठेपिंपळमुळाचे चूर्ण वस्त्रगाळ करून त्यांत तितकेंच सुंठीचे चूर्ण मिश्र करावे , आणि प्रतिवेळी सहा मासे मधात तीन मासे खलून द्यावे . ( २२ ) वातकफज्वरावर - पिंपळीचा काढा मध घालून द्यावा . ( २३ ) हद्रोग , ज्वर , खोकला , क्षय यांवर- ९ ६ तोळे गाईचे लावून अर्धे आटवून थंड झाल्यावर त्यांत साखर , मध , तूप ही दोन दोन तोळे व पिंपळीचे चूर्ण १ तोळा टाकून प्यावे .
( २४ ) मुलांस आयनेर ( गर्भिणी आईचे दूध लेकरूं प्यालें असता त्याला खोकला , अग्निमांद्य , वांती , झापड , अरुचि व भ्रम हे होतात ; तें रोड होते , व त्याचे पोट मोठे होऊन टिळटिळीत दिसते . ) झाल्यास त्यावर पिंपळीची पूड मधांत खलून एक उडदापासून एक गुंजेपर्यंत , बालकाच्या वयाच्या मानाप्रमाणे चाटण द्यावे .
( २५ ) मूर्छेवर- पिंपळीचे चूर्ण मधांत खलून चाटण द्यावे .
( २६ ) आमवातावर- गाईचे दूध १ शेर घेऊन त्यांत पिंपळी एक सबंध व बिबे चार कातरून घालून पावशेर शेष राहीपर्यंत आटवून , त्यांत खडीसाखर घालून तें दूध घ्यावें .
( २७ ) उदावर्त व गुल्म रोगावर- पिंपळ्या ४ घेऊन चूर्ण करून , ते दोन तोळे पाण्यांत कालवून , ते वस्त्रगाळ करून , त्यांत १ तोळा किंवा २ तोळे गाईचे तूप घालून ते घ्यावे .
( २८ ) खोकल्यावर- गांठेपिंपळमूळ , सुंठ व बेहडे यांचे चूर्ण मधांत द्यावे , म्हणजे खोकला त्वरित जातो .
( २ ९ ) दंतरोगावर पिंपळी , जिरें व सैंधव यांचे चूर्ण करून दांताच्या मुळाशी घासावे , म्हणजे ठणका , सूज , हालणे , वगैरे विकार शमतात .
( ३० ) मूळव्याधीवर- पिंपळीचे चूर्ण ताकांत द्यावें .
( ३१ ) वातविकारावर -विस तोळे दूध तापत ठेवून , निमें आटल्यानंतर त्यांत गांठीपिंपळमुळाची वस्त्रगाळ पूड करून एक तोळापर्यंत घालावी , आणि चांगलें आटेपर्यंत तें ढवळून ढवळून आटवावे . नंतर त्यांत खडीसाखरेची पूड एक तोळा मिश्र करून , प्रतिदिवशी सकाळी एक वेळ प्रमाणे घ्यावें .
( ३२ ) परिणामशूलावर- पिंपळीचे चूर्ण ४ तोळे , गूळ १६ तळे , व गाईचे तूप ६४ तोळे , हे पदार्थ २५६ तोळे दुधांत पक्क करून त्यांतून रोज सकाळी ४ तोळेपर्यंत द्यावें .
( ३३ ) सर्व शिरोरोगांवर- पिंपळी आणि सैंधव पाण्यात उगाळून त्याचे दोन तीन थेंब नाकांत पिळावे , म्हणजे त्वरित गुण येईल .
( ३४ ) विषमज्वर , हृद्रोग , खोकला , दमा , व क्षय यांवर पंचसार- मध , तूप , दूध , पिंपळ्या , पांढरी साखर , ही पांच एकत्र करून घुसळून द्यावे .
( ३५ ) धातुगत ज्वर , दमा , खोकला , पांडु , धातुक्षय व अग्निमांद्य यांवर- मध एक भाग , तूप दोन भाग , पिंपळी चार भाग , साखर आठ भाग , दूध बत्तीस भाग ; आणि चातुर्जात ( दालचिनी , तमालपत्र , वेलची , नागकेशर ) एक भाग , याप्रमाणे घालून पचन करून त्याचे मोदक करावे , व त्यांतून रोज एक द्यावा .
( ३६ ) रक्तपित्तावर पिंपळी मधाशी चाटावी .
( ३७ ) पाचक पिंपळी- पिंपळ्या लिंबाच्या रसांत भिजू घालून त्यांत सैंधवाचे चूर्ण घालावे . दोनचार दिवस भिजल्यानंतर सुकवून ठेवून त्यांतून दोन चार पिंपळ्या खात जाव्या , म्हणजे अजीर्णविकार वगैरे मोडून तोंडास रुचि येते व अन्न पचन होतें .
संदर्भ -आयुर्वेदमहोपाध्याय कै.शंकर दाजीशास्त्री पदे गुरुजी स्वानुभव
" हिंदुस्थानात प्राचीन काळी प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले गेले आहेत . आज त्या ग्रंथांचा अंशही आपणास पाहावयास मिळत नाही . इंग्रजांचे राज्य असल्यामुळे व त्यांची विद्या राजमान्यता मिळाल्यामुळे विकास पावत आहे . आणि त्यामुळे आमच्या पूर्वजांचे कित्येक ग्रंथ त्याचप्रमाणे नाना तर्हेची विद्या नष्ट होत आहे .
कष्टं शिष्टक्षतिकृति कलौ कार्यमृच्छन्ति विद्या । ” असे उद्वेगजनक वाक्य कित्येक लोकांच्या मुखांतून बाहेर पडत आहे याचे कारण हेच आहे . याकरिता आमच्या सुशिक्षित वर्गाने , ज्यांची बुद्धी विशाल आहे , ज्यांना ईश्वराने अनुकूलता दिली आहे , अशा सद्गृहस्थांनी या उद्वेगजनक गोष्टीचा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची फार आवश्यकता आहे .
" -शंकर दाजीशास्त्री पदे [ इ . स . १८ ९ ३ साली लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून ]
टिप-
माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
#Dr_Kailash_Ugale_Shree_Vitthal_Herbals_Pandharpur
0 Comments