...☘️🌾.... शेवगा..( Drumsticks).....🌾☘️..
शेवगाः। शेवग्यासारख दुसर औषधि आणि सद्गुणि झाड दुसर नाहि!!!.. पाने , फुले, फळे, मुळं, बिया, सालं, असं सर्वस्व आपल ,, शेवगा,, समर्पित करत असतो..
मूळचा भारतातला, आफ्रिका खंडातले हे झाड..
### ,, भारतीय आयुर्वेदा नुसार,, ३०० प्रकारच्या आजारावर औषध म्हणून याचा उपयोग केला जातो.. मूत्रखड्यापासून मधूमेहापर्यंत तर ह्रूदय रोगापासुन कर्करोगासारख्या गंभिर आजारामद्धे प्रभावि उपयोगि आहे...
###. आयूर्वेदिक ग्रंथामद्धे। .. ,, चक्षुष्यं शिग्रुजं बीजं तीक्षोष्णं विष नाशनम्।।.. तिक्षगंधा, सहजन, मुनगा, शोभंजन ,,.. अशि नाना नावे आहेत. तर बघू या याचे काय फायदे आहेत ःः। अग्निमांद्य, कुपचन, पोटशुळ, या विकारात शेवग्याचि साल उकळवून काढा देतात.,
###. सर्व प्रकारच्या ज्वरांत, देखिल ह्याचा काढा घ्यावा, अचानक मूर्च्छा आलि तर, त्याच्या बियांचि पूड सूंघवतात.. याच बियांचे तेल, आमवात, संधिवातात चोळतात., आराम पडतो., मुळांचा रस, मुळांच्या सालिचा काढा, दमा, प्लिहा,व्रूद्धि, यक्रूतव्रुद्धि, मुत्रखडा, यांवर गुणकारि आहे.,
###.. शेवग्याच्या शेंगामद्धे कँलशिअम, आयर्न, व मुबलक व्हिटमिन्स असल्याने हाडे मजबूत होतात, दूधात जर याचा रस मिसळून मुलांना दिला तर उंचि भरपुर वाढते, हे एक उत्तम अँटिबायोटिक असल्याने रक्तातिल दूषित घटक बाहेर पडून, त्वचाविकार, अँक्ने, मुरूमे, पुटकुळ्या, बर्या होतात., याच्या सेवनाने.
###.. शेवगाच्या शेंगाने रक्तातलि साखर नियंत्रित राहते.. , मधूमेह, आटोक्यात राहतो., घश्यातलि खवखव, कफ, श्वास घेण्यात त्रास असेल तर, शेवग्याच्या शेंगांचे गरम, गरम, सूप किंवा सार घ्यावे, बरे वाटते.
# क्षयरोग, ब्राँन्कायटिस, अस्थमा, यासारख्या फुफ्फुसांच्या आजारावर शेवग्याच्या शेंगा उत्तम काम करतात.
### गर्भवति स्रिच्या गर्भाचि वाढ चांगलि होण्यास व प्रसूती सुकर होण्यास शेंगांचे विविध पदार्थ-;- सार, सूप, भाज्या, आमटि भरपूर खावि स्रिने, प्रसूतिनौतर देखिल दूध भरपुर येते व बाळाचे पोषण चांगले होते.
## डोकेदुखी, नेत्रविकार, स्वरभंग, दंतरोग, क्रूमिविकार, अपस्मार, सर्वच उदरविकिर, अर्धांगवायू, अश्या विविध आजारांवर जी औषधे तयार करतात,,
,, आयुर्वेदात,, शेवगा प्रामुख्याने वापरल्या जातो.
###. श्वानदंशावर खुपच उपयोगि आहे, याचि पाने, लसूण, हळद, मीठ, व काळे मिरे याचे वाटण दंशावर लावावे. व पोटातून देखिल खायला द्यावे. होणारे दुष्परिणाम टळतात, ,, जिभ जड असल्यास, तोतरेपणा यावर शेवग्याचे सूप द्यावे, पाने क्रूमिनाशक, कफोत्सर्जक, वायूनाशक, आहेत, याचि वाळवून पुड करून, भाज्यांमद्धे, आमटित, रोज वापरावि, आरोग्य चांगले राहते,
###..पित्तप्रकोप, श्वास नलिकाचा दाह, यात गुणकारि आहे, शेवग्यात B, complex, विपुल असल्याने तोंड येणे, अल्सर, छाले, यांवर शेवग्याचि भाजि , आमटि खावि, तूरटिऐवजि पानांचि पावडर पिण्याच्या पाण्यात टाकल्यास पाणि शुद्ध होते, कानातून मवाद जात असेल तर २,३, थेंब कानांत टाकावं, तसेच vit. A, भरपूर असल्याने नेत्रविकार दूर होउन डोळे निरोगि राहतात.
###. उच्च रक्तदाब देखिल आटोक्यात राहतो, याच्या नियमित सेवनाने, मूत्रखडा झाला असेल तर, नियमित शेवग्याच्या शेंगाचे सूप रोज घ्यावे, खडे विरघळून बाहेर पडतात, याचे तेल नाकात २ थेंब टाकल्यास, नाक फुटणे, घोळणा बाहेर येणे, हे बंद होतात, काविळमद्धे शेवग्याच्या पानांचा रस १ चमचा, १ चमचा मध, आणि सोबत शहाळ्याचे पाणि घ्यावे,
###. अंगावर कुठेहि गळू झाल्यास याचि साल उगाळून लावावि, गळू सुकते, याच्या मूळाच्या सालिचि पावडर, जुना खोकला, सूज, जुलाब, फिटस्, हिस्टेरिया, अधून मधून येणारा मुदतिचा ताप, संधिवात, यावर अतिशय गुणकारि आहे,.
### घरोघरी रोजच्या जेवणात वापरल्या जाणारि ,, शेवग्याचि भाजि,, एक ,, अम्रूततुल्य,, स्वरूप आहे..
##*##*##...
0 Comments