Ticker

6/recent/ticker-posts

बांबू - एक औषधि वनस्पती

बांबू - एक औषधि वनस्पती



    बांबू.. सर्वांना परिचित आहे. नेहमी याने इमारती, फर्निचर तयार करण्यात येतात. पण हि वनस्पती

 आयुर्वेदात खुप अनमोल आहे.  बांबू गोडसर, आणि थंड प्रव्रुत्तिचि आहे. बांबूचे चे अंकुर खाल्ल्यास मूत्राघात म्हणजे युरिन थोडि थोडि होणं, जळजळ होणे हे विकार दूर होतात., रक्तपित्त म्हणजे नाकातून , कानातून रक्त येणे हे त्रास बरे होतात.जर तुम्हाला अर्धशिशी, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर १० मि.लि बांबूच्या मूळाच्या रसात ५००मि . ग्राम कापूर मिसळून १-२ थेंब नाकात टाकावे लगेच वेदना थांबतात..

       

        बरेच वेळा सर्दि  साचल्यामुळे कान दुखतो . अशा वेळी लसूण एक पाकळी, आले रस व बांबू कोवळा एकत्र कुटून  हे तिळाच्या तेलात शिजवून मग गाळून हे तेल कानात टाकल्यास आराम मिळतो.. तोंडात व्रण, छाले आल्यास कोवळा बांबू मिक्सरमध्ये वाटून हि पेस्ट आतून मधासोबत

    लावल्याने फार लवकर छाले बरे होतात..

  जर फुफ्फुसे यांना सूज आल्यास बांबूचि पाने पाण्यात उकळून याचा काढा करून १०-२० मिलि  या मात्रेत प्यायला द्यावे व याने गुळण्या कराव्यात. याने लंग्जचि सूज, खोकला, घश्याचि सूज हे सर्व बरे होतात..


                             


       पावसाळ्यात व हिवाळ्यात कोरडा खोकला होतो, आणि बरेच वेळा लवकर बरा होत नाही. अशा वेळी बांबूचे चूर्ण मधात मिसळून दिवसातून दोन वेळा घेतल्यास कफ सुटतो आणि कोरडा खोकला बरा होतो. पोटाच्या विकारांवर गुणकारी आहे. अपचन, अजिर्ण, जुलाब झाले असता, बांबूचि कोवळी पाने, किंवा कोवळि अंकुर किंवा मूळे आणून याचा काढा बनवून १०-२० मिलि प्रमाणात घ्यावा..

       मुळव्याध बरि होत नसल्यास  कोवळ्या बांबूचा काढा करून याने कोंब धुवावा, व मोडला लावावे

 याने वेदना कमी होतात. आजकाल ताण तणावाच्या परिस्थितीत  व चुकिच्या आहाराने मधुमेही रुग्ण

 वाढले आहे. यावर बांबुचि फुले,जव, त्रुण नियमित पणे भाजिरूपात खाल्ल्यास साखर नियंत्रणात येते.

              मूत्राघात, युरिनचि जळजळ, मूत्रखडा, युरिन साफ न होणे, या सर्व विकारांवर बांबू घ्या मूळाचा काढा घ्यावा. आराम पडतो. याशिवाय गोखरू, बांबू, व खडिसाखर एकत्र कुटुन हे चूर्ण

   कच्च्या दूधासोबत घेतल्यास युरिनरी ट्रॅकचे सर्व प्रकारचे त्रास बरे होतात..

            स्त्रियांच्या मासिक पाळीत होणारे त्रास म्हणजे, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होणे, कंबर व पोट दुखणं, अनियमित मासिक चक्र, या विकारावर बांबू २५ ग्राम, आणि ५० ग्राम शतपुष्पा हे एकत्रित पाण्यात उकळून , यात गूळ मिसळून हा काढा घ्यावा.


                            


        आजकाल रक्तदोष वाढल्याने मग त्वचा विकार देखिल मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  गजकर्ण, इसब, खरूज, दाद, नायटा, रिंगवर्म, कुष्ठरोग अशा सर्व विकारांवर. बांबूचि मुळे व पाने पाण्यात उकळून

 हा काढा घ्यावा. आणि हे वाटुन याचा लेप तिथे लावा. त्वचा विकार बरे होतात.

        वातावरण बदलले कि सर्दी, ताप येतो, अशा वेळी  गुळवेल सत्त्व व बांबू चूर्ण मधात मिसळून घ्यावे. ज्वर उतरतो. दुखणे, मोच येणं, लचकणे, सूज येणे, मुरगाळणे, अशा सर्व त्रासांवर.   कोवळ्या

 अंकुरांना वाटून याचा लेप तिथे लावावा. आराम पडतो. शीतपित्त झाल्यास. लालसर गांधी येतात

   तेव्हा कोवळी अंकुर वाटुन तिथे लावावा हा लेप. आणि महत्वाचे म्हणजे  विषारी दंश झाल्यास. हाच लेप तिथे लावल्याने फायदा होतो..


      तेव्हा हि वनस्पती केवळ बांधकामांतच उपयोगी नाही तर. अनमोल अशी औषधि गुणधर्म असलेली

 लाभदायक आहे..

Post a Comment

0 Comments