Ticker

6/recent/ticker-posts

केळी Banana फायदे.

 केळि..Banana..🍌🍌🍌

  


   केळे  हे बिनबियांचे सर्वात जुने फळ आहे. निसर्गतःच जंतूनाशक वेष्टनात असल्याने, केळातून जंतूचि बाधा होत नाही. त्यामुळे आपोआपच सर्वांचे आरोग्य उत्तम राहते. वर्षभर उपलब्ध असणारे,  सर्वांच्या खिशाला परवडणारे हे फळ आबालव्रुद्धांना आवडते.

     शास्रिय भाषेत.* मुसा पँराडिसिअँका* म्हटले जाते.


## औषधि गुणधर्मः  केळ्यात पोषणमूल्ये अनेक असल्याने सकस आहारातच याचि गणना केलि जाते.

 यात पिष्टमय पदार्थ, प्रथिने,  खनिजे, अ, ब, क, ड, ई, जीवनसत्वे, कँलशिअम, व फाँस्फरस, तसेच शरिराला ऊर्जा देण्याचि शक्ति व उष्मांक विपुल आहेत. यात असलेलि साखर लगेच पचते . यामुळे  शरिराचा थकवा जाउन उत्साह निर्माण होतो. केळ्याचि गणना शक्तिवर्धक फळांत होते. केळे हे मधूर, शीत, व कफकारक आहे.


##*   केळे हे शरिरातिल कँलशिअम, नायट्रोजन, व फाँस्फरस, यांचे प्रमाण टिकवून ठेवते. त्यामूळे स्नायू, मांसपेशि, बळकट होउन शरिर कार्यक्षम बनवते.

    ##* उपयोग##*

 केळात लोहाचे प्रमाण भरपुर असल्याने रक्ताचि कमतरता असणार्यांनि रोज एक केळे खावे, याने

 हिमोग्लोबिन वाढते.

     तसेच कँलशिअम जास्त प्रमाणात असल्याने हाडांचा ठिसूळपणा( आँस्टिओपोराँसिस) हा आजार होत नाही.

      केळिचे साल उपयोगि आहे.  यात फायबर जास्त प्रमाणात असल्याने याचि भाजि करुन खाल्यास बद्धकोष्ठ , मूळव्याध होत नाही, पौष्टिक व सकस आहार म्हणून लहान मुलांना रोज एक केळे मधासोबत खायला द्यावे. त्यांचि उंचि लवकर वाढते.


##*  कोलायटिस या आजारात केळे आतड्यांचि सूज कमि करून आंत्रव्रण  भरून येतात, पोटात होणारि आग थांबते,  मलावरोध होत नाही,  दुर्बल शरिराच्या व्यक्तिने आहारात केळि ठेवल्यास त्याचे वजन व ताकद वाढते

      केळांत कमि प्रथिने, कमि क्षार, व उच्च प्रतिचे पिष्टमय पदार्थ असल्याने मूत्रपिंडाचे सर्व आजार दूर होतात. सनबर्न मूळे होणार्या त्रासापासून वाचवण्याकरता

 केळ्याचा गर कुस्करून चेहर्याला लावावा.  हाताला लावावा, आग कमि होते,  केळ्यात  ए, सी, व एच, जीवनसत्वे असल्याने त्वचा, दात, या विकारांवर केळि खाणे फायद्याचे ठरते..


##*    केळफुलामुळे गर्भाशयाच्या तक्रारी दूर होतात. याच्या सेवनाने हार्मोन्स संतूलित राहतात,  मासिक धर्मात स्राव जास्त होत असेल तर केळफूलाचि भाजि करून खावि,   केळात पोटँशिअम भरपुर असल्याने

 उच्च रक्तदाब होत नाही.,  ह्रुदय विकार होत नाही.

      तेव्हा असे हे स्वस्त व मस्त फळ आपल्या आहारात कायम ठेउन आपण उत्तम स्वास्थाचा लाभ घेउ शकतो.

          ##*##*##🍌🍌🍌..

Post a Comment

0 Comments