Ticker

6/recent/ticker-posts

बांबु उद्योगाचे दोन विभागात वर्गीकरण

 उद्योगाचे दोन विभागात वर्गीकरण होते:



अ) स्मॉल स्केल इंडस्ट्री


१. हे उद्योग कौशल्यावर आधारित उद्योग असतात. 

२. स्कील लेबर वर अवलंबून रहावे लागते.

३. या करिता मोठ्या माशीनारीची गरज नसते. 

४. यापासून कमी प्रमाणात रोजगार निर्मिती होते. 

५. भांडवली खर्च कमी येतो. 

६. उत्पादन कमी प्रमाणात होते. 

७. वस्तूंची किंमत जास्त असते.

८. ठराविक बाजारभाव नसतो.

९. नफा कमी मिळतो.

१०.बाजारपेठ मर्यादित असते.

११. जास्त प्रमाणात बाय-प्रोडक्ट तयार होत नाही.

१२. मार्केटिंग ची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते.

१३. शासकीय धोरणांचा विशेष परिणाम होत नाही.

१४. विशेष शासकीय धोरण बनविली जात नाहीत.

१५. उद्योग उभारणीसाठी मर्यादित जागा पुरेशी असते.

१६. विशेष शासकीय परवान्यांची गरज नसते.

१७. मर्यादित बांबू लागवड क्षेत्र पुरेसे असते.


बांबू पासून विविध वस्तू बनवणे हे ह्या क्षेत्रात येते. 

उदा. बाटली, मॅट, पेन, हँगर, टूथब्रश, कंप, प्लेट, स्पून, फोक, वाटी, बास्केट, इ.



ब) लार्ज स्केल इंडस्ट्री


१. हे उद्योग मोठ्या मशिनरी वर उभारले जातात. 

२. मशिनरी ऑपरेटर ची गरज असते.

३. या करिता विशेष कौशल्याची गरज नसते. 

४. स्कील लेबर वर अवलंबून रहावे लागत नाही.

५. यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. 

६. भांडवली खर्च जास्त येतो. 

७. उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. 

८. प्रॉडक्ट ची किंमत कमी असते 

९. किंमत बाजार भावावर ठरते.

१०.मोठ्याप्रमाणात बाजारपेठ उपलब्ध असते.

११. नफा जास्त मिळतो.

१२. जास्त प्रमाणात बाय-प्रोडक्ट तयार होतात.

१३. मार्केटिंग करीता विशेष त्रास होत नाही.

१४. शासकीय धोरणांचा जास्त परिणाम होतो.

१४. विशेष शासकीय धोरण बनविली जातात.

१५. उद्योग उभारणीसाठी जास्त प्रमाणात जागेची असते.

१६. खूप जास्त शासकीय परवान्यांची गरज असते.

१७. प्लांट च्या क्षमतेनुसार  बांबू लागवड क्षेत्र बांबू लागवड क्षेत्र खूप जास्त प्रमाणात लागते.


बांबू वर आधारित मोठे कारखाने ह्या क्षेत्रात येतात.

१.अगरबत्ती कारखाना

२. पेपर मिल

३. टिम्बर मिल

४. कापड मिल

५. इथेनॉल मिल

साभार माहीती टेलिग्राम ग्रुप

Post a Comment

0 Comments