Ticker

6/recent/ticker-posts

वंशलोचन मराठी माहीती

 .वंशलोचन .......



बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो. बांबू या वनस्पतीमध्ये नर व मादी फुले वेगवेगळ्या वृक्षांवर येतात. पुनर्वसू: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष वेळू अथवा बांबू.  बांबूला हिंदीमधे बांस किंवा बंश म्हणतात.  त्याचा जो डोळा असतो, त्याच्या आजूबाजूला किंचीत असा क्षार दिसतो, तो वंशलोचन.



स्त्री जातीच्या बांबूमध्ये, बांबू पक्व होऊ लागल्यानंतर त्यांच्या खोडांच्या पेरात घनस्राव जमा होऊ लागतो, त्यास "वंशलोचन' म्हणतात. हे दम्यावरील उत्तम औषध आहे. तो सिलिकेटचा क्षार असतो. बांबूच्या पेऱ्यात आढळणारा सिलिकायुक्त पदार्थ – वंशलोचन (तबशीर)- पूर्वीपासून औषधात वापरला जातो. काही विशिष्ट रासायनिक विक्रियांत उत्प्रेरक (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिचा वेग बदलणारा पदार्थ) म्हणून तो चांगला उपयुक्त आहे.  वंशलोचन बाजारात भेसळ करून विकतात, त्यामध्ये चुन्याचे खडे मिसळतात. बांबूचे मूळ, पाने, बिया, कोवळ्या खोडाचे कोंब व वंशलोचन औषधात वापरतात. बांबू खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक म्हणून वापरतात. हे कफ, क्षय आणि दम्यात अत्यंत उपयोगी आहे. हे उत्तेजक व ज्वरशामक म्हणूनही गुणकारी आहे. यामुळे कफरोगातील त्वचेचा दाह कमी होतो व कफातून रक्त पडत असल्यास ते बंद होते. आहे भारतात आसामातील लुशाई, गारो व खासी टेकड्यांत Melocanna baccifera या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ५० वर्षांनी एवढा खोडांपासून ‘वंशलोचन’ भरपूर मिळते. महाराष्ट्रात कटांग बांस पासून वंशलोचन मिळाल्याचे रेकॉर्ड आहेत. 



भारतातील मिझोरम राज्यातील जवळपास ४९% भू भाग हा Melocanna baccifera या प्रजातीच्या बांबूच्या झाडाने व्यापलेला आहे. या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ५० वर्षांनी एवढा आहे. ज्यावेळी बांबूच्या झाडांना फुले येतात त्यावेळी उंदीर आणि तत्सम (rodent प्रवर्गात मोडणारे) प्राणी त्यावर तुटून पडतात. विशेषतः उंदीर यात आघाडीवर असतात. ही फुले खाऊन उंदीर खूप माजतात व त्यांचा प्रजननाचा वेग खूप वाढून जातो. कमी कालावधीतच उंदरांची संख्या जबरदस्त वाढून जाते. मग ते गोदामातील, शेतातील पिके फस्त करत सुटतात. बांबूच्या झाडाला आलेल्या फुलांच्या बहराच्या वेळी एकाच वर्षात २५ लाख उंदर गावक-यांनी मारली होती. म्हणूनच भारताच्या उत्तर पूर्व भागातील राज्यात बांबूच्या झाडाला फुले येणे म्हणजे संकट येणे असे मानले जात वंशलोचन आणि तबशीर वास्तविक भिन्न गोष्टी होत्या, परंतु फारसी भाषेत तबशीर हे वंशलोचनचे समानार्थी शब्द आहे. 

 

वंशलोचन हा बांबूचा एक्स्युडेट आहे, जो आता बाजारात क्वचितच उपलब्ध आहे. तबशीर (prepared from Curcuma Angustifolia, also called Tikhur & East Indian Arrowroot) वंशलोचनच्या नावाने विकला जातो. अष्टांग संग्रहात, वंशलोचन आणि तबाशीर यांचे वेगवेगळे उपाय वर्णन केले आहे आणि दोन्ही उपायांचे वर्णन एकाच ठिकाणी आहे. (Reference: Acharya Priyavarata Sharma, Dravya Guna Vigyan, Part 2, Chapter 7, 258 Vansha – Bambusa Arundinacea Willd)

          Vanshlochan                              Tabasheer

Source Bamboo Female Tree   Curcuma Angustifolia

Main Content Silica (SiO2) – 70 to 90% Cellulose & Starch

Benefits Mainly Lung Diseases    Mainly Ulcer

मूळ वंशलोचन मिळविण्यासाठी आता भेसळ ही आणखी एक समस्या बनली आहे. आजकाल हे वंशलोचन उपलब्ध नाही. कृत्रिमरित्या तयार केलेले वन्शलोचन आता भारतीय बाजारामध्ये विकले जाते, ज्यायोगे आयुर्वेदिक चिकित्सक आणि प्रेमी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.  आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी उपचारात बन्सलोचन किंवा तबाशीरची सुमारे वार्षिक २००० मेट्रिक टन इतकी मागणी आहे. परंतु National Medicine Plants Board ने केलेल्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणात देशभरात कुठेही औषधी द्रव्य संकलन केंद्रात वंशलोचनाची नोंद अथवा साठा आढळला नाही. तसेच त्या कालावधीतील आंतरराष्ट्रीय आयात देखील तपासली असता तेथेही काही नोंद आढळली नाही. मात्र बाजरात ‘असली वंशलोचन’, सिंगापुरी वंशलोचन , तवाशीर  नावाने रु. १०० ते रु. १०००० प्रती किलो दराने विविध प्रोडक्ट उपलब्ध आहेत. 

कृत्रिम वंशलोचन सोडियम सिलिकेट आणि अमोनियम सिलिकेटपासून तयार केले जाते . ही दोन्ही रसायने पाण्यात मिसळली जातात. मग मिश्रण कोरडे ठेवण्यासाठी सोडले जाते. सुकण्याच्या प्रक्रियेनंतर प्राप्त केलेली सामग्री वन्शलोचन म्हणून विकली जाते. मूळ वंशलोचन या नावाने बाजारात उपलब्ध असलेल्या वन्शलोचन प्रत्यक्षात बांबूच्या डाळांना जाळून तयार केले जाते. त्यात बांबूची राख आणि थोड्या प्रमाणात वास्तविक वशलोचन आहे. या प्रकारच्या वंशलोचनमधील सिलिका सामग्रीचे प्रमाण 0.50% ते 3% पर्यंत बदलते.

पुनर्वसू: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष वेळू अथवा बांबू. बांबूच्या आतील भागात भागात आढळणाऱ्या पदार्थास 'वंशलोचन' म्हणतात. हे अत्यंत लोकप्रिय औषध बऱ्याच देशांत प्रसिद्ध आहे. सांधेदुखीवर बांबूचा पाला वाफावून बांधण्याचा प्रघात आहे. या नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्ती इतरांना मदत करणाऱ्या असतात त्यांनी बांबू या वृक्षाची आराधना करावी. दिशा - उत्तर.

स्थानिक नाम कासेट, काष्ठी, कळक

English स्पाईनी थॉनी बाम्बू

Botanical name Bambusa arundinacea (बाम्बुसा एरुन्डिनेशिया)

Family pooceae (पोएसी) 

इतर भाषिक नाम बांस , वान्स 

संस्कृत नाम वंश, शतपर्वा, तृणध्वज. 

उपलब्धता महाराष्ट्रात ही वनस्पती प्रामुख्याने, कोकण व पश्चि म घाट परिसरात तसेच खानदेश व विदर्भात आढळते.

उपयुक्त अंग बांबूचे मूळ, पाने, बिया, कोवळ्या खोडाचे कोंब व वंशलोचन औषधात वापरतात.

आयुर्वेदोक्त वर्गीकरण

गुण लघु, रुक्ष 

रस मधुर, कषाय 

विपाक मधुर

विर्य शीत 

प्रभाव रसायन 

 

(संकलित)  


Post a Comment

0 Comments