*निलगिरीचे महत्व*
निलगिरी बहुगुणी, बहुउपयोगी आणि जलद वाढणारे झाड आहे. एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमात निलगिरीचा अंतर्भाव केला आहे. सर्व प्रकारच्या प्रदेशात हे झाड वाढत असल्याने सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेत निलगिरीला महत्त्वपूर्ण स्थान आहे.
• *निलगिरीच्या विविध जाती* :-
•युकॅलिप्टस हेरे कर्टिस. – निलगिरी पर्वतावर आढळते.
•युकॅलिप्टस गोल्बूलस.
•युकॅलिप्टस ग्रँडीस.
•युकॅलिप्टस कॅमलडुलेन्सिस. – निलगिरी पर्वतावर आढळते.
•*हवामान* :-
अत्यंत उष्ण, कमी पावसाच्या प्रदेशापासून ते शीत हवामान असलेल्या प्रदेशात निलगिरीची लागवड केली जाते.
निलगिरीचे झाड वाळले म्हणजे त्याच्या वजनात एक तृतीयांश घट येते व ते एक चांगले इंधन असून त्याचे कॅलरीफिक मूल्य ४७०० ते ४८०० कॅलरीज प्रती किलोग्रॅम आहे.
• जमीन :-
निलगिरीची वाढ जास्तीत जास्त प्रमाणात खडकाळ, परंतु सुपीक, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या आणि ओल साठवून ठेवणाऱ्या जमिनीत चांगली होते.
*• लागवड :*-
जून महिन्यात रोपांच्या लागवडीसाठी खड्डे करवेत. 5x5 फुट अंतरावर ही लागवड करावी.निलगिरीच्या घनदाट लागवडीसाठी 3x3 फुट. अंतरावर लागवड उपयुक्त ठरते.
• उत्पादन :-
निलगिरी लाकुड 5000 टन ते 7000 टन इतका दर मिळतो.
साधारण एकरी 530 टन लाकुड मिळु शकते.
त्यातुन 25 लाखाचे उत्पादन मिळते
• उपयोग :-
1.पाने व कोवळ्या फांद्यांपासून निलगिरी तेल काढतात. त्याचा औषधी,औद्योगिक व सुगंधी तेल निर्मितीसाठी उपयोग होतो. तसेच निलगिरीचे लाकूड औद्योगिक उपयोगासाठी व ७० प्रकारच्या तेल औषधांसाठी वापरले जाते.
2.औषधी तेलात सिनीओल जास्त आहे. त्यापासून साबण, स्प्रे व औषधी गोळ्या तयार करतात.त्यांचा उपयोग सर्दीवर होतो. तसेच रोगप्रतिबंधक औषधी, तसेच वेदानांवरही वापर करतात. सिनीओल हे निलगिरी तेलातील महत्वाचे द्रव्य आहे.
3.निलगिरीच्या झाडांपासून कागद निर्मिती केली जाते. त्याचे वनसंशोधन केंद्र डेहराडून येथे आहे.
4.निलगिरीपासुन रेऑनचे धागे तयार करतात.
5.या झाड्याच्या सालीपासून वा बुंध्यातून पाझरणाऱ्या स्त्रावामुळे कातडी कमविण्यास लागणारे टेनिनसारखे द्रव्य मिळते. ते औषध व डिंक तयार करण्यासाठी वापरतात.
0 Comments