Ticker

6/recent/ticker-posts

गोवा ही भोगभूमी नाहीतर देवभूमी आहे

#गोवा ही भोगभूमी नाहीतर देवभूमी आहे..

या सुट्टीत कुटूंबासह वा मित्रासोबत गोव्याला जाताय ?? जरुर जा !
 पण एक दिवस छत्रपतीच्या (शिवशंभो ) पदस्पर्शाने स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक हिंदू वारसा स्थळांना अवश्य भेट द्या ! मन प्रसन्न होईल ,खरा (गोमंतक) गोवा पाहिल्या नंतर समाधान लाभेल.

शिवराय प्रसन्न होतील!

#सप्तकोटीश्वर मंदीर (शिवाजीमहाराजाच्या हस्ते जिर्णोद्धार )
#बैतुल किल्ला -(छत्रपती शिवरायांनी किल्ला बांधला)
#फर्मांगुडी (इथूनच ख्रिश्चन मशनिरीना फर्मांन सोडले)
#मर्दनगड (छत्रपती संभाजीमहाराजांनी किल्ला बांधला)
#चंद्रेश्वरभूतनाथ मंदीर , चांदोर 
#महाळसानारायणी मंदीर , वेरना 
#मंगेशी पोंडा
#श्रीमल्लिकार्जून मंदीर प्रसिद्ध 

छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेली भूमी.

गोमंतक अर्थात गोवा हे एके काळी संपन्न अशा कदंब राजवटीचा एक भाग होता. ‘श्री सप्तकोटेश्वरलब्धवर प्रसाद’ अशी बिरुदावली दिमाखात मिरविणाऱ्या कदंबांचे हे तीर्थक्षेत्र. पुढे पोर्तुगीज सत्ताधीशांकडून मंदिराची विटंबना झाली. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या प्रसंगाचे वर्णन करणारा शीलालेख मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेला आहे. श्रीसप्तकोटेश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण। पंचम्यां सोमे श्रीशिवराजा देवालायस्य प्रारंभ: । असा तो शीलालेख. हे मंदिर खडकात उभारेले आहे. मंदिराच्या मागील बाजूस सलग खोदलेल्या कमानी दिसतात. मागील बाजूला एक पाखाडी असून, ती चढून वर गेले की मंदिर परिसराचे सौंदर्य नेत्रसुखद दिसते. याच मंदिराजवळ असलेल्या देवीच्या मंदिरातील महिषासुरमर्दिनीची मूर्तीही पाहता येईल. पणजी-म्हापसा-डिचोलीमार्गे नारवे येथे जाता येते. मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. गर्द झाडा-झुडपांत वसलेले हे मंदिर प्रेक्षणीय आहेच; पण त्याचे ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे. यामुळे सप्तकोटेश्वर दर्शनाने गोवा पर्यटन सार्थकी लागू शकेल.
याच पवित्र भूमीवर हिंदूचा आतोनात छळ करणार्‍या पोर्तुगीजाच्या मुसक्या बांधल्या गेल्या. व फर्मानगुडीवरुन छत्रपती शिवरायांनी आदेश दिला की, "याद राखा परत जर हिंदूच्यावर अत्याचार कराला तर माझ्याशी गाठ आहे " असं फर्मान सोडलं.
व त्यानंतर अत्याचार थांबले. यातूनच छत्रपतीची गोव्यावर वचक निर्माण झाली.
  अशाच प्रकारचा छ. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला बैतुल किल्ला आज यावर खाजगी मालकीचा दावा केला जात आहे.

पोर्तुगीजांना घाम आणणारा व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने बांधला गेलेला गोव्यातील एकमेव सागरीदुर्ग म्हणजे हा बेतुल उर्फ बैतुलचा किल्ला होय. सन १६७९ मधे दक्षिण गोव्याच्या केपे तालुक्यात साळ नदीच्या तीरावर बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्या बाळ्ळीच्या हवालदाराने हा किल्ला बांधला. बेतुल येथे साळ नदीजवळ मराठे व पोर्तुगीज यांच्या राज्यांच्या सीमारेषा एकमेकाला भिडलेल्या होत्या. उत्तर काठावर पोर्तुगीज राज्य, तर दक्षिण काठावर शिवाजी महाराजांचे राज्य अशी सीमा होती. मडगावजवळ वेर्णा येथे उगम पावणारी साळ नदी पुढे मडगाव, चिचोणे, असोळणा असा प्रवास करत बेतुल येथे समुद्रास जाऊन मिळते. या साळ नदीतून पोर्तुगीजांचे व्यापारी पडाव, छोटी गलबते भरतीच्या वेळी मडगाव या मुख्य बाजारपेठेच्या काणकोण हा गोव्याचा प्रदेश सोंधे संस्थानच्या ताब्यात होता. पण सोंधे संस्थानचा राजाने आदिलशाहचे मांडलिकत्व स्विकारले असल्याने हा प्रदेश एकप्रकारे आदिलशाहाकडेच होता. राज्याभिषेकानंतर म्हणजे १६७५ नंतर शिवाजी महाराजांनी परत एकदा गोव्याकडे लक्ष दिले व फोंड्यावर चालून गेले. त्यावेळी महाराजांनी फोंडा प्रांत घेतला व उरलेला आदिलशाही प्रदेश स्वराज्यात आणला. याच महिन्यात कारवार, अंकोला हे किल्ले जिंकत महाराजांनी स्वराज्य सीमा गंगावल्ली नदीपर्यंत नेली. आता सोंधे संस्थानच्या राज्याला मराठ्यांचे मांडलिकत्व स्विकारावे लागले. अश्याप्रकारे मराठ्यांचे बाळ्ळी व चंद्रवाडी हे दोन महाल पोर्तुगीजांच्या अमलाखाली असणाऱ्या साष्टी प्रांताला भिडले. अशा योग्यवेळी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांची साळ नदीमार्गे चालणारी साष्टीतील जलवाहतूक संकटात आणण्यासाठी बेतुल येथे किल्ला बांधण्याची आज्ञा केली. 

बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या बाळ्ळीच्या हवालदाराच्या देखरेखीखाली किल्ला बांधला जात आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांचा लष्करी अधिकारी म्हणजे राशोल किल्ल्याचा किल्लेदार याने गव्हर्नरकडे सविस्तर वृतांत कळविला, तो असा – "असोळणे (साळ) नदीच्या पैलतीरावर शिवाजी राजे यांनी एक किल्ला बांधण्यास घेतला आहे. तो जर बांधून झाला तर आमच्या राज्याच्या सुरक्षिततेला त्यांच्यापासून धोका आहे. असा किल्ला बांधण्याचा विचार आदिलशहाने कधी केला नव्हता, परंतु शिवाजी राजे यांनी त्याचे राज्य घेतल्यावर हा प्रयत्न सांप्रत सुरु केला आहे. तेव्हा रासईच्या कॅप्टनला गव्हर्नरने उत्तर धाडले की, शिवाजी राजे यांनी अशा किल्ल्याचे बांधकाम केल्याने आमच्यात मैत्रीचा जो तह झाला आहे, त्यास बाधा येणार आहे. तेव्हा बाळ्ळीच्या हवालदाराने किल्ल्याचे बांधकाम थांबवावे. तेव्हा बाळ्ळीच्या छ.शिवाजी महाराजांच्या हवालदाराने त्यास उत्तर पाठविले की, मी किल्ला छ.शिवाजी राजे यांच्या आज्ञेवरून बांधीत आहे, परंतु या किल्ल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुख्यत्यार आहोत. त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण?"

मर्दनगड किल्ला छत्रपती संभाजीमहाराजानी बांधला-
संभाजी राजांचा सर्वधर्मसमभाव या गुणविशेषणाबरोबर हिंदवी स्वराज्य धर्मरक्षक प्रतिमा मोठी होते.

१ नोव्हेंबर १६८३ रोजी विजरई कोंदि द अल्व्होर याने फोंडा किल्ल्यास वेढा घातला व तोफांचा भडिमार करून किल्ल्याच्या आतील तटास भगदाड पाडले, पण धुवांधार पावसामुळे त्याला वेगवान हालचाल करता येत नव्हती. त्याचा फायदा घेत ९ तारखेला राजापूरहून तडक फोंड्यास आलेल्या संभाजी राजांनी पोर्तुगीजांच्या डोळ्यादेखत आपले ६०० सैनिक फोंडा किल्ल्यात घुसवले. हे पाहून पोर्तुगीज सैन्य हादरले. संभाजी आपल्या मागूनही हल्ला करेल, या भीतीने त्यांच्यात पळापळ सुरू झाली. यात विजरई कोंदि द अल्व्होर जखमी झाला. पोर्तुगीजांनी डागलेल्या तोफांच्या माऱ्यात फोंडा किल्ल्याचे अतोनात नुकसान झाले होते. म्हणून संभाजी राजांनी स्वत:च कोट पाडून टाकला आणि जवळच सुरक्षित ठिकाणी नवीन कोट बांधून त्याचे नाव मर्दनगड असे ठेवले. 

असा हा इतिहास आसतांना बैतुल किल्याच्या आसपासच्या शिवप्रेमींनी किल्याचे पावित्र्य जपले आहे. 

चित्र- शिव गोमंतक 
©महेश पाटील-बेनाडीकर

Post a Comment

0 Comments