*इच्छा तिथे मार्ग*
सायंकाळी सहजच चहा पिऊन मित्रासोबत बातचीत करत असताना जवळ येऊन ८५ वर्षीय आजी येऊन आवाज देत म्हणाली दादा दादा शब्द कानावर ऐकताच मी नजर देत आजीकडे पाहिले
आजी पुन्हा म्हणाली दादा अगरबत्ती घेता का मी खाली वाकून त्यांच्याशी आदराने बातचीत केली आजी अगरबत्ती कितीला आहे आजीने अगरबत्ती चा भाव सांगत मला अगरबत्ती घेण्यास उत्सुकतेने आवड निर्माण करून दिली माझे मन हळव झालं आणि त्यांच्याकडून एक ऐवजी दोन पुढे मी खरेदी केली पण आजीकडे पाहून माझ्या अनेक मनातील प्रश्न आजींना विचारावं वाटत होते. मी आजीला म्हणालो आजी अगरबत्ती का बरं विक्री करत आहात आजी हसत म्हणाल्या मी विकतं नसते तर तुम्ही मला भेटले व बोलले नसते आणि मला चार पैसे दिले नसते माझ्या बाहेर येण्यामुळे आणि अगरबत्ती विकल्यामुळे तुमची भेट झाली अनं चार रुपये पण मिळाले मी हसत आजीला म्हणालो आजी हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय त्या म्हणाल्या हा पूर्वीचा माझा व्यवसाय नाही परंतु आता बसून राहण्यापेक्षा काही तरी कमवत जगले पाहिजे आपण माणूस आहोत आणि माणसाने हात पाय चालतात ना तोपर्यंत जगताना काही ना काही कमवायचं असतं आणि जगायचं असतं आजीचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करत होते मला आजींचे उदगार ऐकून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायला लागली होती मी त्यांच्यासोबत थोडासा विसावा घेऊन बातचीत करण्याचा अट्टाहास केला आणि त्यास होकार दिला त्यांना मी पुढे म्हणालो तुमची मुलं बाळ सांभळत नाहीत का? त्या म्हणाल्या मला दोन मुली दोन जावई आहेत आणि नातवंड पण आहेत मी राहायला मुलींकडेच आहे मग तुम्ही तरी या वयामध्ये असं का व्यवसाय करत आहात तुम्हाला ते जेवण घालत नाहीत का आजी स्मित हास्य देत म्हणाल्या बाळा फक्त प्राणीमात्रांमध्ये माणसाने जगत असताना काही ना काही कमवायच असतं पण आणि इतर मांजर कुत्रे जनावरे यांनी मात्र दुसऱ्याने वाढेल तेव्हा खायच असते, आजींचे शब्द ऐकून मला जणू काही नवी उमेद मिळतं होती अजून काही ऐकण्याची आतुरता झाली मी आजीला पुढे म्हणालो आजी तुमचं अगदी बरोबर आहे तुम्ही कमावलेला काहीतरी तुमच्यापाशी असेल ना की तुम्ही यापुढे खाऊ शकाल आजी पुढे म्हणाल्या नारायण पेठ मध्ये माझी वंशपरंपरेने आलेली प्रॉपर्टी असलेली खूप मोठा वाडा आहे माझं नाव सांगितले की तुम्हाला कोणीही सांगेल आणि नुसतं राहण्यापुरतं घर नाही तर चार गुंठ्याची जागा आहे माझी ती तिची किंमत चार कोटी असेल मी म्हणालो आजी यावर तर तुम्ही सहज जगू शकता पण बाळा ते जुना वाडा झालेला आहे तिथून जास्त उत्पन्न मिळत नाही आणि काही जणांनी त्यात कब्जा केल्यामुळे मला त्या कुटण्यात पडायचं पण नाही म्हणून माझ्या मुलींना पण मी सांगितले आपल्यात असणाऱ्या हिम्मतीवर आपण नवनवीन काहीतरी कमवत जगू हे ऐकून मला अजून आजींना काहीतरी विचारायचं वाटत अजींच बोलणे धारदार होते मला आजीच्या बोलण्यातून त्या सुशिक्षित वाटत होत्या आणि मी विचारलं शिक्षण काही शिकलेल्या आहेत का? असे म्हणाल्या होय मी शिक्षण शिकलेलं आहे आणि डॉक्टरांच्या सोबत नर्स म्हणून काम सुद्धा केलेलं आहे, मुली मला आता एकटीला राहू देत नाहीत त्यांच्यासोबतच मला घेऊन जातात आता मी सध्या राहिला मुलीकडे असते परंतु माझं मन त्या ठिकाणी लागत नाही मला वाटते की काही ना काही आपण कमवलं पाहिजे आणि त्यातून वेळ पण जातो काही वेळ भजनी मंडळामध्ये बसते भजन करते आणि सायंकाळी थोडसं बाहेर येऊन उदरनिर्वाहासाठी चार दोन रुपये कमवते . आजी किती दिवस आणखी करणार असं त्या म्हणाल्या जोपर्यंत माझे हालचाल होऊ शकते तोपर्यंत मी कमवतच जगेन हे ऐकून प्रसन्न झाले आणि आजीला भेटल्याचा आनंद झाला. आणि मनाला वाटले थोड्या थोड्या अपयशात माणुस किती स्वतःला संपवून घेण्यापर्यंतचा विचार करतो आणि आजीची इच्छाशक्ती अजून जगण्याची उमेद दाखवते.
केशव अ. होळंबे
(समुपदेष्ठा/मानसोपचारतज्ञ पुणे)
यांच्या फेसबुक वालवरून
0 Comments