ऐतिहासिक नोंदीनुसार २४ #एप्रिल १६७४ रोजी मराठ्यांनी #केंजळगड आपल्या स्वराज्यात सामील केला. या किल्ल्याचे आणि स्वराज्याचे सरसेनापती हंसाजी( हंबीरराव) मोहिते यांचे एक योगा योगा चे नाते आहे ते असे हंसाजी( हंबीरराव) यांची सेनापती पदी निवड झाल्यावर पहिली लढाई केंजळगड व आयुष्याची शेवट ची लढाई केंजळगड परिसर त्यापूर्वी रात्री काही तास केंजळगड वर मुक्कामी. हा एक इतिहासिक योगायोग.तसेच छञपती शिवाजी महाराज यांना देखील हा किल्ला जिव्हाळ्याचा कारण या किल्ल्याच्या समोरच रायरेश्वर पठार आहे , यावर स्वयंभू रायरेश्वर महादेवा समोर या हिंदवी स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतली होती.
केंजळगड च्या जवळच रायरेश्वराचे पठार आहे. .त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नावे : गणेशदरा, गायदरा, या सोप्या वाटा; आणि कागदरा, लोह्दरा, वाघदरा, सांबरदरा, सुणदरा ह्या अवघड वाटा. केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे. सध्या तेथे शिडी लावली आहे. ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते. 'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे. पाठीमागच्या टेकडीचा माथा समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंच, म्हणजे रायगडापेक्षा एक मीटर जास्त. येथून सर्व दिशांना नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते.
त्या उंचीवरून कमळगड, केंजळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड हे दुर्ग दिसतात, तर नाकिंदा ह्या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून चंद्रगड, प्रतापगड, मंगळगडही दिसतात.
केंजळगड हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील किल्ला आहे. वाईच्या उत्तर-पश्चिमेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या भागात महादेव पर्वतरांग आहे, याच महादेव पर्वतरांगेत हा किल्ला उभा आहे.
वाई प्रांतातील देखील जवळपास सगळेच किल्ले शिवाजी महाराजांनी काबीज केले. तरीही, केंजळगड हा वाई प्रांतातील किल्ला आपल्या ताब्यात घेणे शिवरायांना अवघड जात होते. केंजळगड काबीज करणे हा शिवरायांचा मनसुबा होताच. साधारण १६७४ साली शिवाजी महाराज आपल्या लष्करासहित चिपळूण ला हंसाजी( हंबीरराव) मोहिते यांना सेनापती पद देऊन त्यांना हंबीरराव हि किताब दिला . याच दरम्यान महाराजांनी अचानक आपला मोर्चा केंजळगडाकडे वळविण्याचे नक्की केले. महाराजांनी ठरल्याप्रमाणे आपली फौज हंसाजी( हंबीरराव) मोहिते यांच्या नेतृत्वाखाली केंजळगडाकडे फिरविली.
केंजळगडावरील किल्लेदाराला आणि सैन्याला थोडीसुद्धा भनक नव्हती कि क्षणार्धात अचानक वाऱ्याच्या वेगाने मराठ्यांनी केंजळगडावर आक्रमण केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे किल्ल्यावरील सैनिकांना लढाईसाठी सज्ज होण्याची देखील मुदत मिळाली नाही. समोर येईल त्या सैनिकाचा बिमोड करत मराठ्यांनी आगेकूच केली. या साऱ्या चकमकीत गडावरील किल्लेदार गंगाजी विश्वासराव देखील मारला गेला. व चार मराठे सैनिक मारले गेले ,अखेर घमासान लढाईनंतर मराठ्यांनी केंजळगड हा किल्ला जिंकला.
केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. एका बाजूला धोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसरीकडे नीरा नदीवर देवघर येथे धरण व जवळच रायरेश्वराचे पठार आहे, केंजळगडाचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड. हे तिसरे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे, माचीहून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते. इथूनच दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत. हा एक अतिशय उत्तम जिना कोरला आहे. डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छिन्नी लावून व्यवस्थित केली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र दरी आहे. या अशा रानात पायऱ्या कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते. गडावर चुन्याचे दोन घाणे आहेत ,तसेच केंजळाई देवी चे भग्न अवस्थेतील मंदिर आहे ,दारुगोळा भांडार असावा अशी एक इमारत आहे ,आणि छोटेखानी सदर ,आहे गोड्या पाण्याचे टाके देखील आहे, गड एकदम ताशीव सुळक्या सारखा आहे ,लांबुन पहिला तर गांधी टोपी सारखा आकार दिसतो .पण कोरीव छोट्या पायऱ्या वेतिरिक्त गडावर जायला दुसरा मार्ग नसल्या मुळे किल्ला जिंकणे अवघड होते .या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली. ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले. एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे, 'जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला तर तो जिंकणे फार अवघड आहे.'
केंजळगडची किल्लेदारी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची शिवकालीन ते शाहू कालखंड पर्यंत नोंद मिळते,एकनिष्ठ गोळे घराणे ने भरपूर योगदान या गड साठी दिले आहे,पुढे १६८९ मध्ये पायदळ प्रमुख त्यांना करण्यात आले त्यावेळेस च्या पत्र नुसार पिलाजी गोळे कडे केंजळगड, पांडवगड, कमळगड, वैराटगड ,चंदन वंदन, मंगळगड अशी यादी मिळते (शाहू दप्तर)
सन १६२५ ला निजामाचा वजीर मलिक अंबर याच्याकडून बांदलानी हा किल्ला जिंकला होता.
केंजळगडाच्या बांधकामाबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही. साधारण १२ व्या शतकात भोज राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले असे समजते. राजा भोज हा परमार घराण्यातील एक राजा होता.१२ व्या शतकात बांधलेला हा किल्ला साधारण १६४८ साली आदिलशाह ने ताब्यात घेतला आणि मग शिवरायांनी हा किल्ला स्वराज्याचा भाग बनविला. पुढे १६७४ पासून हा किल्ला स्वराज्यातच राहिला. साधारण १७०१ मध्ये केंजळगड किल्ला औरंगझेबाने जिंकला आणि हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. मुघलांच्या ताब्यात हा किल्ला जाऊन एक वर्षही सरले नसावे कि १७०२ मध्ये पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला मुघलांकडून हिसकावून जिंकून घेतला आणि पुन्हा एकदा केंजळगडावर भगवा फडकविला. पेशवाईच्या अस्तानंतर सुमारे १८१८/१८१९ मध्ये केंजळगड ब्रिटिशांच्या मालकीचा झाला.
संकलन -राजेंद्र मोहीते सर पुणे
0 Comments