तुद वनस्पती अर्थात तुती/
मधुर ,शीत गुणांची कीती//
रेशीम व्यवसाया साठी खुप लाभदायी सोबत आरोग्यदायी सरबत व लहानमोठ्यांची आवडती तुती, तुद खुप चविष्ठ व आम्लधर्मी त्यामुळे आबटगोड फळे खातांना रानमेव्याची मजाच वेगळी .
महाबळेश्वरला गेले की स्टाबेरी व तुती ठरलेली .
आम्ही काढा करतांना धायटि फुलासोबत तुतीफळ रस टाकतोच त्यामुळे काढ्याचा रंग व चव अप्रतिम होतो.
आरोग्यदायी काढा पितांना गुळवेळ ,अर्जुन, कडुनिंब आतंरसाल याची तुरट कडवट चव या तुतीफळामुळे जानवतच नाही.
कुल-urticaceae
लॕ.नाव-morus alba
पांढरी white mulberry -रेशमी कीड्यांसाठी
nigra black mulberry खाण्यास उपयुक्त .
तुतीची फळे खाण्यास गोड लागतात .
ही फळे रक्तवृद्धि करणारी आहेत . काळी व पांढरी या दोन जातींच्या तुतीची झाडें रेशमाच्या किड्यांस उपयोगी आहेत .
ते याचा पाला खाऊन रेशीम उत्पन्न करितात .
चीन देशांत रेशीम फार उत्पन्न होते . या झाडास " सैतुत ” असेंही कोणी म्हणतात .
पक्व तुते- गुरु , शीत , मधुर , ग्राहक ; व रक्तदोष , वायु , व पित्त यांचा नाश करितात .
कोवळी तुते - गुरु , रेचक , आंबट , उष्णवीर्य , व रक्तपित्तनाशक अशी आहेत .
वसंतात फळे येतात .
रेशमी किड्यांचे खाद्य म्हणून याची पाने उपयोगी पडतात .
जाती - २ -एकाची फळे पांढरी , मोठी व गोड असतात .
दुसरीची फळे तांबूस काळी व आंबटगोड असतात .
उत्पत्तिस्थान - अखिल भारत .
रसशास्त्र -फळात साखर , पेक्टिन , साइट्रेट , मेलेट इ .
गुणकर्म - गुरु , स्निग्ध , मधुर , शीतवीर्याची ( कच्चे फळ आंबट व उष्णवीर्य असते . )
तूत वातपित्तात्मक विकारांवर उपयोगी पडते .
बाह्योपचार - हिची पान व्रणरोपण आहेत .
विशेषत : शय्याव्रणावर (बेडसोर)अधिक उपयोगी पडतात .
पानांच्या काढ्याने मुखपाक , गलपाकावर गुळण्या करतात.
आभ्यंतर - पक्व फळ . दीपन , अनुलोमन , साल मात्र रेचक व कृमिघ्न आहे . अग्निमांद्य , आध्मान , विबंध व कृमी यांत फळे व सालही वापरतात .
याची साल स्फीतकृमी - Tape -worms वर उपयोगी आहे .
पक्व फळाचे सरबत हृद्रोग व रक्तपित्तात , दाहात , दौर्बल्यात उपयोगी पडते .
मात्रा - सालीचा काढा ५० ते १०० ग्रॅम , फळांचा रस २० ते ५० मि . लि
संदर्भ -द्रव्यगुणविज्ञान
रेशीम उद्योग ह्या शेतीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. देशात अनेक राज्यांत रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो. कर्नाटक राज्यात तर रेशीम उद्योगाचे ग्रामीण भागात विस्तृत जाळे असून, रेशीम व दुध उत्पादन संकल्पना मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते.
राज्यात रेशीम उद्योगाला चांगला वाव आहे. रेशम उद्योगात वर्षभर कुटुंबाला रोजगार, कोषाला चांगला व खात्रीशीर भाव मिळू लागल्याने सर्वसामान्य, मध्यम व मोठे शेतकरी, उद्योजक हे रेशीम उद्योगाकडे आकर्षित झाले आहेत.
तुतीचा वापर दुग्ध उत्पादनासाठी
तुतीचे झाड़ हे बहुउपयोगी असून रेशीम संगोपनाशिवाय या झाडांचा अन्न, चारा, जळण यांसाठी चांगला उपयोग होऊ शकतो. तुती लागवड व कीटक संगोपनानंतर शिल्लक वाया जाणारा पाला/फांद्या व या सर्वांचा दुग्ध उत्पादनासाठी दुधाळ जनावरांना खाद्य म्हणून उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीने राज्यातही रेशीम दुध उत्पादन संकल्पना एक वरदान ठरु शकते.
रेशीम अळ्यांनी पाला खाल्यानंतर शिल्लक राहणा-या तुतीच्या डहाळ्या दुधाळ जनावरांसाठी पौस्टिक हिरवा चारा आहे. रेशीम अळ्यांनी खाऊन शिल्लक राहिलेला पाला वाया घालविण्यात येतो. ह्या पाला फेकून न देता दुधाळ जनावरांना दिल्यास दूध उत्पादनात २० ते २५ टक्के हमखास वाढ होते. रेशीम अळ्यांची विष्ठासुद्धा पौस्टिक खाद्य आहे. या विष्ठेवर मिठाचे पाणी मारुन वाळविल्यानंतर खुराक म्हणून देण्यात येतो.
जनावरांसाठी पोषक
चारापिकासारखे तुतीमध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जनावरांसाठी तुतीचा हिरवा चारा म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग करता येईल. संशोधनाअंती असे दिसून आले की, एक हेक्टर तुती लागवडीमध्ये रेशीम उत्पादनाबरोबरच ३-४ दुधाळ जनावरांचे पालन-पोषण करता येऊ शकते व त्यांची हिरव्या चा-यांची गरज भागविली जाऊ शकते. इतर कोरड्या चा-याबरोबर तुतीचा ४० टक्के ओला चारा जनावरांना दिल्यास संतुलित आहारामुळे आहे. शेळीच्या आहारात मका, शैवरी, याबरोबरच तुतीच्या बारीक फांद्या , पाल्याचा वापर करावा .
संदर्भ - कृषी विभाग महाराष्ट्र शासन.
पाने : रेशीमनिर्मिती करणाऱ्या बाँबिक्स मोरी नावाच्या किड्यांना (त्यांच्या अळ्यांना किंवा डिंभांना) पोसण्याकरिता फार मोठ्या प्रमाणावर पूर्णपणे वाढलेली पाने खाऊ घालतात. जनावरांना त्यांचा चारा घालतात; रोज सकाळी व संध्याकाळी मिळून सहा किग्रॅ. तुतीची पाने गायींना व म्हशींना दिल्याने त्यांचे दूध वाढते, असा अनुभव आहे. पानांत प्रथिन १६–३९%, विरघळणारी शर्करा ७·६–२६%, राख ८–१७%, कॅल्शियम ०·७–२·७% आणि लोह ०·०५–०·१२% असतात.
फळे : पिकलेली ताजी फळे तशीच खातात किंवा त्यांचे सरबत करतात; तसेच स्ट्यू व टार्ट नावांचे खाद्यपदार्थ बनवितात, रसावर किण्वनाची (आंबविण्याची) प्रक्रिया करून मद्येही बनवितात. सुकविलेल्या फळांचे पीठ करून त्याचा पाव करतात. पक्व फळे मोठ्या प्रमाणावर विकली जातात व ती आवडीने खाल्ली जातात. फळात शेकडा जलांश ८७·५, प्रथिन १·५, मेद (स्निग्ध पदार्थ) ०·४, कार्बोहायड्रेट ८·३, धागे १·४ व खनिजे ०·९ असतात; दर १०० ग्रॅ. ला कॅल्शियम ८० मिग्रॅ., फॉस्फरस ४० मिग्रॅ, व लोह १·९ मिग्रॅ. असतात. यांशिवाय कॅरोटीन, थायामीन, निकोटिनिक अम्ल, रिबोफ्लाविन, अॅस्कॉर्बिक अम्ल इ. असतात. बियांत २५–३५% सुकणारे पिवळट तेल असते.
लाकूड
तन्यता व नम्यता (ताणले जाणे व लवचिकपणा) या गुणांमुळे तुतीचे लाकूड क्रीडासाधने बनविण्यासाठी फार उपयुक्त असते; मध्यकाष्ठ; [→ मध्यकाष्ठ] पिवळट किंवा सोनेरी तपकिरी आणि रसकाष्ठ (बाहेरचे) पांढरे किंवा सायीच्या रंगाचे असते; ते मध्यम कठीण व जड असते; उघड्या जागी फारसे टिकाऊ नसते. सुतारकामास ते चांगले असते. हॉकीच्या काठ्या, टेनिस व बॅडमिंग्टन रॅकेट्स, क्रिकेट बॅट्स व स्टंप्स, घरबांधणी, शेतीची अवजारे, सजावटी सामान, हत्यारांचे दांडे, सूतकांड्या (बॉबिन) इ. विविध वस्तूंकरिता फार उपयुक्त असते; गाड्यांच्या विविध भागांकरिता ते वापरतात. त्यात सु. ३२% टॅनीन असल्याने कातडी कमविण्यास व रंगविण्यास सोयीचे असते. झाडांच्या सालीत धागा भरपूर असल्याने चीन व यूरोपीय देशांत कागदाकरिता ती वापरतात. साल कुजवून अलग केलेला धागा पांढरा, नरम व स्पर्शाला रेशमाशी तुल्य असल्याने कापड उद्योगात उपयुक्त असतो; धाग्यांच्या दोऱ्या व टोपल्या बनवितात.
औषधी व इतर
पाने स्वेदकारी (घाम आणणारी) व वेदनाहारक असून घशातील दाह (आग) कमी करण्यास पानांचा काढा गुळण्या करण्यास वापरतात. फळे रुचकर, मधुर, सारक व शीतक (थंडावा देणारी) असून घसा धरल्यास, अग्निमांद्य (भूक मंद झाल्यास) व खिन्नताविकार यांवर गुणकारी असतात; तापात तहान भागविण्यास फळे खाण्यास देतात; मुळे स्तंभक (आकुंचन करणारी) व कृमिनाशक असतात; सालही कृमि–उत्सर्जक व रेचक असते.
काही जाती व प्रकार फक्त फळांकरिता व काही लाकडाकरिता विशेषकरून लागवडीत आहेत.
मोरस लिव्हिगॅटा
ही तुतीची जाती हिमालयात कुमाऊँ ते पूर्वेस आसामपर्यंत १,५०० मी. उंचीवर आणि अंदमानात आढळते. हे सु. ३० मी. उंचीचे वृक्ष असून त्यांचा घेर ४·५ मी. असतो; पूर्व हिमालयातील वृक्षांपेक्षा प. हिमालयातील वृक्ष बरेच लहान असतात. यांना १०–१२ सेंमी. लांब फुलोरे येतात आणि लांब दंडगोलाकृती, पिवळट व गोड किंवा पाणचट फळे येतात. याचे लाकूड मो. आल्बापेक्षा अधिक बळकट व टिकाऊ असल्याने विविध प्रकारे उपयोगात आणले जाते.
मोरस नायग्रा
(इं. ब्लॅक मलबेरी). ह्या जातीतील वृक्ष सु. ६–९ मी. उंच असून मूळचा तो प. आशियातील आहे व फळांकरिता इतरत्र विशेषकरून लावला जातो. संयुक्त फळे २–२·५ सेंमी. लांब, आयत, जांभळी किंवा काळी, रसाळ गोड व खाद्य असतात. काश्मीर व दार्जिलींग येथे विशेष लागवडीत असून फळांचे मुरंबे, जेली व सरबत बनवितात; यूरोपात त्यांचे मद्य बनवितात. रेशमाच्या किड्यांच्या खाद्याच्या दृष्टीने या जातीची पाने कमी प्रतीची असतात.
मोरस सेरॅटा
(इं. हिमालयन मलबेरी) हा वृक्ष सु. १८–२१ मी. उंच असून हिमालयाच्या आतील रांगांत सु. १,२००–२७०० मी. उंचीच्या प्रदेशात आढळतो. त्याची फळे लांब, जांभळी, गोड व खाद्य असतात. ही झाडे सावलीकरिता लावतात. यांचे लाकूड जड, कठीण व चिवट असते आणि ते कापीव व कातीव वस्तूंकरिता वापरतात; यापासून शेतीची अवजारे, बंदुकी, खेळणी इ. वस्तू करतात. रेशमाच्या किड्यांना व जनावरांना पाने खाऊ घालतात.
मोरस ऑस्ट्रॅलिस
(मो. अॅसिडोजा; इं. कॉमन मलबेरी). हा एक लहान पानझडी वृक्ष (अथवा झुडूप) असून तो आसाम आणि खासी टेकड्यांत आढळतो. इतरत्र रेशमाच्या किड्यांना पाने खाऊ घालण्याकरिता लागवडीत आहे; फळे लहान, काळी व खाद्य आहेत. यालाचमो. इंडिका असे नाव दिलेले आढळते.
लेखक: ज्ञानसागर, वि .रा. मुजुमदार, शां. ब. परांडेकर, शं. आ.
लागवड
तुतीची लागवड ही रेशीम उद्योगधंद्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कर्नाटकात आणि प. बंगालमध्ये तुती शेतपीक म्हणून घेतात आणि अनेकदा वीण करणाऱ्या रेशमाच्या किड्यांना चारण्याकरिता वर्षातून पुष्कळ वेळा पाने काढतात. जम्मू व काश्मीरमध्ये तुतीची मोठाली झाडे वाढवितात आणि एकदाच वीण करणाऱ्या रेशमाच्या किड्यांना चारण्याकरिता हंगामात एकदाच पाने काढतात. ठेंगणी कलमी झाडे अथवा उंच झुडपे लावण्याची पद्धत अलीकडेच प. बंगालमध्ये सुरू केली आहे.
लेखक श्री.चौधरी सर रा.मो.
" हिंदुस्थानात प्राचीन काळी प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले गेले आहेत . आज त्या ग्रंथांचा अंशही आपणास पाहावयास मिळत नाही . इंग्रजांचे राज्य असल्यामुळे व त्यांची विद्या राजमान्यता मिळाल्यामुळे विकास पावत आहे . आणि त्यामुळे आमच्या पूर्वजांचे कित्येक ग्रंथ त्याचप्रमाणे नाना तर्हेची विद्या नष्ट होत आहे .
कष्टं शिष्टक्षतिकृति कलौ कार्यमृच्छन्ति विद्या । ” असे उद्वेगजनक वाक्य कित्येक लोकांच्या मुखांतून बाहेर पडत आहे याचे कारण हेच आहे . याकरिता आमच्या सुशिक्षित वर्गाने , ज्यांची बुद्धी विशाल आहे , ज्यांना ईश्वराने अनुकूलता दिली आहे , अशा सद्गृहस्थांनी या उद्वेगजनक गोष्टीचा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची फार आवश्यकता आहे .
" -शंकर दाजीशास्त्री पदे [ इ . स . १८ ९ ३ साली लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून ]
टिप-
माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
वेगवेगळ्या सोशल माध्यमांतुन ही माहीती संकलित करण्यात आली आहे. लेख सेम असू शकतो.
0 Comments