बांबूचे आयुर्वेदातील महत्व तुम्हाला माहित आहे?
पोषकतत्वे:
१. बांबू मध्ये जीवनसत्व ब कॉम्प्लेक्स – थायामीन, रिबोफ्लॅविन, नियासिन, बी-६ (पायरीडॉक्सिन) आणि पँटोथिनिक ऍसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, तंतुमय पदार्थ, कमी प्रमाणात प्रथिने व फॉस्फरस आहे.
२. जीवनसत्व ब हे तोंड, जीभ व डोळे यांच्या करिता आवश्यक आहे. त्वचा, हाडे, केस, रक्तपेशी, मज्जातंतू व पचनसंथा स्वस्थ ठेवते. रोग प्रतीकारक शक्ती वाढवते.
३. पोटॅशिअम स्नायूचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक आहे.
४. कॅल्शिअम व फास्फोरस हाडे व दातांना मजबुती देते.
५. तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते.
६. प्रथिने शरीराची झीज भरून काढते.
७. बांबू हा क्षारयुक्त आहे. यातील तंतू आणि क्षार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.
औषधी गुणधर्म
बांबूचे कोंब, पेर, पाने, अंकुर, फुले सर्व औषधी आहेत.
१. बांबूच्या कोंबाचा शक्तीवर्धक म्हणून उपयोग आहे.
२. जखमेतील किडे काढण्याकरिता बाबूंच्या कोबाचे पोटीस बांधतात
३. बांबूचा कोवळा भाग श्वसन विकारावर उपयोगी आहे.
४. कोवळ्या कोंबाचे लोणचे अपचनात उपयुक्त आहे. भाजीमुळे भूक व पचनशक्ती वाढते.
५. कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात.
६. बाळंतपणानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात.
७. मासिक पाळी नियमित येणासाठी बांबूची भाजी उपयुक्त आहे.
८ .बांबू खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन हे दम्यावरील उत्तम औषध आहे. तसेच थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक म्हणून वापरतात.
0 Comments