बांबू देतेय आर्थिक दिशा आणि ऊर्जा
भोर तालुक्यातील पश्चिम भागात ठरतेय नगदी पीक
भोर तालुक्यातील पश्चिम भागात एक महत्त्वाचे पीक म्हणून बांबूचा उल्लेख ग्रामुख्याने करावा लागेल . बांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे असल्याने येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे . शेती , हस्तकला , बांधकाम , फर्निचर , विविध वस्तू , कागद उद्योग , वाद्य निर्मिती आणि खाद्य इत्यादीसाठी बांबूचा वापर केला जातो . त्यामुळेच तालुक्यात आर्थिकदृष्ट्या दिशा आणि ऊर्जा देणारे हे प्रमुख साधन आहे .
हिरडस मावळातील हिर्डीशो खोन्यातील . नौरा देवघर धरणाच्या दोन्ही बाजूचा परिसर म्हसर खोरे याठिकाणी बांबूची बेटे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत . आपटी , नांदगाव , कारी खोरे , आंबवढे खोरे या भागात ही बांबूची बेटे आहेत . त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पत्र होत असल्याने , तसेच हिर्डीशी भागात नीरा देवघर हे धरण २००० साली बांधण्यात आल्याने भागातील लोकांच्या शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत , त्यामुळे प्रमुख उत्पन्नाचे मोत असणारी शेती राहिली नसल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी पुणे , मुंबईसारख्या ठिकाणी जावे लागत आहे , तर काही मिळेल तो कामधंदा करून आपली उपजीविका भागवत आहेत .
एकंदरीत धरण झाल्यापासून या भागातील नागरिकांची आर्थिक परस्थितो खालावली आहे.त्यामुळे हमखास उत्पन्नाचे साधन असलेल्या बांबू शेतीकडे शेतकरी वळत आहेत , त्यामुळे या भागातच एखादा बाबू विषय प्रकल्प , बांबूपासून वस्तू बनविण्याचा कारखाना किंवा बांबूपासून या भागातील तरुणांना रोजगार मिळेल , शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल यासाठी प्रशासन तसेच राजकीय प्रतिनिधींनी या बांबू शेतीकडे लक्ष देऊन येथील बेरोजगार युवकांना रोजगार व शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची खरंच गरज असल्याचे भागातील नागरिकांकडून विशेष युवक वर्गाकडून बोलले जात आहे .
लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न बांबू जलद गतीने वाढणारी , सदाहरित , दीर्घायू वनोपज आहे . याचे जीवनचक्र ४० ते १०० वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही . कमी - जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होत नाही , तसेच डोंगर उतारावरील जमिनीवरही बांबूची लागवड करता येते . त्यामुळे लागवड केल्यानंतर थोडी काळजी घेतल्यावर खात्रीशीर उत्पन्न बांबू लागवडीच्या तिसऱ्या वर्षापासून मिळायला सुरुवात होते .
हिंडोर्शी भागातील शेतकरी बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात बांबूचा योग्य मोबदला मिळण्यासाठी बांबूपासून वस्तू निर्मितीसंबंधी जनजागृती करणे गरजेचे असून कृषी , वन , तसेच बांबूविषयी शासकीय संस्था यांनी या भागात येऊन कार्यशाळा भरवून बांबू सबंधित असणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यापासून भागातील शेतकऱ्यांना व युवकांना रोजगार उपलब्ध करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करावी . - सुधीर शिरवले , माजी सरपंच , शिरवली हि . मा .
भोरला बांबू फर्निचर युनिट लवकरच सुरू होणार आहे . मशिन उपलब्ध असूण युनिट चालवण्यास ट्रेनिंग देण्यात येणार आहे . कोरोनाची स्थिती पाहुन भाटघर येथील बांबू ट्रिटमेंट ची नविन बॅच सुरू करणार आहे . तसेच नसरापूर येथे बांबू डेपो चालू करून लिलाव पध्दत चालू करण्यात येणार आहे . त्यामुळे शेतकन्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होईल . शेतकन्यानी अटल बाबू समृध्दी योजनेंतर्गत बांबू रोपे लागवडी संदर्भात लाभ घ्यावा - दत्तात्रय मिसाळ , वनपरिक्षेत्र अधिकारी , भोर
साभार प्रभात पेपर 27/02/2021
0 Comments