Ticker

6/recent/ticker-posts

Bambosa bambose कटांग बांबु

 Bambosa bambose

 काटे कळक,कटांग,वेळु आशा विविध नावाने ओळखला जातो.



खरेतर याची लागवड पडीक,ओसाड जमिणीवर करणे योग्य आहे 

कोल्हापुर मधील टिंबर मार्केट येथे याची वार्षीक ऊलाढाल 25कोटींवर आहे,येथील बांबु सौदा आठवड्यातुन 5 ते 6 दिवस चालतो कधीकधी आठवडाभर विक्री सुरु असते, सकाळी 10 ते 12 सौदा चालतो,सौद्यापुर्वी आलेल्या सर्व कळकांची प्रतवारी केली जाते 1नं,2,3,4,5,6, आशी बांबुचा दर्जा पाहुन प्रवारी केली जाते,ईथे येणारा प्रतेक कळक हा 14फुटांचा तुकडा विक्रीस स्वीकारला जातो, आज अखेर ईथे फक्त कळकच बांबु विक्री होते, )या ठिकाणी बल्कोआ बांबु विक्री साठी प्रयत्न केले आहे मला चांगला भाव मिळाला आहे किमाण 35/- कमाल 75/- मिळाला (14फुट)          (वर्ष 2014 फेब्रवारी ), त्या नंतर  ईथे बल्कोआ कधी घेऊन जानेची वेळ आली नाही, येथील व्यापारीच आज अखेर मागणी नोंदवतात व पुरवठा  झाला आहे यांनी बल्कोवा 140km पर्यंतचा योग्यभाव रोखीने देऊन खरेदी केली आहे,

सांगण्याचे तात्पर्य 

ईथे आजपर्यंत कळकाचीच उलाढाल होते 

कळक वाईट आजीबात नाही फक्त तो तोडता येत नाही सर्व सामान्य मानुस तो तोडु शकत नाही ज्याला तो तोडता येणार त्यानेच त्याची संगत करावी ।

 डाँ आनंद कोरे आहेत त्यांनी कळकाच्या 7बेटांचे ऊत्पन्न 3.00लाख रु घेतले आहे ति बेटे 40वर्षे वयाची होती।

कळ्क बांबु लावल्यानंतर लगेचच 4 -5 वर्षात उत्पन्नाची आपेक्षा धरु नये । यथावकाश मिळेल ती तपश्चर्या समजावी

कोल्हापुरच्या या मार्केट मधून गोवा,बेळगाव,संकेश्वर,सांगली, लातुर,नगर,नासिक वगेरे ठिकानी विक्री होते, तेथुन मागणी येते त्यानुसार पुरवठा होतो। सद्या परिस्थितीत माणग्या बरोबर कळकाभची राज्यात मागणी होते,आहे आणि पुढेही रहानार

या मार्केट मधील व्यापार्यांना बांबु चळवळीतील कार्य शाळेत येऊन आपले सादरीकरण करणेस आमंत्रीत वेळोवेळी केले आहे परंतु ते लोक येत नाहीत।



"साभार —अरुण वांद्रे सर टेलीग्राम"

Post a Comment

0 Comments